सुखी विवाहित जीवनासाठी लव मेरेज की अरेंज मेरेज बेस्ट आहे.

SD &  Admin
0


पूर्वी लग्नाचे दिवस खूप उत्साही असायचे. ज्यांच्या घरी लग्न असायचे ते घर पताका, डेकोरेशन, माणसांनी बहरून जायचे. पाहुण्यांची ये जा १५ ते २० दिवसा आधीच सुरु होत असते. होणाऱ्या वधू-वराकडे  बहुतेक करून संपर्क साधण्यासाठी मोबाईल वगैरे काहीही साधन नसायचे, त्यामुळे बिचारी ती दोघं फक्त स्वप्नातच एकमेकांना भेटत असायची. एक दुसऱ्याबद्दल नवीन नवीन कल्पना तयार करून ही मंडळी लग्नाच्या बोहल्यापर्यंत पोहचत असत.

    आजच्या लग्नाची गोष्ट पूर्वीच्या लग्नापेक्षा कितीतरी पटीने वेगळी आहे. पूर्वी जसे मुला - मुलींची लग्न जमवण्यासाठी आई वडील, इतर नातेवाईक मध्यस्थी करायचे, तसे आज कमी होताना दिसत आहे. मॅट्रिमोनियल  साइट्स आज तरुण मुलां-मुलींसाठी मध्यस्थीची चांगली भूमिका बजावत आहेत. त्यामुळे आज मुलगा-मुलगी स्वत:च एक दुसऱ्याला पाहून, एक दुसऱ्याची पसंदी ठरवून लग्नापर्यंत पोहचतात.

    आज लग्नाच्या बाबतीत सर्व काही शक्य झाले असले तरी, अनेकांना एक प्रश्न नक्कीच भेडसावून जातो आणि तो म्हणजे, सुखी वैवाहिक जीवनासाठी लव मेरेज की अरेंज मेरेज बेस्ट आहे?

    प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी दोन बाजू कारणीभूत ठरत असतात. त्यामुळे लग्नासारखी महत्वपूर्ण घटना देखील यातून वगळता येत नाही. सुखी वैवाहिक जीवनासाठी लव मेरेज की अरेंज मेरेज बेस्ट आहे हे जाणण्यापूर्वी लग्नाच्या दोन बाजू  जाणून घेणे गरजेचं आहे. जेणे करून तुम्ही समजून जाल की दोघांमध्ये बेस्ट कोण आहे.

सुखी विवाहित जीवनासाठी लव मेरेज की अरेंज मेरेज बेस्ट आहे.
image credit to google.com  

लग्नाची पहली बाजू  - अरेंज मेरेज
    
    अरेंज मेरेज हे घरच्यांच्या मध्यस्थीने जुळवून आलेले असते, म्हणून होणाऱ्या वधु–वराला एकमेकांबद्दल कमी माहिती असते. दोघांना जाणून घेण्यास पुरेसा वेळ नसतो. पहिल्याच भेटीत किंवा पुढे मागे सात ते आठ दिवसात एकमेकांना हो किंवा नाही उत्तर द्यावे लागते, त्यामुळे वधू–वराला एकमेकांबद्दल जाणून घेण्यास कमी वेळ मिळतो. त्या दोघांना आपल्या घरच्यांच्यावरती विश्वास ठेऊन लग्नाला उभे रहावे लागते. त्यामुळे दोघांच ही मन लग्नांबद्दल घाबरून गेलेलं असते. खास करून वधूला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. घरातील  लोकं स्वभावानं कशी असतील? सासू–सासरे कसे असतील? आपल्याला व्यवस्थित समजावून घेतील की नाही? नवऱ्याचा स्वभाव मायाळू की रागीट असेल? तो तिला समजावून घेइल की नाही? अशा किती तरी प्रश्नांना तिला सामोरे जावे लागते. अरेंज मेरेज मध्ये एक प्रोब्लेम्स हा असतो की सुरवातीला दोघांमध्ये विश्वास हा कमी असतो. दोघं ही सुरुवातीला अपरिचित असल्यामुळे थोडासा देखील विश्वासाला तडा गेला तर, ते लग्न टिकवण्यास खूप अडचणी येतात.

लग्नाची पहली बाजू  - लव मेरेज

    याच्या थोडसं उलट लव मेरेजच असते. लग्न हे परिवाराला न विचारता केलेलं असते, म्हणून दोन्ही ही परिवार त्यांच्या वरती नाराज असतात, त्यामुळे त्या जोडप्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागते. परिवारा शिवाय एकट राहून दोघांना संसार करावा लागतो. जर दोघांमध्ये कोणते प्रोब्लेम्स निर्माण झाले तर सोडवायला कोणीही येत नाही. जर दोघंही वेगवेगळ्या धर्माचे असतील तर एकमेकांच्या धार्मिक भावनांचा, चालीरितींचा, परंपरांचा स्वीकार करावा लागतो. जर हे याच्या उलट झाले तर दोघांमध्ये भांडणे होणे साहजिक आहे. आणि मग लग्नाचा शेवट कुठ पर्यंत जाईल हे ते दोघं आणि ईश्वरच सांगू शकेल.

Read More: मुलींना प्रपोज करण्याच्या बेस्ट ट्रिक : Best trick to propose a girl

    त्याचबरोबर लग्न लव मेरेज झालेलं आहे आणि दोन्ही परिवारांनी ते लग्न स्वीकार ही केलं तरी, काही प्रमाणात वधूला काही गोष्टींना अड्जेस्ट करावे लागते . पहिल्यांदाच घरात पाऊल ठेवताना घरातील सगळ्यांचा आदर ठेवावा लागतो. कोणाच्या विरोधात जाऊन काम करणे तिला धोक्याचे असते. काही चुका झाल्यास त्या कामाबद्दल चिडवत राहणे हे तिच्यासाठी सहन करावे लागणार हे नक्की. प्रत्येक गोष्ट सहन केल्याशिवाय तिच्याकडे पर्याय नसतो कारण तिला माहेरच दार कायमच बंद झालेलं असते. त्यामुळे तिला घरातील सगळ्यांशी अड्जेस्ट करणे भाग पडते.

लग्नाची दुसरी बाजू - अरेंज मेरेज

    अरेंज मेरेज लग्नाचामध्ये एक फायदा होतो, तो म्हणजे लग्न अधिक काल टिकून राहण्यासाठी सेक्युरिटी मिळते. दोन्ही घरच्यांची समाजामध्ये इज्जत जाऊ नये म्हणून दोन्ही ही परिवार हे लग्न टिकवण्यास जागरूक असतात. नवऱ्या- मुलीला जरी एकमेकांबद्दल कमी माहिती असली तरी, लग्नाबद्दल एकमेकांना उत्सुकता नक्कीच असते. दोघांनी अनेक स्वप्न बघितलेली असतात. ती सत्यात आणण्यासाठी दोघं ही प्रयत्नशील असतात.

    घरातील मंडळी ही नवीन वधूचे आनंदाने स्वागत करतात. तिला सगळ्या गोष्टी येई पर्यंत, समजावून सांगणे, शिकवणे हे सर्व घरचे मंडळी आवर्जून वधूला मदत करत असतात. लग्नाच्या काही दिवसानंतर जर कदाचित दोघांमध्ये भांडणे वैगरे झाली तर, दोन्ही ही परिवारातील मंडळी एकत्र येवून ते भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे लग्न शेवट पर्यंत टिकण्यास मदत मिळते.

लग्नाची दुसरी बाजू  - लव मेरेज

    लव मेरेज बद्दल बोलायचे झाले तर, लव मेरेज देखील वधू–वरासाठी फायदेशीर ठरत असते. लव मेरेज हे दोघांनी एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांना जाणून घेऊन लग्नापर्यंत पोहचेलेल असते. साहजिक आहे याचा फायदा दोघांना ही वैवाहिक जीवनात होत असतो. दोघं ही एकमेकांच्या आवडी – निवडी, तो काय करतो, काय नाही करत, त्याचा किंवा तिचा मूड नसेल तर काय करावे म्हणजे आपला पार्टनर खुश होईल, याची परीपूर्ण जाणीव दोघांना असते. त्यामुळे नाजूक परीस्थित ते एकमेकांना समजावून घेतात. घरातील मंडळीकडून जर काही त्रास होत असेल तर, दोघं ही एकमेकांना साथ देतात . कोणताही निर्णय घेण्यापूर्वी दोघं ही विचार विनिमय करून अंतिम स्थराला जातात. त्यामुळे  लव मेरेजमध्ये देखील विश्वास पूर्ण नातं असेल तर अरेंज मेरेज प्रमाणे शेवट पर्यंत टीकतं.

महत्वाच्या कोणत्या गोष्टी आहेत.

    लग्न हे लव मेरेज की अरेंज मेरेज असो, लग्न हे लग्न असते. लग्न जमण्याआधी किंवा प्रेम होण्याआधी दोघांच्या ही मनाने तयारी केली होती, म्हणून तुम्ही लग्नापर्यंत पोहचता. याचा अर्थ असा की लग्न हे लव मेरेज किंवा अरेंज मेरेज ने झालेलं आहे हे महत्वाच नसते, महत्वाचे असते ते म्हणजे भावना, प्रेम आणि मुख्य म्हणजे एकमेकांवरील विश्वास. विश्वास एक असा धागा आहे तो भावनांना आणि प्रेमाला बांधून ठेवत असतो. तो जर कमकुवत असेल तर लग्न कशा ही प्रकारे झालेले असो, ते लग्न काही दिवसाचं किंवा काही महिन्याचं हेच खरं.

Read More : एखादी व्यक्ती खरच तुमच्या प्रेमात आहे, हे कसं ओळखावं

    म्हणून लग्नाच्या उंबरठ्यावरती असणाऱ्यानी हा नक्कीच विचार करायला हवा की, लग्न हे लव मेरेज किंवा अरेंज मेरेज असो, शेवटी लग्न हे लग्न असते. तुम्हाला लग्नानंतर  हा विचार करायला हवा की, आपलं दोघांच विश्वासपूर्ण नात असावं. संसारात भांडण, वाद- विवाद हे होतच असतात. परंतु तुम्ही जर ते विश्वासने सोडवायला गेला तर नक्कीच त्यातून मार्ग मिळेल आणि तुमचं वैवाहिक जीवन सुखी होईल…  



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!