या जगात जन्म घेतल्यानंतर तुमच्या समोर जी महत्वाची गोष्ट समोर असते, ती म्हणजे आपले आरोग्य सुरक्षित कसे ठेवायचे? विषय खूप सोपा आहे, परंतु लोकांनी विनाकारणच कठीण करून ठेवला आहे.
म्हणूनच या ब्लॉगच्या माध्यमातून हा विषय सोपा करून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रहो मेहनत करण्याची तुमची तयारी असते, परंतु तुमचे शरीर आणि मन तुमच्या कंट्रोलमध्ये नसते. त्यामुळे तुमच्यापाशी आलेली संधी तुम्ही गमावून बसता. मित्रहो अशा गोष्टी तुमच्या भविष्यावर खूपच वाईट प्रभाव पाडतात. कधी कधी माणसं डिप्रेशनमध्ये जाऊन नको ते करून घेतात.
या साठी प्रत्येकेला प्रथम शिस्तप्रिय असणे फार गरजेच आहे. कारण माणूस विचार करतो एक आणि करतो नको ते भलतेच. यामुळे तुमची महत्वाची कामे अपूर्ण राहतात आणि मग नशिबाला दोष देत बसता. या गोष्टी खूपच निरर्थक आहेत. म्हणून एक यशस्वी मनुष्य बनण्यासाठी प्रथम शिस्तप्रिय असणे फार गरजेच आहे.
Read More : बाल संस्कार | घरातील भांडणं मुलांना बनवू शकतात कुमकुवत | बेस्ट टिप्स
म्हणूनच या ब्लॉगच्या माध्यमातून हा विषय सोपा करून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रहो मेहनत करण्याची तुमची तयारी असते, परंतु तुमचे शरीर आणि मन तुमच्या कंट्रोलमध्ये नसते. त्यामुळे तुमच्यापाशी आलेली संधी तुम्ही गमावून बसता. मित्रहो अशा गोष्टी तुमच्या भविष्यावर खूपच वाईट प्रभाव पाडतात. कधी कधी माणसं डिप्रेशनमध्ये जाऊन नको ते करून घेतात.
image credit to pexels.com
Read More : बाल संस्कार | घरातील भांडणं मुलांना बनवू शकतात कुमकुवत | बेस्ट टिप्स
आजच्या इंटरनेटच्या युगात काही गोष्टी अशा आहेत, त्याचा माणसाने अतिरेकच केला आहे. आणि अशा गोष्टी माणसाच्या शरीरावर आणि भविष्यावर वाईट प्रभाव पाडतात. म्हणून आयुष्य सुखात, सतत फ्रेश आणि सकारात्मक उर्जेने भरून कसे ठेवायचे असेल तर खाली दिलेल्या गोष्टी नक्कीच पालन करा.
स्वतःला दिवसभर फ्रेश आणि सकारात्मक उर्जेने भरून कसे ठेवायचे? How to keep yourself fresh and full of positive energy throughout the day?
१. बाहेरील जगापासून काही वेळ वेगळेच ठेवा :
स्वतःसाठी काहीतरी करण्यासाठी, काही ठराविक वेळासाठी लोकांपासून राहणेच योग्य ठरते. त्यांमुळे तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करून मनाला इतर भटक्या विषयांपासून दूर ठेवू शकता. त्याने तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहील. सतत फ्रेश राहण्याचा हा उत्तम मार्ग आहे.
२. आधुनिक गॅजेट्सपासून दूर राहणे :
आधुनिक काळात गरजेपुरते गॅजेट्स वापरणे योग्यच आहे. परंतु आज मनुष्य या गॅजेट्सचा व्यसनाधीन झाला आहे. एक वेळ कोणी खायला दिले नाही तर चालेल, परंतु गॅजेट्सपासून एक क्षण दूर रहा बोलूच नये. माझ्या मते योग्य तेव्हा या गॅजेट्सचा वापर नक्कीच करा. परंतु जेवढं होईल तेवढ यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
३. नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन टाळा :
नेटफ्लिक्स मनोरंजन क्षेत्रात लोकांचे मनोरंजन करते हे सत्य आहे. परंतु अशा गोष्टींनी आपल्याला मनाला आणि शरीराला सुरक्षित ठेवू शकत नाही. तुम्ही मनोरंजनमध्ये एवढे अडकून जाता की, तुमचा अमुल्य वेळ विनाकारण बरबाद होत आहे, हे विसरून जाता. अधिकांश याचा परिणाम झोपेवर दिसून येतो. त्यामुळे शरीर रोगी होते. अशा गोष्टी आपल्याला टाळणे गरजेचेच आहे.
४. स्वतःशी सकारात्मक संवाद साधणे :
स्वतःशी सकारात्मक संवाद साधणे हा मनाचा व्यायाम आहे. असे केल्याने मनामध्ये साचलेला दुःखाचा कचरा नष्ट होण्यास मदत होते. त्यामुळे आपण फ्रेशनेस अनुभवतो. काहीतरी विशेष करण्याची उर्जा संचारते.
५. शिस्तप्रिय व्यावहारिक वेळापत्रक पाळा :
स्वतःला प्रेरित करण्यासाठी आणि विनाकारण जाणारा वेळ वाया जाऊ नये म्हणून शिस्तप्रिय व्यावहारिक वेळापत्रक पाळणे फार आवश्यक आहे. तुम्हाला जीवनात काहीतरी करायचे असेल तर, शिस्तीला प्रथम प्राध्यान्य दिलेच पाहिजे.
६. नव-नवीन गोष्टी शिकत रहा :
स्वतःला फ्रेश आणि सकारात्मक उर्जेने भरून ठेवण्यासाठी सतत काहीतरी नवीन शिकत राहिले पाहिजे. सोशल मिडियावरती नको त्या व्हिडीओ बघण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा, चांगल्या आणि व्यायसायिक दृष्ट्या ज्ञान मिळवून देणाऱ्या व्हिडीओ बघणे योग्य ठरेल. सतत बुद्धीला चालना देत राहिले पाहिजे. नव-नवीन संशोधन करत राहिले पाहिजे. असे केल्याने तुमचा आळस दूर होईल आणि तुम्ही कामात व्यस्त राहाल.
मित्रहो जगात खूप काही आहे, त्याने तुमचे जीवन बदलू शकता. तुम्हाला फक्त आलेली संधी चुकवता नाही आली पाहिजे. वरती दिलेल्या सर्व गोष्टी या मनाला आणि शरीराला सकारात्मक उर्जेने भरून टाकतात. म्हणून या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनाचा भाग बनवा आणि आपले आयुष्य आनंदी करा.