Tya Mantarlelya Raani Marathi Kavita By Spruha Joshi

SD &  Admin
0


सं म्हटल्या प्रमाणे कवितेचे अर्थ अनेक असू शकतात. तुम्ही त्या कवितेकडे कोणत्या नजरेने बघता हे तुमच्या भावनिक बुद्धीवर अवलंबून आहे. या कवितेत ही तसेच आहे. तुम्ही येथे कोणाला समोर ठेवून कवितेकडे बघता हे सर्सवी तुमच्यावर अवलंबून आहे.

    मी निसर्गप्रेमी असल्यामुळे त्या मंतरलेल्या रानी या कवितेला नुकतच जन्माला आलेली कळी म्हणजेच फुल, या नवजात कळीच्या अंतर्मनाला झालेली वेदना ती कशी आपल्या निसर्गमातेला सांगत आहे, असा मी विचार करत आहे. 

त्या मंतरलेल्या रानी मराठी कविता | Tya Mantarlelya Raani | कवयित्री : स्पृहा जोशी
Poem Content and image Credit to Spruha Joshi

त्या फुलाला (कळीला ) जन्म घेताना किती यातना सहन कराव्या लागतात हे, उन-पाऊस, वारा, धरतीवरचं प्रदूषण अशा भयानक आंधीला टक्कर देत वाढत असते. यात आपल्या निसर्गमातेल उद्देशून ती किती त्याला साथ देत आहे, ते सांगत आहे. अत्यंत भावूकपणे निसर्गाला घट्ट मिठी मारत उंच भरारी घेत आहे. येथे ती आपल्या माता-पित्याला सांगत आहे की, उंच भरारी घेताना माझा हात सोडू नकोस. मी परत येईल तेव्हा, तुम्ही असेच माझी वाट पाहत रहा.

Read More: बकुळ मराठी कविता | Bakul Marathi Kavita | कवयित्री स्पृहा जोशी

    खरं तर.. त्या मंतरलेल्या रानी या कवितेत खूप काही वर्णन केले आहे. मी फक्त सारांश सांगितला आहे. तुम्ही या कवितेतून काय घेता हे तुम्हीच ठरावा.

        त्या मंतरलेल्या रानी मराठी कविता | कवयित्री स्पृहा जोशी यांची कविता | मधुर कविता                                     

त्या मंतरलेल्या रानी

मन हळवे वेड स्वरांचे

कळ सोसत आज मुक्याने

झेलते दु:ख जन्माचे

सावल्यान् मागुनी वाटा

पळ्तात रोधुनी श्वास

फरफटते नशीब अवघे

तरीही सम्पेना आस

फुलण्याआधीच कितीदा

कोमेजुन मोहोर जाई,

अंताचे नकोच ओझे

उगमाची एकच घाई!

या मंतरलेल्या रानी

आरसा असे डोहाचा

खळबळते लाट जराशी

चेहरा हसे काळाचा!

विस्तीर्ण नभाच्या खाली

धरती निजलेली शांत

मी अवघडले बावरले

तू घेता हाती हात…

मी काजळ भरले डोळा

अस्फुट अंधुकशा रेषा

बोललो जरी ना काही

डोळ्यांची कळली भाषा…

तो पहिला स्पर्श अनामिक

तो पहिला श्वासही ओला

मन माझे मोहरले हे

अन् उर धपापुन आला

मी उंच उंच जाताना

तू धरला माझा हात

मी फिरून आले खाली

मिठीच्या या विळख्यात…

दाटून काहीसे येते

का दूर दूर जाताना

मी फिरून येईन तेव्हा

तू असाच असशील, हो ना???

        
                                                    कवयित्री : स्पृहा जोशी 



आभार आणि क्रेडीट 

या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला Tya Mantarlelya Raani कवितेचा कंटेंट कवयित्री स्पृहा जोशी यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम  ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.

The content of Tya Mantarlelya Raani poem published in this blog is by Poet Spruha Joshi. A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem







Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!