पालकांचं आपल्या मुलांशी नाते कसे असावे ?

SD &  Admin
0


गभरातील पालकांना एकच टेन्शन असते आणि ते म्हणजे त्यांच्या मुलांचे भविष्य. यासाठी पालक स्वतःचं आयुष्य विसरून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी अपार मेहनत घेतात. मुलांची प्रत्येक मागणी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.

परंतु मी येथे पालकांना सांगू इच्छितो की, मुलाचं भविष्य फक्त चांगलं जेवण, नव-नवीन कपडे देऊन, फिरायला नेणे, पाहिजे ते देणे यामुळे होते का? असा जर तुम्ही विचार करत असाल तर, ते चुकीचे ठरेल. कारण या सगळ्या गोष्टींच्या पुढे ही एक गोष्ट आहे, ती म्हणजे संस्कार. जर संस्कार सोडून तुम्ही मुलांना सगलं काही दिलं, तर तुम्ही दिलेलं सर्व काही शून्यात जमा होईल. कारण संस्काराअभावी मुलं वाईट स्वभावाची होतील. आणि पुढे ती आपलंही आयुष्य खराब करतील, बरोबर तुमचेही जीवन व्यर्थ जाईल.     

म्हणून मुलांच्या उत्तम विकासासाठी, पालक आपल्या मुलांशी नाते कसे ठेवतात? ते कसे वागतात? ते कसे बोलतात? त्यांना कसे प्रोत्साहन देतात? त्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी ते काय करतात? हे ही तितकच महत्वपूर्ण आहे.

आपल्या मुलांशी नाते कसे असावे ?
image credit to pexels.com


पालकांनी आपल्या मुलाशी मजबूत नाते कसे निर्माण करावे?


या सगळ्या गोष्टींचा विचार करून, आज प्रत्येक पालकाला एकच प्रश्न पडलेला असतो, तो म्हणजे मुलांशी नाते कसे ठेवावे? आजची मुलं फास्ट झाली आहेत. कोणतीही गोष्ट किंवा ज्ञान ते पटकन स्वीकारतात. परंतु या दरम्यान, ती गोष्ट चांगली आहे की वाईट, हे मात्र ठरवण्याची क्षमता मुलांमध्ये नसते. फक्त ती स्वीकारण्याची क्षमता त्यांच्यात असते. अशा वेळी पालकांना आपल्या मुलांशी कसे वागावे? याची चिंता असते.

यावेळी पालकांनी मुलांशी जपून वागले पाहिजे. त्यात थोडी जरी चूक झाली तर त्याचे वाईट परिणाम मुलांवर होतात. काही मुलं रागीट होतात. काही मुलं एकाकी होतात, त्यांना वाटतं की जगात आपलं कोणीच नाही. आणि काही मुलं तर आपलं मानसिक संतुलन गमावून वाईट संगतीत अडकतात. अशा वेळी पालकांनी काय करावे?

माझ्या भावाला पाच वर्षांचे मूल आहे. लहानपणापासून त्याला हवे ते मिळत असे. पण त्याच्या मानसिक विकासासाठी त्याच्या पालकांनी काहीही केले नाही. फक्त आपल्या मुलांना हवे ते देणे, मग ती गोष्ट गरजेची आहे का नाही, यावर पालक विचार करत नाहीत. यामुळे मूल बिघडत जातं. 

Read More : नाते घट्ट करण्यासाठी कोणत्या चुका टाळायला हव्यात.

या ब्लॉगमध्ये मी सर्व पालकांनी आपल्या मुलांशी नाते कसे ठेवावे? याबद्दल महत्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत. त्या नक्कीच फॉलो करा. आपल्या सर्वांसाठी त्या आवश्यक आहेत.

लहानपणी मुलाने वात्रट वागणे स्वाभाविक आहे आणि हा नैसर्गिक नियम आहे. घरचे वातावरण जसं असते, तसीच पुढे मुले होतात. म्हणून तुमची बदनामी तुमच्या मुलांवर लादू नका. या वयात मुले मनावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्यांना जे आवडते ते तेच करतात. यामध्ये पालकांची भूमिका कसी असावी ? हे महत्वाचं आहे.

पालकांनी मुलांशी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

१. मुलांशी मैत्रीपूर्ण नातं ठेवा

मुले आपल्या मनातली गोष्ट त्यांच्या मित्रांनाच सांगतात. एक मित्र त्याच्या दुसऱ्या मित्राशीच मनमोकळेपणाने बोलतो. कारण त्याला माहित असते की, यात कोणताही धोका नाही. तो आपल्या मित्राचं म्हणणे मनमोकळेपणाने ऐकतो. आणि मोकळेपणाने त्यावर उपाय सांगतो.

म्हणूनच प्रत्येक पालकाने आपल्या मुलांशी मैत्रीचे नाते ठेवले पाहिजे. त्यांनी या वयात काही चुका केल्या तर त्यांच्याशी मोकळेपणाने बोलावे. त्याच्याशी धमकावून बोलू नका. ते घाबरतील आणि ते तुम्हाला आपल्या समस्या नीट सांगणार नाहीत. मुलांच्या समस्या समजून घेण्यासाठी तुम्ही त्यांना समजून घेतले पाहिजे. त्यांना जवळ घेऊन त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवून, त्यांची समस्या काय आहेत, त्या जाणून घेतल्या पाहिजेत. असे केल्याने मुलं ही तुम्हाला आपल्या प्रत्येक गोष्ट शेअर करतील. 

२. मुलांवर तुमच्या अपेक्षा लादू नका.

लहानपणापासूनच मुलांवर अपेक्षांचा डोंगर लादून पालक मुलांना जबाबदारीच्या नावाखाली पायात बेड्या घालून ठेवतात. या अशा तुमच्या वागण्यामुळे मुलं शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या हतबल होतात. त्यांना त्यांचे निर्णय घेण्यात अनेक अडचणी येतात. ते प्रत्येक स्पर्धेला घाबरतात. आणि हे सर्व तुमच्या एका चुकीमुळे झालेले असते. म्हणून मुलांना आपली रोनीधोनी न सांगता, त्यांना जबादारीत न अडकवता. त्यांना स्वतंत्र स्पेस द्या.       

३. मुलांना त्यांची कामे करायला शिकवा

असे म्हटले जाते की सर्व प्राण्यांच्या मुलांमध्ये माणसाच्या मुलांना शिकण्यासाठी जास्त वेळ लागतो. कारण त्यांना इतर प्राण्यांच्या मुलांच्या तुलनेत बरेच ज्ञान आत्मसात करावे लागते. त्यामुळे त्यांना शिकण्यासाठी अधिक वेळ द्यायला हवा.

मुलांनी लवकर मोठं व्हावं. प्रत्येक गोष्ट लवकर शिकावी. त्यांना कोणतीही अडचण येऊ नये. असं पालकांना वाटतं. परंतु असा विचार करणे चुकीचे आहे. कारण मुल ही यंत्र नसून एक मांसाचा गोळा आहे. आणि त्यांच्या कडून अशी अपेक्षा करणे म्हणजे मुलांना त्यांची मानसिक वाढ होण्याची आधीच त्यांना काटणे असे होईल. त्यांना हळू हळू शिकू द्या. यावेळी त्यांना काही शिकण्यात अडचणी येत आहेत का? यावरती त्यांच्याशी हेल्दी संभाषण करा. आणि महत्वाचं हे सर्व करताना त्यांना त्यांची कामे करू द्या. तुला हे जमत नाही, ते जमत नाही, दे मी करून देते. असे म्हणू नका. त्यांची कामे त्यांनाच करू द्या. म्हणजे त्यांचा हळू हळू आत्मविश्वास वाढत जाईल.   
         
४. पालक आणि मुले यांच्यातील जनरेशन गॅप, यावेळी काय करावे?

पूर्वी तुम्ही टेलिफोनवर बोलायचे. परंतु आजची मुले अँड्रॉइड मोबाईल आणि इंटरनेटच्या फास्ट युगात जन्माला आली आहेत. त्यामुळे तुम्हा दोघांमध्ये प्रचंड जनरेशन गॅप आहे. म्हणूनच पालकांनी कधीही स्वतःची तुलना मुलांशी  करू नये. जोपर्यंत तुम्ही त्यांच्या जागी राहून, त्यांच्याप्रमाने त्यांच्याशी बोलत नाही, तोपर्यंत तुमचे आणि तुमच्या मुलांमध्ये हेल्दी नाते निर्माण होणार नाही. म्हणूनच, जर तुम्हाला तुमच्या मुलांशी हेल्दी नाते निर्माण करायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या मुलांमधील पिढीतील अंतर कमी करावे लागेल.

५. मुलांसोबत त्यांच्या आनंदाच्या क्षणांमध्ये वेळ घालवा

तुम्ही कितीही व्यस्त असाल, परंतु मुलांच्या आयुष्यात जेव्हा खास दिवस येतो, तेव्हा न चुकता आपली कामे बाजूला ठेवून, तो दिवस त्यांच्यासोबत राहा. त्यांना काय हवे आहे आणि काय नको याची काळजी घ्या. आई-वडिलांच्या आयुष्यात तुमचे महत्त्व त्यांच्या आयुष्यापेक्षा जास्त आहे, असे त्यांना वाटले पाहिजे. मुले आयुष्यभर असे क्षण लक्षात ठेवतात.

६. त्यांच्यासोबत खेळा

वेळ मिळेल तेव्हा मुलांसोबत खेळा. त्यामुळे दोघांमध्ये जो जनरेशन गॅप आहे, तो कमी होईल. एकत्र खेळल्याने तुम्ही दोघेही एकमेकांच्या जवळ येतील. असे केल्याने ते  इंटरनेटसारख्या आणि इतर वाईट गोष्टींपासून दूर होतील.

७. नवीन गोष्टी शिकण्यात मदत करा

मुलांना नवीन गोष्टी शिकणे कठीण जाते. अशा वेळी तुम्ही त्यांना आधार द्या. त्यांना कोणत्या समस्येचा सामना करावा लागतो आहे, याकडे लक्ष द्या आणि ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि ते कोणतेही कामे सहज करतील.

८. दररोज सकाळी आणि रात्री मुलांना जादूची झप्पी द्या

प्रत्येक मुलांची इच्छा असते की त्यांच्या पालकांनी दररोज किमान एक जादूची झप्पी द्यावी. ही झप्पी फक्त मुलांची झप्पी नसून ती मुलांना दिलेली सकारात्मक ऊर्जा असते. मुलं हा त्यांचा हक्क मानतात. या झाप्पीने दोघांमधील प्रेमाचे बंध इतके घट्ट होतात की, मुले कोणत्याही कठीण प्रसंगी आपल्या पालकांची आठवण ठेवतात आणि त्यांचा आदर करतात.


माझी पालकांना विनंती आहे की, आपल्या मुलांना संस्कारशील बनवणे सर्सवी आपल्या हातात आहे. जर तुम्ही मुलांच्या बाबतील निष्काळजी पणा दाखवला तर पुढे, तुम्हाला आणि समाजाला दोघांनाही त्रास सहन करावा लागेल. आणि याची उदाहरणे तुम्ही आजूबाजूला बघतच असाल.


       


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!