चालणे आरोग्यासाठी उत्तम व्यायाम आहे. शरीर निरोगी ठेवायचे असेल तर, आठवड्यातून ४ ते ५ तास चालणे आवश्यक आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार, चालण्याने तुमच्या आयुष्यातील तासांची संख्या वाढते असे पाहण्यात आले आहे. आणि आज डॉक्टर असो किंवा संशोधक आरोग्यासाठी दररोज चालण्यास सांगत असतात.
चालण्या संबधी संशोधक सांगत असतात, जेव्हा तुम्ही चालत असता, तेव्हा तुमचे पाय लहान करून जलद चालत रहा. जर तुम्ही आळस धरून चालत राहिल्यास, त्याचा शरीराला काहीच फायदा होणार नाही. जर तुम्ही आठवड्यातून ४ ते ५ तास कोणताही आळस न आणता, चालत असाल तर तुम्ही तुमच्या शरीराचे आरोग्य चांगले ठेवू शकता.
चालताना तुम्ही मोकळ्या हवेत श्वास घेता, त्यामुळे तुमच्या शरीराला भरपूर ऑक्सिजन मिळतो. तसेच तुमचे वजनही कमी होते. जेव्हा तुम्ही १ किमी चालता, तेव्हा तुम्ही १०० कॅलरीज खर्च करता. त्यामुळे तुमच्या शरीराला लठ्ठ होण्यापासून संरक्षण मिळते, त्याशिवाय तुमच्या धमन्याही मजबूत होतात. चालण्याने मधुमेह कमी होण्याची शक्यता असते. ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांना चालणे हा उत्तम व्यायाम आहे. तुमच्या पाठ दुखीसाठीही हा व्यायाम उत्तम कारगीर आहे.
Read More : निरोगी जीवनासाठी स्वयं-शिस्त कशी अंगीकारावी?
असे म्हटले जाते की, जे लोक दर आठवड्याला १५ ते २० किलोमीटर चालतात, त्यांचे आयुर्मान ४०% वाढते. मी तुम्हाला येथे सांगू इच्छितो की, जर तुम्ही आधीच चालत असाल तर, ते तुमच्यासाठी खूप चांगले आहे. परंतु ज्या लोकांना चालण्याची सवय करायची आहे, ते पहिल्या आठवड्यात फक्त २ ते ३ किलोमीटर चाला आणि मग तुम्हाला जस जशी सवय होत जाईल, तसे तुम्ही किलोमीटर वाढवत राहा.
लक्षात ठेवा, चालताना तुम्ही तणावमुक्त होऊन चाला आणि तुमचे शरीर फ्री ठेवा. अशाप्रकारे जर तुम्ही तुमच्या जीवनात दररोज काम करत राहिलात तर, तुम्ही तुमच्या निरोगी आयुष्याकडे वाटचाल सुरू करता.
मित्रहो.. जीवन निरोगी ठेवण्यासाठी आणि शतायुषी होण्यासाठी हा लेख नक्कीच वाचा. तुम्हाला तुमचा इकिगाई नक्कीच भेटेल.
इकिगाई : IKIGAI दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी लोकांचे रहस्य