बाजारातील पॅकेटबंद दूध गरम करावे की नाही?

SD &  Admin
0


बाजारातील पॅकेटवाला दूध गरम करायचे की नाही? कधीतरी लोकांच्या मनात याबाबत प्रश्न निर्माण झालाच असेल आणि येणे स्वाभाविक आहे. आजकाल बरेच लोक बाजारात मिळणारे पॅकेट दूध पितात. हे दूध जास्त तापमानाला गरम करून नंतर थंड केले जाते.या संपूर्ण प्रक्रियेला पाश्चरायझेशन म्हणतात. पाश्चरायझेशन दूध हे खुल्या दुधापेक्षा चांगले मानले जाते. कारण हे दूध जास्त तापमानाला गरम केले जाते, त्यामुळे त्यात असलेले हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात.

बाजारातील पॅकेटबंद दूध गरम करावे की नाही?

    परंतु उघड्यावर मिळणारे दूध पिण्याआधी खबरदारी घेणे आवश्यक असते. अन्यथा ते तुमच्या शरीराला घातक ठरू शकते. कारण उघड्यावर मिळणाऱ्या दुधात बॅक्टेरिया जास्त असतात. म्हणूनच हे दूध व्यवस्थित गाळून उकळले पाहिजे. तरच ते पिण्यास योग्य होईल. असे न केल्यास हे दूध लवकर खराब होते किंवा गोठते.

पॅकेटवाला दूध गरम करून प्यावे की नाही?


बहुतेक लोक पॅकेटवाला दूध घरी आणल्यानंतर, ते पुन्हा पुन्हा गरम करत राहतात. कारण दूध पुन्हा-पुन्हा गरम करून ते दूध बराच काळ वापरता येते. काही लोकांच्या मते पॅकेटवाला दूध पिऊ नये. परंतु या प्रश्नाचे एकच उत्तर देतं येईल आणि ते म्हणजे पॅकेटवाला दूध जास्त वेळ गरम करू नये.

Read More : पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे : महिलांसाठी कच्ची पपई फायदेशीर 

कारण पॅकेटवाला दूध आधीच जास्त गरम केलेले असते. त्यामुळे त्यात असलेले बॅक्टेरिया मृत झाले असतात आणि हे दूध बॅक्टेरियामुक्त आणि संरक्षित असते. हे दूध पुन्हा गरम केल्यास त्यातील पोषक तत्वे कमी होतात किंवा नष्ट होतात.

लक्षात ठेवा:

सर्व प्रथम, घरच्या उघड्या दुधात अधिक बॅक्टेरिया असतात, म्हणून ते फिल्टर आणि गरम करणे आवश्यक असते. तरच ते आरोग्यासाठी चांगले राहील. परंतु पॅकेटवाला दुधात कोणतेही बॅक्टेरिया नसतात, कारण ते आधीच गरम केले असते. त्यामुळे तुम्हाला हे दूध पुन्हा पुन्हा गरम करण्याची गरज नसते. परंतु तुम्ही जे पॅकेटवाला दूध आणले आहे, त्यावर लिहिलेली एक्सपायरी डेट माहित असणे आवश्यक आहे. हे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने माहिती असणे आवश्यक आहे.

तरीही मित्रहो.. बाजारातील दुध पिण्याआधी त्याची तपासणी करणे आवश्यक आहे, कारण आजकल कंपनीज  दुधात भेसळ मोठ्या प्रमाणात करत असतात. त्यामुळे ते आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. WHO च्या रिसर्च नुसार येत्या काही ३ ते ४ वर्षात भारतात भेसळ युक्त दुधाचे सेवन केल्याने ८०% पेक्षा अधिक लोकांना कर्करोग होण्याची शक्यता आहे, असा सावधनतेचा इशारा दिला आहे.  .     



       




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!