माणसाला त्याच्या आयुष्यावर म्हणजेच जगण्यावर खूप प्रेम आहे. त्याची प्रत्येक क्षणी हीच इच्छा असते की त्याने कायम जगावे. पण हे कधीच शक्य नाही. ज्याला जीवन प्राप्त झाले आहे, त्याचा मृत्यू निश्चितच आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, परंतु मृत्यू तुम्हाला कधीच सोडणार नाही.
विशिष्ट वेळेनंतर प्रत्येक जीवाचा मृत्यू होण्याची एक विहित प्रक्रिया आहे. म्हणूनच रडणे आणि ओरडणे काहीही चालणार नाही, परंतु तुम्हाला जे काही आयुष्य मिळाले आहे, ते तुम्ही आरामात आणि निर्धारित वयापर्यंत जगू शकता. मला असे म्हणायचे आहे की, आज मनुष्याच्या मूर्खपणामुळे तो त्याच्या निर्धारित वयाच्या आधीच आपला जीव गमावतो. तसे माणसाचे सरासरी वय 100 वर्षांपेक्षा जास्त असते. परंतु आजच्या परिस्थितीनुसार माणूस 60 किंवा 70 वर्षांच्या आतच स्वर्गवासी होतो आणि हे सर्व त्याच्याच कर्माचे भोग आहेत.
image credit to pexels.com
आरोग्याकडे कमी लक्ष दिल्याने माणसाची ही अवस्था झाली आहे. दररोजचे धावपळीचे जीवन, कशाचाही विचार न करता अन्न खाणे. त्याच्याकडे उठण्याचे आणि झोपण्याचे वेळापत्रक नाही. स्वतःच्या आरोग्यापूर्वी धन राशीला नेहमीच महत्त्व देणे. यामुळे माणसाचे वय दिवसेंदिवस कमी होत आहे.
या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन, आम्ही तुम्हाला असे उपाय सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमचे आयुष्य वाढवू शकता. पण हा उपाय तुम्हाला एक दिवस, एक महिना नव्हे तर, रोजच करावा लागणार आहे, याची काळजी घ्यावी लागणार आहे. तरच तुम्हाला त्याचा फायदा मिळेल.
Read More : पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे : महिलांसाठी कच्ची पपई फायदेशीर
या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन, आम्ही तुम्हाला असे उपाय सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमचे आयुष्य वाढवू शकता. पण हा उपाय तुम्हाला एक दिवस, एक महिना नव्हे तर, रोजच करावा लागणार आहे, याची काळजी घ्यावी लागणार आहे. तरच तुम्हाला त्याचा फायदा मिळेल.
Read More : पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे : महिलांसाठी कच्ची पपई फायदेशीर
आयुष्य हेल्दी आणि निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?
१ . आपल्या निरोगी शरीरासाठी रात्री लवकर झोपणे आणि पहाटे लवकर उठणे खूप महत्वाचे आहे.
२. दररोज कमी अन्न खा. दिवसातून एकदाच जेवण घ्या. कधीकधी दोन दिवसातून एकदाच खावे. रात्रीचे जेवण झोपण्याच्या दोन ते तीन तास आधी करावे.
३. थेट सूर्यप्रकाश चेहऱ्यावर पडू देऊ नका. पंधरा मिनिटांपेक्षा जास्त काळ सूर्यप्रकाश चेहऱ्यावर पडू देऊ नका.
४. वर्षातून एकदा चौदा दिवस किंवा त्याहून अधिक दिवस उपवास करा. हे करताना घाई करू नका. त्याची तयारी करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती घ्या, त्यानंतर त्याचा पूर्ण सराव करा. पुढे तुम्हाला दिसेल की, हे तुम्हाला आनंद देईलच.. सोबत एक वेगळा अनुभव देखील देईल.
५. मुलांना जन्म वयात आल्यानंतरच द्या. तत्पूर्वी कुटुंबातील माणसांसोबत वेळ घालवा आणि त्याचा आनंद घ्या.
६. दररोज दहा मिनिटे ध्यान करा.
७. ज्यांनी तुम्हाला दुखावले असेल त्यांना माफ करा. हा एक वय वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. रक्तदाबही कमी होईल.
८. धूम्रपान पूर्णपणे बंद करा.
९. दररोज ४५ मिनिटांपेक्षा जास्त चालले पाहिजे. हे आठवड्यातून चार दिवस केले पाहिजे. इतर दिवशी व्यायाम करा. अशा प्रकारे तुमच्या हृदयाचे स्नायू मजबूत होतील. मेंदूची क्रिया वाढेल.
१०. दररोज दातांची काळजी घ्या. दातांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. दिवसातून दोनदा हळूवारपणे ब्रश करा.
११. कमी खा किंवा शक्यतो आट्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ नका.
१२. नेहमी हसत आणि आनंदी राहणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते.
महत्वाची टिप्स :
जर तुम्ही डाएट करत असाल तर, प्रथम तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण चुकीचा आहार तुमच्या शरीराला हानी पोहोचवू शकतो. आपल्या निरोगी शरीरासाठी आहार प्लान आणि शरीराच्या क्षमतेनुसार आहार घेणे आवश्यक आहे.