दररोज घाम येण्याचे शरीराला होणारे फायदे
१. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास फायदा होतो
शरीरात टॉक्सिन्स असणे म्हणजे शरीराला हानी पोहोचवणे. म्हणूनच जर तुम्हाला आयुष्यभर निरोगी राहायचे असेल तर, तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणे आवश्यक आहे. आपल्या त्वचेच्या छिद्रांमधून घाम येतो, ज्यामुळे आपली छिद्रे स्वच्छ होतात आणि आपली त्वचा दीर्घकाळ सुंदर आणि तरुण राहते.
२. चांगले हार्मोन्स वाढतात
शरीरातून घाम बाहेर पडल्याने चांगले हार्मोन्स तयार होतात. तुमच्या कधीतरी लक्षात आले असेल, जेव्हा तुम्ही व्यायाम करता किंवा कठोर परिश्रम करता, तेव्हा काही वेळाने फ्रेश आणि आनंदी वाटते. रात्री चांगली झोप लागते. हे सगलं घाम आल्याने होत असते.
३. शरीरातील वेदना कमी होतात
शारिरीक परिश्रमामुळे चांगले हार्मोन्स तयार होतात. जे आपल्याला शारीरिक वेदना कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे कधी कधी तुम्हाला शारीरिक वेदना जाणवतात, तेव्हा नक्कीच हलका व्यायाम किंवा मेहनत करा.
४. किडनी स्टोनचा धोका कमी होतो
जर तुम्ही दररोज थोडासा घाम बाहेर काढला तर, किडनी स्टोनसारखे आजार कमी होतात. याचं कारण म्हणजे, मेहनत केल्याने घाम येतो, त्यावेळी घामासोबत मीठही बाहेर पडतं. हे मीठ किडनी स्टोनसाठी किती घातक ठरू शकते हे तुम्हाला माहीत नाही. जेव्हा मीठ शरीरात राहते, तेव्हा ते हाडांमधून बाहेर पडणाऱ्या कॅल्शियमशी एकत्रित होते आणि मूत्रपिंडात दगडांच्या रूपात जमा होते. त्यामुळे आपली किडनी धोक्यात येते.
५. ताप आणि सर्दीपासून आराम मिळतो
संशोधनात असे आढळून आले आहे की, घामामध्ये डर्मसिडीन नावाचे पेप्टिसाइड असते, जे नकारात्मक ऊर्जा
आणि विषाणूंना आकर्षित करते. जेव्हा आपण शरीरातून घाम बाहेर फेकतो तेव्हा ताप, सर्दीसारखे आजार दूर होतात.