भारतीय तरुणाईची ऑनलाईन प्रेमाच्या शोधात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या मध्ये तरुणींचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. वाढत्या ऑनलाईन सर्विसमुळे सगळी तरुणाई ऑनलाईन पद्धतीने कामे करत असते. या मध्ये डेटिंग अॅप्सचे युजर मोठ्याप्रमाणावर वाढत आहेत. २०१८ मध्ये डेटिंग अॅप चे युजरमध्ये तिपटीने वाढ झाली होती. आणि आताच्या रीपोर्ट नुसार मोठ्या प्रमाणावर तरुणाई ह्या डेटिंग अॅपच्या मदतीने आपल्या जोडीदाराचा शोध घेण्यात व्यस्त आहे.
गुगलने रिसर्च केलेल्या रिपोर्ट नुसार डेटिंग अॅपची वाढ गेल्या वर्षभरात ४० टक्क्यांनी झाली आहे, असे नमूद करण्यात आले आहे. डेटिंग अॅपचे मार्केट येत्या पाच वर्षात दहा कोटी डॉलर्सच्या घरात जाईल असा तज्ञाचा अंदाज आहे.
image credit to pexels.com
डेटिंग अॅप चे मार्केट येत्या पाच वर्षात दहा कोटीच्या घरात
इंटरनेट आणि स्मार्ट फोनसारख्या स्मार्ट तंत्रज्ञानामुळे भारतीय तरुणाई जास्त प्रभावित होत आहे. या तंत्रज्ञानामध्ये डेटिंग अॅप चे युजर झपाट्याने वाढत आहे. यामध्ये तरुणाई आपल्या जोडीदाराचा ऑनलाईन पद्धतीने शोध घेत असते. ऑनलाईन पद्धतीने चेक करतात आणि त्यांची भेट घेतात. अशा ऑनलाईन पद्धतीने चेक करून जोडीदार निश्चित केला जातो. भारतामध्ये मुंबई, बेंगलोर, दिल्ली या मोठ्या मेट्रो महानगरामध्ये हा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर रुळू लागला आहे.
Tinder, Truly Madly, OkCupid हे सुरु झालेलं डेटिंग अॅप्स तरुणाईचे पसंदिस उतरले आहेत. आणि आता नुकतेच लौंच झालेले Bumble,Tantan सारखे डेटिंग अॅपचे तरुणाईचे लक्ष वेधत आहे. सध्या भारतात डेटिंग अॅप्स युजर हे २ कोटी ८७ लाख पेड युजर्स आहेत तर १ कोटी ८७ लाख फ्री युजर्स आहेत.
Read More : सुखी विवाहित जीवनासाठी लव मेरेज की अरेंज मेरेज बेस्ट आहे.
Read More : सुखी विवाहित जीवनासाठी लव मेरेज की अरेंज मेरेज बेस्ट आहे.
Tinder या २०१६ साली लौंच झालेल्या डेटिंग अॅपने येथे चांगलाच जम बसवला आहे. ह्या डेटिंग अॅपवर दरोरोज ७५ लाख स्वाईपची नोंद होते.
भारतामध्ये दिवसेंदिवस उच्चशिक्षित आणि स्वालंबी तरुणाईची संख्या वाढत चालली आहे. त्याचबरोबर इंटरनेट आणि स्मार्ट फोनसारख्या स्मार्ट तंत्रज्ञानामुळे पारंपारिक पद्धीतीने विवाह करण्याचा ट्रेंड कमी होत असून ऑनलाईन पद्धीतीने डेटिंग अॅपच्या मदतीने जोडीदार शोधण्याचा कल वाढत आहे.
डेटिंग अॅपच्या वापरामध्ये तरुणाकडून ८० टक्के होतो तर तरुणीचे प्रमाण हे २० टक्के आहे, तरी सध्या तरुणींचा कल झपाट्याने वाढत आहे. डेटिंग अॅप कंपनीकडून तरूणाईना आवश्यक फीचर्स या अॅप्समध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्याच बरोबर त्यांना अनेक आवश्यक प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात. त्यामागे ह्या डेटिंग अॅपचा प्रयत्न हा असतो की, तरुण-तरुणीमध्ये विचारांची देवाणघेवाण मुक्त पणे व्हावी.
डेटिंग अॅपच्या युजर्समध्ये वाढ होत असल्यामुळे कंपन्यांना मोठ्या प्रमणात नफा होताना दिसत आहे. अनेक विकसित शहरामध्ये ह्या डेटिंग अॅप चे युजर मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. हे अॅप्स स्थानिक भाषेत ही उपलब्ध होत असल्यामुळे युजर्सची संख्या वाढत आहे. जसे, हिंदी, मराठी, मल्याळम, तामिळ, तेलगु, पंजाबी.
पारंपारिक पद्धतीचा त्याग करत ऑनलाईन पद्धतीच्या वापर या मुळे काही प्रमाणात गैरप्रकार वाढत आहेत. परंतु त्याचे प्रमाण अद्याप कमी आहेत. त्याच बरोबर सुरक्षित म्हणून डेटिंग अॅप्स कंपन्यां खबरदारी ही घेत आहेत. बरोबर युजर्सला ही तसी कल्पना दिलेली असते.
हेल्दी टिप्स
सामान्यपणे दोन स्त्री-पुरुषाला एकत्र आणण्याचे काम हे डेटिंग कंपन्या करत असतात. आणि हे जरी चांगले असले, तरी समाजातील कमी दर्जाची आणि वाईट विचार करणारी लोकं याचा गैरफायदा घेतात. त्यामुळे डेटिंग अॅप्सच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला पार्टनर बनवून घेताना आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा पुढे नको त्या संकटाना सामोरे जावे लागते, हे प्रत्येकाच्या लक्षात असायला हवे आहे.