वेल सेटल व्हायचं कस? लग्न जमत नाही - तरुणांना पडलेला गंभीर प्रश्न.

SD &  Admin
0


Well Settled व्हायचं कस? तरुणांना पडलेल्या या गंभीर प्रश्नावरती A Delight Life टीम आपल्या सर्व तरुण बांधवाच्या वतीने DNA टेस्ट करणार आहे. लेख आवडल्यास Like आणि Share करायला विसरू नका.

    वेल सेटल व्हायचं कस ? या वाक्यातील वेल सेटल्ड या शब्दानेच तरुणानांची पळता भुई होऊन जाते. तरुणींनी आणि त्यांच्या पालकांनी मांडलेल्या त्या वेल सेटल्ड शब्दामुळे तरुण वर्ग अक्षरशा: वैतागून गेलेलां आहे. याला सामाजिक परंपरा ही तितक्याच कारणीभूत आहेत. हुंडा पद्धतीमुळे मुलींचे बाप अगदी मेटाकुटीला येऊन जातात त्यामुळे त्यांना वाटत की, जर मुली बरोबर हुंडा ही तुमची मांगणी असेल तर मुलगा ही तसाच श्रीमंत, शिकलेला, जमीनदार आणि रुबाबदार पाहिजे आणि मग पुढे अटींचा खेळ सुरु होतो.

वेल सेटल व्हायचं कस? लग्न जमत नाही -  तरुणांना पडलेला गंभीर प्रश्न.
image credit to google.com  

मुलीं आणि पालकांच्या अपेक्षा

     १. मुलाचं स्वत:च्या मालकीचं आणि ते ही मोठ घर पाहिजे सोबत शेती ही हवी.

     २. मुलगा उत्तम शिकलेला आणि चांगल्या पगाराची नोकरी हवी. त्याचबरोबर त्याच घर ही पाहिजे. 

     ३. शक्यतो कुटुंब छोटे असावे ही मागणी. लग्नानंतर इतर कुटुंबियाची जबाबदारी घेण्यास नकार.

मुलीं आणि पालकांच्या अटी

     १. नोकरी मी वाटलं तर करेन पण नोकरी करच असा आग्रह करायचा नाही.

     २. मुलाची भरपूर शेती असावी परंतु शेतात काम करणार नाही.

    Well Settled व्हायचं कस ? या विषयावरती आपण प्रथम मुलांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते जाणून घेऊया नंतर या विषयाचे जाळें आपण सगळ्यांनीच मिळून कसे सोडवायचे यावरती चर्चा करूया.

    १. लग्नाला तीस वर्षे झाली तरी लग्न अजून जमत नाही. एखादी मुलगी बघायला गेलं तर प्रथम घरची शेती, मोठ घर, चांगला शिकलेला आणि उत्तम पगाराची नोकरी असेलला मुलगा पाहिजे, असे उत्तर मुलीकडचे बिनदास्त ठोकून देतात. मी एक चांगला शिकेलेला आणि बिन व्यसनी मुलगा आहे. पगार जास्त नाही परंतु घर मी उत्तम संभाळत आहे. जुनं घर आणि जेमतेम शेती आहे. म्हणून मुलीकडचे नकारा शिवाय दुसरे काहिच बोलत नाहीत.

    २. ग्रामीण भागातील एका मुलाची तक्रार अशी आहे. लहानपणापासुन गावातच वाढलो आणि आता २८ वर्षाचा घोडा झालोतरी अजून लग्न होतच नाही आहे. मुलींना गावातील मुलगा नको आहे. आई वडिलांचा एकटाच मुलगा असल्यामुळे गाव सोडून जाऊ शकत नाही. शेती जेमतेम आहे, परंतु माझं सुखी कुटुंब आहे. अनेक मध्यस्थीनां भेटून मुलगी बघण्यासाठी प्रतत्न केला तरी मुलींकडून उत्तर येते की मुलगा गावात राहणारा नको. शेतात काम करणाऱ्या मुलाशी मी लग्न करणार नाही.

    ३. या मुलाची विचित्र कहानी आहे. पदवीधर आहे, परंतु मुलगी देत नाही कारण असे की, मुलाला सरकारी नोकरी पाहिजे. गावात असेल तर चालणार नाही. शहरात स्वत: च्या घराबरोबर ती त्याच्या कुटुंबांपासून विभक्त राहणार. सासू सासऱ्यांची कटकट नको. मुलगी बारावी असली तरी चालेलं परंतु मुलीला मुलगा हा उच्च शिक्षित आणि पगारदार पाहिजे.

    वरील मुलांच्या प्रतिक्रियावरून समस्या अगदीच गंभीर आहे असे आपल्याला जाणून येते. या जगात कोणीही सर्वगुण संपन्न नाही आहे. तसेच एका मुलांमध्ये सगळेच गुण असणे अशक्यच आहे, हे आपण जाणताच असाल. मग मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी मांडलेल्या या अटी आणि अपेक्षा कितपत योग्य आहे. हे A Delight Life टीमला comment करून नक्कीच कळवायला विसरू नका.

Read More: नुकतच लग्न झालेली मुलगी जेव्हा सासरहून माहेरी येते | ए डिलाईट लाइफ

    Well Settled व्हायचं कस ? या तरुण मुलांसमोर गंभीर प्रश्न निर्माणच का झाला, याचे उत्तर आपल्याला प्रथम शोधायला पाहिजे. जेणेकरून आपण या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहचू शकू.

    यंदा बुंदी खाऊ घालतोस की नाय? असा प्रश्न सर्रास आपल्याला ऐकायला मिळतो आणि खरं तर अशा प्रश्नांना बिचाऱ्या पंचविसी गाठून पुढे गेलेल्या मुलांना नक्कीच येत असतो. कदाचित त्यांना याची लाज ही वाटत असेल आणि येणे पण स्वाभाविक आहे, कारण जर कोणी आपल्याला सतत एकाच प्रश्नाचा भडीमार करत असेल आणि त्याचे उत्तर त्याचेकडे नसेल तर तो बिचारा काय करेल, असुद्या.

    ग्रामीण भागातील सुरवातीचा काल हा सुवर्ण युगाचा होता असे म्हणावे लागेल. शेतकरी शेतात उत्तम पिकवत होता. शेत मालाला योग्य तो भाव मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी करण्याची गरज भासत नव्हती. शेतात काम करून तो उत्तम रित्या जीवन जगत होता. परंतु हरित क्रांती आणि धवल क्रांती उदयास आली आणि सुधारित बी- बियाणे, रासायनिक खते आणि औषधांच्या वापरामुळे पिक मोठ्या प्रमाणावर येऊ लागले. पूर्वी देश आपला अन्न धान्य आयात करणारा आता गहू व तांदळाचा प्रमुख निर्यात दार झाला.

    शेतमालाच्या प्रंचड उत्पादनामुळे साहजिक आहे भाव देखील घसरू लागले. त्यातच माणसाच्या चुकीमुळे सध्या वातावरणात अनेक बदल घडून येत आहेत त्यामुळे शेतीचे नुकसान मोठ्याप्रमाणावर होत आहे. त्यामुळे शेतात केलेली गुंतवणूक देखील शेतकऱ्याला मुद्दलासकट मिळणे अवघड झालेले आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजरी होऊन त्याला आत्महत्या करण्यास भाग पडते.

Read More: आम्हाला जगण्याचा अधिकार द्याल का ? Why do some of us enjoy torturing animals?

    हेच मुख्य कारण मुलांच्या भवितव्यावर घारी सारखे येऊन ठेपले गेले. मुलीचा बाप या मुळे आपली मुलगी गरीब कुटुंबात आणि शेतकऱ्याच्या घरात द्यायला घाबरू लागला आणि पुढे हीच मानसिकता वाढत जाऊन सत्यामध्ये उतरू लागली. एखादा मुलाचा बाप जेव्हा मुलगी बघण्यासाठी मुलीच्या घरी येतो, तेव्हा मुलीचा बाप प्रथम मुलाच्या बापाला अनेक प्रश्नांचा भडीमार करून सोडतो. मुलगा शेतकरी कुटुंबातील असला तरी चालेलं, परंतु त्याच बरोबर तो उच्च शिकलेला आहे का? त्याच्या पगाराची संख्या किती आहे? पर्मनंट आहे की पगारी आहे याची कसून चौकशी केली जाते. जर या मध्ये मुलगा बसत असेल तर बोलणी पुढे करा.. अन्यथा पुढच्या घरी व्हा.

    दुसरे कारण या गंभीर प्रश्नावरती खूप मोठा प्रभाव पाडत आहे आणि ते म्हणजे मुलींची दिवसें दिवस कमी होणारी संख्या. साहजिक आहे मुलांना मुली मिळणे खूपच अवघड झाले आहे. या समस्येला मुख्य जबाबदार हा समाज आणि पालक आहेत. मुला-मुलींच्या मध्ये भेदभावामुळे मुलींची गर्भामध्येच हत्या घडण्याचे क्रूर कर्म या समाजाकडून आणि पालका कडून होत आहे आणि याला पुरुषां बरोबर स्त्री ही तितकीच जबाबदार आहे. समाजाने आणि पालकांनी जर आपली मानसिकता बदलली तर या समस्येला नक्कीच सुधारता येईल.

समाजाची आणि पालकांची कोणती भूमिका असावी?

    Well Settled व्हायचं कस ? असा तरुणांना पडलेल्या प्रश्नावरती समाजाने आणि मुलींच्या पालकांनी जरूर विचार करायला हवा. संपत्ती असणे म्हणजे परिपूर्ण पुरुष होतो असा अट्टाहास करणे मुलींच्या पालकांनी सोडून देणे योग्यच ठरेल. वेल सेटल्ड याचा अर्थ असा नव्हे की, मुलगा पैशाने आणि संपत्तीने भरगच्च आहे. पैसा बरोबरो प्रामाणिक. कष्टाळू, समजदार आणि जबाबदारी संभाळणारा मुलगा ही आपल्या पत्नीला आणि आपल्या परिवाराला सुखी ठेवतो. प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे आहेच आणि ते उत्तर आपल्याकडे असूनही फक्त बाह्य सुखाच्या लोभा पायी आपण ते नाकारत असु, तर मात्र या समस्येला रोखणं खूपच अवघड आहे. प्रत्येकाने जरूर या वरती विचार करायला हवा. 

    मुलगा आणि मुलींच्या मध्ये भेदभाव विसरून दोघांनाही समान अधिकार देणे हे समाजाचे आणि मुख्यत: पालकांची जबाबदारी आहे कारण व्यक्ती आणि व्यक्ती मिळून समाजाची निर्मिती होत असते. जर तुम्ही यावरती विचार केलात तर, तरुणांना पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर शोधायची गरज भासणार नाही, तो आपोआप सुटणार आहे.






Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!