जेथे घर आलं तेथे भांडणं ही आलीच, असे समीकरणच आहे. जसे पती-पत्नी, सासू-सुना यांच्यातील वाद घरातील वातावरण भयावह आणि तणावाचे करतात. परंतु या सगळ्यात पालक हे विसरून जातात की, समोर लहान मुलं आहेत आणि त्यांच्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.
तुमच्या या चुकीच्या वागण्यामुळे मुलांमध्येही क्रोधीवृत्ती निर्माण होते. मुलं सतत चिडचिड आणि भांडण करत बसतात. कधी कधी शिवीगाळ सुद्धा करू लागतात. बाहेरच्या लोकांशी ही उद्धट आणि बेशिस्त वागतात. आणि हे सर्व कोणामुळे, तर घरातील मोठ्या लोकांमुळे.
या सर्व गोष्टी टाळण्यासाठी पालकांनी या चुका करणे टाळल्या पाहिजेत :
- मुलांसमोर भांडणे करणे .
- मीच बरोबर आणि तुझ्यावर प्रेम करतो असे मुलांना सतत दाखवून देणे.
- नवरा-बायकोमधील संवेदशील वाद मुलांच्या समोर ओकने.
- मुलांसमोर शिवीगाळ करणे.
- कधी कधी पालक मुलांना ही आपल्या भांडणात ओढून घेतात
- शेवटी सर्वात वाईट चुकी म्हणजे, मुलांना ही मारहाण करणे.
या सर्व गोष्टी मुलांच्या भविष्याची वाट लावण्यासाठी पुरेशी आहेत. येथे विनंती करतो की, एक जबाबदार पालक म्हणून आपलं एक नैतिक काम आहे की , मुलांना अशा वाईट गोष्टीपासून दूर ठेवणे आणि त्यांना जास्तीत जास्त चांगल्या वातावरणात वाढू देणे.
Read More : बाल संस्कार | मुलांना त्यांची कामं करायला शिकवा
या करिता पालकांनी या गोष्टी केल्या पाहिजेत :
- तुमच्या मधील वाद मुलांसमोर कधीच करू नका. उलट तुम्ही ही असे वाद घडू नयेत म्हणून एकमेकांना समजून घेतले पाहजे.
- मुलांच्या मनात आपल्यासाठी आदर निर्माण होईल असे वागले पाहिजे. शक्यतो तुमच्या नवरा-बायको मध्ये कधी भांडणे होत असतील तर ती, तुमच्या मुलांसमोर कधीच करू नका.
- शिवीगाळ करणे आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून विनाकरण घरात भांडण करणे टाळले पाहिजे.
- घरात काही समस्या असतील त्या मुलांसमोर न दाखवता, घरातील दुसऱ्या खोलीत किंवा मुलं नसताना त्या समस्या कमी कशा होतील यावर चर्चा केली पाहिजे.
- घरात वातावरण शांत आणि हेल्दी ठेवावे, त्यामुळे मुलं ही शांत आणि सुसंस्कृत बनतील.
- मोठ्या लोकांशी आदराने वागले पाहिजे, जेणे करून मुलं ही तुमचे संस्कार घेतील.
एक सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी आपले हे योगदान सर्वांसाठी फायद्याचे ठरेल.
.