आपल्यात शिस्त असणे खूप गरजेचे आहे. शिस्त ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे. परंतु आज आपण कधीही उठतो, कधीही झोपतो, कधीही खातो. अशा सवयी आपल्या शरीरासाठी खूपच हानिकारक असतात. अशा सवयींमुळे आपण सतत आजारी पडतो. त्यामुळे आपल्यामध्ये आळस निर्माण होतो. शरीर सतत आजारी राहते आणि आपण लवकर वृद्धत्वाकडे जातो.
अक्षय कुमारचे नाव तुम्ही ऐकले असेलच. तो एक मोठा फिल्मस्टार आहे. कामात कितीही व्यस्त असला तरी, तो कधीही शिस्त मोडत नाही. पहाटे 4.30 वाजता उठणे आणि रात्री लवकर झोपणे. तसेच त्याच्या जेवणाचे वेळापत्रक ही शिस्तबद्ध असते. काय खावे, कधी खावे, कसे खावे या त्याच्या शिस्तीमुळे आज हा माणूस वयाच्या ५५ व्या वर्षीही ३० वर्षांच्या मुलासारखा दिसतो. यामागे त्याची कठोर स्वयं-शिस्त आहे. जी त्याच्या निरोगी आयुष्याचे रक्षण करते.
मित्रहो या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्या अंगात स्वयं-शिस्त असायला हवी. याच स्वयं-शिस्तीच्या मदतीने आपण एक निरोगी आणि संपन्न आयुष्य जगू शकतो. यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यांचे जीवनात पालन करणे गरजेचं आहे. पाहूया त्या कोणत्या गोष्टी आहेत.
image credit to pexels.com
मित्रहो या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्या अंगात स्वयं-शिस्त असायला हवी. याच स्वयं-शिस्तीच्या मदतीने आपण एक निरोगी आणि संपन्न आयुष्य जगू शकतो. यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यांचे जीवनात पालन करणे गरजेचं आहे. पाहूया त्या कोणत्या गोष्टी आहेत.
स्वयं-शिस्तने निरोगी आयुष्य कसे जगावे? Self-discipline is good for healthy Life
१. जास्त टीव्ही पाहणे टाळाटीव्हीवर कार्यक्रम बघून तुमचं मनोरंजन होतं, ते योग्यच आहे आणि असायला हवं. रोजच्या धावपळीच्या जीवनात काही तरी मनोरंजन व्हायला हवे. परंतु मला सांगायचे आहे की, करमणूक किती प्रमाणात असावी? या कडे ही लक्ष असायला हवे आहे. काहींना एक सवय असते, एखादा कार्यक्रम पाहिल्यानंतर तो पुन्हा पुन्हा पाहणे. कार्यक्रमाच्या वेळेवर काहीच मर्यादा नसणे. आवडते म्हणून वेळेला बरबाद करणे, दुसरे काही नाही. आजकाल लोकं नेटप्लेक्सचा जास्त मर्यादापलीकडे करत आहेत. असे केल्याने तुम्ही तुमच्या आयुष्यातील चांगला वेळ विनाकारण वाया घालवता.
२. चांगलं जीवन जगण्यासाठी निरोगी शरीर असलं पाहिजे - त्यासाठी व्यायाम आवश्यक आहे
जीवनात आपण आपल्या शरीराकडे जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे. ही आपली जीवन संपत्ती आहे. आणि या संपत्तीला वाचवण्यासाठी दररोज व्यायाम करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही दररोज ४ ते ५ किलोमीटर धावत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे.
Read More : निरोगी राहण्यासाठी जेवल्यानंतर काय करू नये आणि काय करावे
Read More : निरोगी राहण्यासाठी जेवल्यानंतर काय करू नये आणि काय करावे
३. कधी ना कधी एकांतात दिवस काढा
रोजच्या धावपळीच्या व्यतिरिक्त कधी ना कधी एकांतात दिवस काढा. असे केल्याने मन शांत होईल. काहीतरी नवीन करण्याला प्रेरणा मिळेल. ही कला प्रत्येकाने अवगत केली पाहिजे. जर तुम्ही दिवसाचे 1-2 तास हे केले तर, तुम्ही तुमचे आयुष्य चांगले जगण्यासाठी सक्रिय कराल.
४. आधुनिक गॅजेट्सपासून दूर राहा
आजच्या जगात गॅजेट्सपासून दूर राहणे खूप कठीण आहे. आणि या गॅझेटशिवाय तुमचे कामच होऊ शकत नाही, हे ही तितकच सत्य आहे, याची मला कल्पना आहे. परंतु तुम्हाला गॅझेटचा वापर किती प्रमाणात करायचा आहे, यावर आपण मर्यादा घालू शकतो. याच्या मदतीने तुम्ही इतर चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकता.
५. ऑनलाइन चॅटिंगवर मर्यादा
आजच्या पिढीला एक दिवस अन्न सोडायला सांगितले तर, ते सोडून देतील. परंतु मोबाईलवर गप्पा-टप्पा मारणे, चॅटिंग करणे ते कधीच सोडू शकणार नाहीत. आज लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत लोकं ऑनलाइन चॅटिंग करतात. येथे जर, व्यवसायाच्या संदर्भात केले असेल तर, ती एक वेगळी गोष्ट आहे. परंतु मित्रांशी विनाकारण बोलणे, अश्लील मेसेज पाठवणे, अशा गोष्टीत वेळ वाया घालवणे काय उपयोग आहे? हा तुमचा पूर्ण वेळ बरबाद आहे. हा संपूर्ण वेळ तुमचे मौल्यवान आयुष्य पूर्णपणे वाया घालवतो. आता तुम्हीच विचार करा की तुम्हाला काय करायचे आहे.
६. व्यावहारिक जीवनाच योग्य नियोजन करा
आपल्या दैनंदिन कामाचे नियोजन करणे देखील एक स्वयं-शिस्त आहे. तुम्ही दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या सर्व उपक्रमांचे नियोजन ठरवले तर, तुमचा वेळही वाचेल आणि अतिरिक्त नियोजनही करता येईल.
७. चांगली झोप घेणे महत्वाचे आहे
एक चांगले आरोग्य लाभण्यासाठी चांगली झोप घेणे ही आवश्यक आहे. अर्ध झोप माणसाला रोगी बनवते. ती व्यक्ती सतत आळसाने आपले आयुष्य खराब करते. हे सगलं टाळण्यासाठी दररोज पूर्ण झोप घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे शरीर तणावमुक्त होईल आणि तुम्ही दिवसभर न थकता आपली कामे कराल.
आज स्वयंशिस्त अंगीकारणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्हाला दीर्घायुष्य जगायचे असेल तर, कोणत्याही परिस्थितीत स्वतःमध्ये शिस्त अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. शिस्त तुम्हाला सुरुवातीला नक्कीच त्रास देईल, पण जसजशी तुम्हाला सवय होईल, तसतशी तुम्ही तुमच्या मनात शिस्त आत्मसात कराल. आणि मग तुम्ही एक निरोगी स्वयं-शिस्त जीवन जगाल.