ट्रॅवल करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

SD &  Admin
0


प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी ना कधी तरी प्रवास नक्कीच करत असतो आणि तो केलाच पाहिजे. कारण प्रवासामुळे आपल्याला नवीन नवीन गोष्टींची माहिती मिळते. आजकाल लोक वर्षातून एकदा तरी स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय प्रवास करतात. परंतु प्रवास करताना अधिकांश लोकं अनेक चुका करतात आणि मग त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

ट्रॅवल करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

    जेव्हा तुम्ही एखाद्या अनोळखी शहरात किंवा देशात जाण्याचा विचार करता, तेव्हा त्या शहराची किंवा देशाची माहिती अगोदर मिळवणे आवश्यक असते. जसे की, त्या देशातील किंवा शहरातील लोक कसे आहेत, खानपान , नैसर्गिक ठिकाणे, वाहतूक इ. त्यांच्याबद्दल काळजीपूर्वक माहिती घेणे आवश्यक आहे. त्या सर्व गोष्टींची काळजीपूर्वक काळजी घेतल्यास प्रवास करताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही.

Read More : कोंकणातलं निसर्गाचं मनमोहक दृश्य | डिलाईट लाइफ स्टाईल

    या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रवासापूर्वी आणि प्रवासानंतर कशी काळजी घ्यावी याबद्दल माहिती देत ​​आहोत, जर तुम्हाला माहिती योग्य वाटली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

देश - विदेश ट्रॅवल करण्याआधी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?


१. इको-फ्रेंडली देशांना भेट द्या

जर तुम्ही प्रवासाचा विचार करत असाल तर, असे देश निवडा जे इको-फ्रेंडली असतील. तुम्ही नवीन देश निवडला असेल तर, तेथील निसर्गरम्य लोकेशन कोणती आहेत. तेथील लोकं कशी आहेत, हे प्रथम पडताळा.  आइसलँड, स्वित्झर्लंड, न्यूझीलंड, कोस्टा रिका आणि समोआ सारख्या देशांना प्राधान्य द्या, जे इकोफ्रेंडली आहेत.

२. इको-फ्रेंडली राहण्याची जागा पहा 

जर तुम्ही परदेशात फिरायला जात असाल तर, केवळ पर्यावरणपूरक निवासालाच प्राधान्य द्या. अनेक वेळा लोक बाहेर जातात तेव्हा कुठे राहायचे आणि काय खायचे हेच त्यांना माहीत नसते. तेथे गेल्यावर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणूनच तिथे जाण्यापूर्वी , फक्त पर्यावरणपूरक जागेलाच निवडा.

३. ग्रीन टूर कंपन्यांना प्रथम प्राधान्य द्या 

प्रवास करण्यापूर्वी, तुम्हाला ज्या टूर कंपन्यांमधून प्रवास करायचा असेल, तर प्रथम त्यांची माहिती घ्या. त्या टूर कंपन्या इको-फ्रेंडली ग्रीन सपोर्टर असाव्यात याला बहुतेकजण प्राधान्य देतात. ग्रीन सपोर्ट कंपन्या पर्यटकांची चांगली काळजी घेतात. 

४. सार्वजनिक ट्रान्स्पोर्टचा वापर करा

ज्या देशाबद्दल तुम्हाला माहिती नाही, त्या देशाबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर, तुम्ही बहुतेक पायी किंवा सार्वजनिक ट्रान्स्पोर्टलाच प्राधान्य द्या. कोणत्याही अनोळखी खाजगी वाहनाने कोणत्याही माहितीशिवाय प्रवास करू नका. मुख्यतः सार्वजनिक वाहतुकीलाच प्राधान्य द्या, ते तुमच्यासाठी सुरक्षित असेल.

५. पुन्हा वापरता येण्याजोग्या वस्तू पॅक करा

इतर देशांत कचरा न टाकणे ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी असते. म्हणूनच बाहेर पडताना, पुन्हा वापरण्यायोग्य वस्तूच निवडा. प्लास्टिकसारख्या गोष्टींपासून दूर राहा. तुमची शॉपिंग बॅग फक्त कपड्यांचीच असावी.

६. गैरवर्तन करू नका

दुसऱ्या देशात गैरवर्तन करणे तुम्हाला महागात पडू शकते. कोणत्याही प्रकारची हिंसा, छेडछाड, त्या देशाची कोणतीही वस्तू तोडणे इ. अनैसर्गिक कृत्ये तुम्हाला त्या देशात कायमचे परत येण्यासाठी बंदी किंवा तेथे दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. म्हणून हे टाळण्यासाठी, एक जबाबदार पर्यटक म्हणूनच ट्रॅवल करा.

७. घरच्यांना माहिती द्या

तुम्ही कुठे फिरत आहात, या बद्दल घरच्यांना आधीच माहिती द्या. किंवा त्या देशात तुमचे फ्रेंड किंवा नातेवाईक असतील तर, त्यांच्याशी संपर्कात रहा.

८. कुणाशी जास्त संबध ठेवू नका   

ट्रॅवल करताना शक्यतो लोकांशी जपूनच संबध ठेवा. कुणीही तुमच्या एकटेपणाचा फायदा घेऊ शकतं. तेव्हा कुणाशी जेवढं काम असेल तेवढच बोला.       

तसेच आपल्याकडे जास्त पैसे आहेत, असे वागू नका. संभवता: तुमच्यावर कुणाची नजर असू शकते. 

    मित्रानों वरील टिप्स तुम्ही फॉलो केल्यातर, तुमच्या पुढे उभ्या राहण्याऱ्या समस्यांना तुम्ही सहजतेने सामोरे जाल. तुम्हाला कोणतीही भीती वाटणार नाही. आणि तुम्ही प्रवासाचा मनसोक्त आनंद घ्याल.     




   
   


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!