आज सगळ्यांच्याच मनावर दबाव आणि टेन्शन असते. विशेषत: स्त्रियांच्या मनावरचा ताण पुरुषांपेक्षा जास्त असतो. महिला सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामात व्यस्त असतात. सकाळी पती आणि मुलांसाठी नाश्ता बनवणे, त्यांना नाश्ता दिल्यानंतर त्यांचा जेवणाचा डबा तयार करणे, कुटुंब मोठे असेल तर सासू-सासरे यांची काळजी घेणे. मुलांना शिकवणे, त्यांच्याकडे लक्ष देणे. हे सर्व फक्त महिलांनाच करावे लागते. या धावपळीच्या जीवनात त्यांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. ती तिच्या संसारात इतकी गुंतून जाते की तिला स्वतःलाही एक जीवन आहे, हे विसरते.
महिलांनी कुटुंबासोबतच स्वतःचाही विचार केला पाहिजे. त्यांनी स्वत:साठी सेल्फ केअर हॅबिट्स करायलाच पाहिजे. आज या दुषित वातावरणामुळे मानवी शरीर लवकर आजारी पडते. त्यामुळे अशा वातावरणात जगायचे असेल तर सेल्फ केअर हॅबिट्सला वेळ द्यायला हवा. जेव्हा तुम्ही स्वतः सेल्फ केअर हॅबिट्स अंगीकाराल, तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना आणि कुटुंबाला त्याच सवयी लावाल.
या लेखात महिलांसाठी सेल्फ केअर हॅबिट्सच्या खास सवयी सांगितल्या आहेत. मला आशा आहे की मी दिलेली माहिती तुमच्या जीवनात बदल घडवून आणेल.
महिलांसाठी स्वत:ची काळजी घेण्याच्या खास सवयी
१. पहाटेच्या सवयी
सुखी-आनंदी दिवसासाठी सकाळ चांगली असावी. सकाळी लवकर उठणे निरोगी आरोग्यासाठी खूप चांगले असते. सकाळी आंघोळ केल्यावर देवाचे स्मरण करणे खूप महत्वाचे आहे, यामुळे मनाला अपार शांती मिळते. ध्यान हा एक उत्तम मार्ग आहे, जो आपल्याला मन स्थिर करण्यास मदत करतो. सकाळी काम करताना एखादं गाणं ऐकलं तर खूप छान वाटतं. मनाला खूप छान वाटतं. जर तुम्ही कॉफी आणि चहा पीता आहात तर ते सोडा आणि एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू टाकून प्या.
सकाळी व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर वेळ घालवत असाल तर लगेच सोडून द्या. नुकतेच केलेल्या संशोधनानुसार अशा गोष्टींचा वापर मर्यादित असावा, अन्यथा आपण आयुष्यात बरेच काही गमावतो. व्हॉट्सअॅप आणि फेसबुक ऐवजी आरोग्य आणि मनःशांती देणारी पुस्तके वाचू शकता. ही पुस्तके तुमचे ज्ञान वाढतात.
२. व्यायाम
व्यायामामुळे शरीरासोबत मनही निरोगी होते. जर तुम्ही सकाळच्या वेळी व्यायामाला रुटीनमध्ये आणले तर दीर्घकाळ निरोगी राहू शकता. आजच्या बायकांचा असा विश्वास आहे की त्यांना सकाळी वेळ मिळतच नाही. पण जर तुम्हाला जिममध्ये जायचे नसेल तर पार्कमध्ये फिरण्याच्या नावाखाली फिरायला जाऊ शकता. तुम्ही भाजीपाला किंवा मुलांना शाळेत सोडण्यासाठी कारने जाता, त्या ऐवजी तुम्ही त्यांना पायी सोडायला जाऊ शकता. सेल्फ केअर हॅबिट्समध्ये व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे जे तुम्हाला दिवसभर सक्रिय ठेवते.
Read More : निरोगी जीवनासाठी स्वयं-शिस्त कशी अंगीकारावी?
३. नाश्ता वगळू नका
रात्रीच्या ८/१० तासांच्या झोपेनंतर, आपल्याला सकाळी नाश्ता आवश्यक आहे. हा नाश्ता आपल्याला दिवसभर ऊर्जा देतो. नाश्ता आरामात बसून करा. महिलांना एकसाथ अनेक कामे करण्याची सवय असते, त्यामुळे आरामात खुर्चीवर बसून नाश्ता करा. सकाळी हलका नाश्ता केला तर उत्तम. ऑम्लेट हा सकाळचा सर्वोत्तम नाश्ता आहे, तो पचायला सोपा असतो आणि त्यातून आपल्याला प्रथिनेही मिळतात.
४. पूर्ण झोप निरोगी आयुष्य
दिवसभर काम केल्यानंतर पूर्ण झोप घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. त्यामुळे तुमच्या मेंदूला विश्रांती मिळते. प्रत्येकाने दिवसभरात ८ तासांची झोप घेणे अत्यंत गरजेचे आहे. रात्री लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे, ही लोकांची धारणा आहे आणि ती बरोबरही आहे. निरोगी शरीरासाठी चांगली झोप घेणे खूप महत्वाचे असते.
५. सकारात्मक विचार करा
तुम्ही दिवसाची सुरुवात फक्त सकारात्मक विचारांनी करा. सकारात्मक विचार हा तुमच्या मनाचा एक सुंदर व्यायाम आहे. तुम्ही जे काही काम कराल आणि ते सकारात्मक विचारांनी करा. तर ते काम त्याच वेळी अर्धे पूर्ण होते.
मला महिलांसाठी सुंदर टिप्स द्यायची आहे. या टिप्स प्रत्येक स्त्रीकडे असाव्यात. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करताना ती इतकी दमते की तिला ‘नाही’ म्हणायला वेळच मिळत नाही. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची मागणी वेग-वेगळी असते आणि ती पूर्ण करणे तुम्ही तुमची जबाबदारी मानता. पण मला असे म्हणायचे आहे की, जर सतत नको त्या मागण्या असतील तर "नाही" म्हणायला काय हरकत आहे? तुमच्या कुटुंबातील लोकांना कळले पाहिजे की त्यांच्यामुळे तुम्ही अस्वस्थ आहात. का कोणास ठाऊक, कदाचित तुमच्या कुटुंबातील लोकांना तुमच्या मनाची अवस्था समजून येईल. आणि ते तुम्हाला तुमच्या कामात मदत करतील. कधी कधी स्वतःचा विचार करणे खरच आवश्यक आहे. कारण या जगात कुणाचं कोणाला काही देणं-घेणं नसते. तुम्ही त्यांना जेव्हा दाखवून द्याल की, तुमच्यामुळे त्यांना त्रास होत आहे, तेव्हाच कुठे ते भानावर येतात.