विवाहाच्या आधी प्रत्येकाला आपली प्रियेसी चंद्रमुखीसारखी वाटत असते. स्वभाव निखळ प्रेमळ, प्रामाणिक वाटत असतो. परंतु लग्नानंतर हीच प्रियेसी राग आल्यानंतर ज्वालामुखीच रूप धारण करते आणि तुम्हाला सलो की पलो करून सोडते.
या लेखामध्ये आम्ही तुम्हाला पत्नीचा स्वभाव तुम्हाला कोणत्या रुपात मिळू शकतो, या बद्दल आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे.
तुमच्या पत्नीचा स्वभाव कोणत्या रुपात असू शकतो?
१. शिग्रकोपी पत्नी:
या रूपातील पत्नी अती शिग्रकोपी असते. छोट्या छोट्या करणावरून तिला खूप राग येत असतो. जर तिच्या मना विरुद्ध तुम्ही कोणती गोष्ट केली, तर त्या अचानक ज्वालामुखी रूप धारण करतात.
२. संशय खोर पत्नी:
या प्रकारातील पत्निया एवढ्या संशयी असतात की, त्या चक्क CID रूपातच नवऱ्याला भेटतात. त्यांच नवऱ्यावर एवढ बारीक लक्ष असते की, त्या नवऱ्याला देवच वाचवेल. म्हणून नवऱ्या लोकांनी या पत्नियापासून सावध असावे.
पत्नी कोणत्याही स्वभावाची असो. पती कडे जर प्रेमाची जादूची छडी असेल तर, पत्नीला तुम्ही कोणत्याही स्वभावातून शांत स्वभावात आणू शकता.
३. चहाडखोर पत्नी:
या नावावरून तुम्ही ओळ्खल असेल की, या प्रकारच्या पत्निया कशा असू शकतात. या इकडचे तिकडे, तिकडचे इकडे करायला माहीर असतात. विनाकारण दोन लोकांना लढविण्यात यांना आनंद वाटत असतो.
४. इर्शाळू पत्नी:
इर्शाळू पत्निया पतीचे डोके खाण्यात खूपच माहीर असतात. जर तीने कुठल्या बाईच्या अंगावरती दागिने बघितले आणि ते तिच्याकडे नसावे. पुढे जे होईल त्यातून नवऱ्याला देवच वाचवेल. ती नवऱ्याला त्या प्रकारचे दागिने घेण्यासाठी सारखी ससेमीरा लावत असते.
५. डोक्यावर बसणारी पत्नी:
या प्रकारच्या पत्निया बहुत करून श्रीमंत घरून आलेल्या असतात. त्या एवढ्या आळसी असतात की, घरची सगळी कामे नवरदेवालाच करावी लागतात. स्वतःला मात्र आयतं खायला पाहिजे. अशा प्रकारच्या पत्निया स्वतःलाच जास्त किंमत देत असतात.
कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव हा जन्म:च आलेला नसतो. त्या व्यक्तीला परिस्थिती आणि घरचे संस्कार बदलायला मजबूर करतात.
६. बहाणेबाज पत्नी:
या प्रकारच्या पत्निया खोटे बहाणे करण्यात अत्यंत पटाईत असतात. जर कधी सासरची मंडळी जास्त प्रमाणत त्यांच्या घरी येणार असतील तर, या खोटं आजारीपणाचं नाटक करून अंथरून धरून बसतात.
७. डोके खाण्याऱ्या पत्नी:
या प्रकारच्या पत्निया नवऱ्याचं डोकं खाण्यातच त्यांना धन्य वाटत असते. नवरा कामावरून घरी आल्या आल्या काही ना कही गोष्टीचं निमित्त करून नवऱ्याचं विनाकारण डोक खात असतात. या शेजारनीने हे म्हटल, ते म्हटल काहीही कारण नसताना नवऱ्याशी वाद करणे, या प्रकारच्या पत्नींना खूपच आवडते.
८. खर्चिक पत्नी:
या प्रकारच्या पत्निया या नावावरूनच आपल्याला समजल असेल. अशा पत्निया खूप खर्च करत असतात. यांची नजर नेहमी पतीच्या पॉकेटवर फिरत असते. अशा वेळी या पत्नीया मस्का लावण्यात पटाईत असतात. पतीला चांगले चांगले जेवण करून घालणे. त्यांचे हात पाय दाबणे, अशा कित्येक प्रकारे मस्का लावत असतात.
९. गर्विष्ठ पत्नी:
अशा पत्नींचं नाक नेहमी वरच्या दिशेला असतं. पतीने काहीही तिच्यासाठी घेऊन आणलं, तरी त्या संतुष्ट नसतात. त्या मध्ये काही ना काही त्रुटी काढत असतात. हे काय आणलं. ते काय आणलं. हे काय असलं उचलून आणलं. हॉटेल मध्ये गेल्या नंतर ही, हे कसल्या हॉटेलमध्ये घेऊन आलात. अशा प्रकारच्या पत्नींना पतींनी आणलेल्या कोणत्याच गोष्टी पसंद पडत नाहीत.
Read More : सुखी विवाहित जीवनासाठी लव मेरेज की अरेंज मेरेज बेस्ट आहे.
१०.ऑफिसर पत्नी:
अशा प्रकरच्या पत्निया श्रीमंत घरातून आलेल्या असतात. यांना नेहमी ओर्डर देण्याची सवय असते. हे द्या मला. ते द्या मला. जिथे बसतील तेथून फक्त ओर्डर देत असतात
"जसा जमीनीतून स्वच्छ झरा उमटतो, तसा प्रेमाचा झरा हा माणसाच्या संस्कारातून उमटत असतो."
मित्रहो माणसाचा स्वभाव आहे, तो चुकणारच. आणि हे पत्नीच्याच बाबतीत होतं असे नाही, तर पती ही अशा प्रकारचे नौटंकी करण्यात पटाईत असतात. म्हणून नातं टिकवण्यासाठी दोघांचीही गरज आहे. स्वभाव कधीही बदलला जातो. जर तुम्ही विश्वासाने, प्रेमाने आणि शिस्तीने नातं टिकवलं तर तुमचा पार्टनर ही तुम्हाला साथ देईल.