हेल्दी आरोग्यदायी फळे कोणती आहेत? रोगांपासून दूर ठेवतात ही फळे

SD &  Admin
0


मानवी शरीर हे असे जिवंत यंत्र आहे, त्याला चांगले चालण्यासाठी चांगले आरोग्यदायी पदार्थ आणि फळे आवश्यक असतात. जर तुम्ही शरीराला काहीही खायला दिले तर, ते खराब होईल. आणि ते तुम्हालाच त्रास देत राहील. यामुळे तुम्ही तुमचे आयुष्य कधीही आरामात, आनंदात घालवू शकणार नाही.

    या पंचमहाभूत शरीराच्या कार्यासाठी सर्व जीवनसत्त्वे आवश्यक असतात. एखादे जरी चुकले तरी आपले शरीर आजारी पडते. म्हणूनच चांगले आरोग्यदायी पदार्थ आणि फळे शरीरात योग्य प्रमाणात गेली पाहिजे.

हेल्दी आरोग्यदायी फळे कोणती आहेत? रोगांपासून दूर ठेवतात ही फळे

अनेक प्रकारची आरोग्यदायी फळे बाजारात विकायला असतात. परंतु अशी फळे खरेदी करण्यापूर्वी, ती पूर्णतः तपासणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला अनेक रोगांना सामना करावा लागू शकतो. या बाजारातील पदार्थात आणि फळात अनेक प्रकारची रासायनिक भेसळ आढळते. या रसायनांमुळे हे पदार्थ आणि फळे दिसायला सुंदर, चविष्ट आणि अधिक दिवस टिकणारे असतात. पण अशी फळे किंवा पदार्थ आपल्या शरीराला खूप हानी पोहोचवतात. जे तुमच्या शरीरासाठी योग्य नाही.

आपल्या शरीरासाठी चांगली आरोग्यदायी फळे आणि पदार्थ का आवश्यक आहे?

याचे मुख्य कारण म्हणजे हेल्दी प्रोडक्ट्समध्ये जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. ज्यामुळे आपल्या शरीराला ताकद मिळते. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवून ते शरीराला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यास मदत करते.

आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला जेवायला वेळ मिळत नाही. जे समोर येईल ते आपण खातो. ते अन्न आपल्या शरीरासाठी चांगले आहे की नाही याचाही आपण  विचार करत नाहीत. बस्स.. आम्ही खात राहतो.. आणि भविष्यात जे घडायचे असते ते घडतेच. तुम्ही आजारी पडता. तुमचे शरीर नीट काम करत नाही. तुम्ही चांगले फील करत नाही. यासाठी कोणतेही पदार्थ - फळे घरी आणाल, तेव्हा ती तपासूनच घरी आणा.    

Read More : स्वतःला दिवसभर फ्रेश आणि सकारात्मक उर्जेने भरून कसे ठेवायचे?

चला जाणून घेऊया ते चांगले आरोग्यदायी फळे आणि पदार्थ कोणते आहेत, ते आपल्या शरीराला भरपूर जीवनसत्त्वे देतात. आणि म्हणूनच आपण तंदुरुस्त आणि निरोगी राहतो.

चांगली आरोग्यदायी फळे आणि पदार्थ कोणती आहेत?

१. अक्रोड :

अक्रोडमध्ये व्हिटॅमिन 'ई', मॅंगनीज, कॉपर मुबलक प्रमाणात आढळतात. विटामिन्स आपल्या मेंदूची शक्ती वेगाने वाढवतात. अक्रोड आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे. आणि त्यात आढळणाऱ्या पोषक तत्वांमुळे आपला मेंदू अधिक सक्रिय होतो. आपल्या ज्ञानात वृद्धी होते .

अक्रोड

२. काजू :

काजू हा प्रत्येकाचा आवडता ड्राय फ्रूट आहे. त्यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आढळतात, जे आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. जसे की प्रथिने, खनिजे, लोह, फायबर, मॅग्नेशियम, अँटिऑक्सिडंट्स, फॉस्फरस, सेलेनियम, फोलेट आणि खनिजे. ही जीवनसत्त्वे आपल्या शरीराला खूप ऊर्जा देतात. काजू आपले केस तुटणे, त्वचेचे नुकसान आणि पचन सारखे आजार दूर ठेवण्यास मदत करतात. तसेच काजू कोलेस्ट्रॉल आणि ऍलर्जीसाठी खूप फायदेशीर आहे. मुलांनी त्याचे सेवन करावे.

काजू

३. बदाम :

बदाम हे मुलांचे सर्वात आवडते ड्रायफ्रुट्स आहेत. त्यात प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि फायबर्स असतात. ज्याचा कोलेस्ट्रॉल कमी करण्यावर आणि कॅन्सरसारख्या आजारांवर चांगला परिणाम होतो. बदामातील ‘ई’ जीवनसत्त्वामुळे मेंदूची क्रिया वाढते. बदाम वजन कमी करण्यास मदत करतो. बदामाच्या तेलाने मसाज केल्याने हाडे मजबूत होतात आणि केस गळणे कमी होते. बदाम हा हृदयाच्या आरोग्यासाठी रामबाण उपाय आहे. याचबरोबर बदाम खाण्याची योग्य वेळ असावी हे लक्षात ठेवायला हवे.

बदाम

४. बेरी :

ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, रास्पबेरी इत्यादी बेरीमध्ये येणारी सर्व फळे मुलांच्या जेवणात समाविष्ट करावीत. बेरी हे असेच एक फळ आहे, त्यात अँटिऑक्सिडंट फ्लेव्होनॉइड्स असतात. हे अँटीऑक्सिडंट फ्लेव्होनॉइड्स मुलांच्या मेंदूच्या पेशी मजबूत करतात. त्यामुळे मुलांचा मेंदू अवघड ते अवघड ज्ञान सहज ग्रहण करतो.

बेरी

५. टोमॅटो :

टोमॅटो हा आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात आवडता पदार्थ आहे. टोमॅटोशिवाय कोणत्याही भाजीला चव आणणे कठीण आहे. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन 'सी' मुबलक प्रमाणात आढळते, हे तुम्हाला माहीतच आहे. यासोबतच इतर जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील आढळतात, जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. टोमॅटोचा वापर फक्त भाज्यांमध्येच केला जात नाही तर, टोमॅटोमुळे आपले सौंदर्य वाढवण्यासही मदत होते. टोमॅटो हे असे फळ आहे, जे आपले इन्सुलिन नियंत्रणात ठेवते. म्हणूनच तुम्ही ऐकले असेल की, डॉ. दीक्षित यांच्या विनासायस डाएट प्लॅनमध्ये टोमॅटो खाल्ल्याने इन्सुलिन वाढत नाही.

हेल्दी आरोग्यदायी फळे कोणती आहेत?

६. किवी :

किवी हे असे फळ आहे, ज्याने आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो. बहुतेक डॉक्टर रुग्णाला हे फळ खाण्याचा सल्ला देतात. त्यात काही प्रकारचे पौष्टिक घटक आढळतात. ज्याद्वारे आपण शरीर निरोगी ठेवू शकतो. हृदयविकाराचा त्रास कमी करण्यासाठी किवीचा वापर करावा. दैनंदिन जीवनात याचे सेवन केल्यास प्लाझ्मा आणि रक्तदाब यांसारख्या आजारांपासून आराम मिळतो. वजन कमी करण्यासाठी, मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, दमा, गर्भधारणा, डोळ्यांसाठी, कर्करोगासाठी, यकृतासाठी, कोलेस्टेरॉलसाठी, त्वचेसाठी, केसांसाठी आणि इतर अनेक आजारांसाठी किवीचा वापर केला जातो.

किवी

७. पपई :

पिवळ्या, लाल दिसणार्‍या या फळात व्हिटॅमिन 'सी' आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे आपण कोलेस्टेरॉल बऱ्याच अंशी नियंत्रणात ठेवू शकतो. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर, अवश्य या फळाचा समावेश करा. पपईमध्ये आढळणाऱ्या 'क' जीवनसत्त्वामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यासोबतच यामध्ये व्हिटॅमिन 'ए' देखील असते, ज्याद्वारे आपण दृष्टी वाढवू शकतो.

चांगली आरोग्यदायी फळे आणि पदार्थ कोणती आहेत?

यांच्याबरोबर इतरही चांगली आरोग्यदायी फळे, भाज्या आहेत, जे आपल्या शरीराला शक्ती प्रदान करतात. आपल्या दैनंदिन जीवनात हिरव्या भाज्यांचे सेवन वाढवणे आवश्यक आहे. यामध्ये पालक जरूर खा. त्यात जीवनसत्त्वे, ल्युटीन, बीटा कॅरोटीन, फोलेट इ. ज्याचा आपल्या मेंदूसोबतच शरीराच्या इतर अवयवांनाही फायदा होतो.

तसेच तुमच्या आहारात शिमला मिरची, लिंबूवर्गीय फळे, ब्रोकोली, भोपळ्याच्या बिया, सोया उत्पादने, बीट रूट, ओट्स, लाल द्राक्षे, चेरी इत्यादींचा समावेश करणे आवश्यक आहे .


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!