पपई पाहून प्रत्येकाला ती खाण्याची इच्छा होते. आणि आपण आवडीने पपईचे सेवन करतो. पपईचा वापर खाण्याबरोबर भाजी बनवण्यासाठी, जॅम, ज्यूस, जेली बनवण्यासाठीही वापर केला जातो.
या फळाचे असे काही फायदे आहेत, जे तुम्हाला माहीतही नसतील. पपईमध्ये व्हिटॅमिन 'ए' आणि व्हिटॅमिन 'सी' मुबलक प्रमाणात आढळतात, त्यामुळे अनेक आजारांवर ते रामबाण उपाय असल्याचे सिद्ध होते. उदा., मूळव्याध, त्वचारोग, पोटात जंत, वीर्य गळणे, केस गळणे, बद्धकोष्ठता इ. जर तुम्ही योग्य ऋतूमध्ये आणि योग्य वेळी पपईचे सेवन केले तर, तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.

पपईमध्ये पोषक तत्वे आढळतात
पपईमध्ये व्हिटॅमिन 'ए', व्हिटॅमिन 'सी', व्हिटॅमिन 'बी', लोह, कॅलरीज, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळतात.
पपईच्या सेवनाने कोणते आजार दूर ठेवता येतात?
१. मूळव्याध
जर तुम्हाला मुळव्याधने त्रास होत असेल आणि काही उपाय करूनही तुम्हाला काही फायदा होत नसेल तर, तुम्ही कच्च्या पपईचे सेवन करावे. काही दिवसात तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल.
Read More : जंकफूड कोणते आहेत काय? जंकफूडचे आरोग्यावर होणारे परिणाम
Read More : जंकफूड कोणते आहेत काय? जंकफूडचे आरोग्यावर होणारे परिणाम
२. वीर्य वाढवण्यास मदत
पपईचे सेवन केल्याने पुरुषांच्या शरीरात शुक्राणूंची संख्या वाढते. म्हणजे तुमच्या शरीरात वीर्य वेगाने वाढते. म्हणूनच पुरुषांनी याचे सेवन करणे फार आवश्यक आहे.
३. दृष्टी वाढवण्यासाठी
पपईमध्ये व्हिटॅमिन 'ए' मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढते. म्हणूनच याचे भरपूर सेवन करणे आवश्यक आहे.
४. बद्धकोष्ठता
बद्धकोष्ठता हा एक असा आजार आहे ज्याने अनेकांना त्रास होतो. म्हणूनच याचे नियमित सेवन केल्यास या आजारापासून नक्कीच सुटका होऊ शकते.
५. पचन
पपई हे निश्चितच प्रथिनांचा खजिना आहे. त्यात पॅपेन एन्झाइम आणि बीटा कॅरोटीन नावाचे घटक आढळतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि काही दिवसात या आजारापासून मुक्ती मिळते.
६. डेंग्यू
धोकादायक डेंग्यू रोगावर पपईचा चांगला प्रभाव दिसून येतो. पपईच्या पानांच्या रसाचे सेवन केल्याने डेंग्यूसारख्या आजारांवर मात करता येते.
कच्चा पपईचे फायदे : घरगुती उपचारांसाठी पपईचा वापर कसा करावा?
चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी, तसेच इतर घातक आजारांवरही तुम्ही पपईचा उपयोग करू शकता. पिकलेल्या पपईचा लगदा चेहऱ्यावर लावल्याने चेहरा उजळण्यासोबतच मुरुमही दूर होतात.
नवीन जोडे आणले की पायात फोड येतात. ते बरे करण्यासाठी कच्च्या पपईचा रस फोडांवर लावल्याने फोड बरे होतात.
कच्चा पपई खाल्याने महिलांना मासिक पाळीत येणाऱ्या त्रासात आराम मिळतो. कारण कच्चा पपईच्या सेवनामुळे शरीरात ऑक्सिटोसिन आणि प्रोस्टाग्लॅंडिनची पातळी वाढते, त्यामुळे वेदना कमी होतात.
इन्सुलिनचे प्रमाण योग्य राहण्यास मदत मिळते.
रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. सर्दी सारखे आजार दूर होतात.
कच्चा पपईमुळे दुध वाढण्यास ही मदत होते.

खबरदारी
माझ्या प्रिय वाचक मित्रानों, येथे सांगू इच्छितो की, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी किंवा वापरण्यापूर्वी डॉक्टर किंवा चांगल्या तज्ञांकडून योग्य माहिती घेणे आवश्यक आहे.कारण मित्रानों.. आजकल बाजारात प्रत्येक गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत आहे. मग ती फळे का असेनात. प्रथम आरोग्याची काळजी घेणे ही तुमची जबाबदारी आहे.