गर्लफ्रेंडच्या आई-वडिलांना पहिल्यांदा भेटायचे आहे आणि तेही लग्नाबद्दल बोलायचे आहे, मग काय हृदयाचे ठोके जरा जास्तीच वाढले जातात. कोणत्याही मुलासाठी हा दिवस वर्षानुवर्षे लक्षात राहील असाच असतो. गर्लफ्रेंडच्या आई-वडिलांना भेटण्याच्या पहिल्या दिवसाची रात्र तुमच्यासमोर अनेक प्रश्न ठेवते. कसं बोलावं, कोणते कपडे घालावे, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ई. प्रकारच्या प्रश्नांच्या विचारात तुम्ही रात्र घालवता. आणि असे प्रश्न पडणे साहजिक आहे. परंतु काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर, तुमची ही पहिली भेट नक्कीच संस्मरणीय होईल. या लेखात तुम्हाला याच विषयावर उपाय देण्यात आला आहे, जो तुम्हाला अशा वेळी नक्कीच उपयोगी पडेल.
image credit to google.com
गर्लफ्रेंडच्या पालकांना इम्प्रेस करण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात?
१. तुमच्या गर्लफ्रेंडला तिच्या पालकांच्या स्वभावाबद्दल विचारा
त्या व्यक्तीशी कसे बोलावे हे आपल्याला स्वभावाने कळते. कणखर माणसाशी कसे बोलावे आणि समजूतदार माणसाशी कसे बोलावे. जर तुम्हाला याची माहिती आधीच मिळाली तर, पहिल्या भेटीत तुमचा आत्मविश्वास वाढतो. माणसाचा बोलण्याचा चांगला स्वभावच त्याला चांगला माणूस होण्याचा परवाना देतो. म्हणूनच जाण्यापूर्वी ही युक्ती नक्कीच करा.
२. गर्लफ्रेंडद्वारे तुमच्या प्रेमाबद्दल त्यांच्यापर्यंत निरोप द्या.
हा एक चांगला आणि सोपा मार्ग आहे. जर गर्लफ्रेंडच्या पालकांना आधीच माहित असेल की, ते प्रेमात आहेत, तर तुम्ही पहिल्या भेटीत त्यांच्याशी बोलण्यास घाबरणार नाही. तुमच्या मनात एक विश्वास असेल की, त्यांना तुमच्याबद्दल सगलं काही माहिती आहे. या विश्वासाने तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलाल.
हा एक चांगला आणि सोपा मार्ग आहे. जर गर्लफ्रेंडच्या पालकांना आधीच माहित असेल की, ते प्रेमात आहेत, तर तुम्ही पहिल्या भेटीत त्यांच्याशी बोलण्यास घाबरणार नाही. तुमच्या मनात एक विश्वास असेल की, त्यांना तुमच्याबद्दल सगलं काही माहिती आहे. या विश्वासाने तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलाल.
३. ड्रेस साधा आणि फॉर्मल असू द्या
पहिल्या भेटीत मॉडर्ण आणि रंगीबेरंगी कपडे घालणे टाळा. गर्लफ्रेंडच्या पालकांना तुमच्या दिसण्यापेक्षा तुमचा स्वभाव, राहणीमान आणि सहनशीलता अधिक महत्वाची वाटते.
पहिल्याच भेटीत त्यांना बाबा म्हणणे चुकीचे ठरेल आणि त्यांनाही चुकीचे वाटेल. त्यामुळे या नावाऐवजी तुम्ही त्यांना सर किंवा मॅडम म्हणू शकता. ते तुमच्या आणि त्यांच्यासाठी अनुकूल असेल. नाते पक्के झाल्यानंतर त्यांना आई-बाबा म्हणता येईल.
४. मोबाईल बंद ठेवा
जर तुम्ही गर्लफ्रेंडच्या पालकांना पहिल्यांदा भेटत असाल तर, तुम्ही तुमचा मोबाईल बंद ठेवा. वारंवार मोबाईल वाजल्याने त्यांच्या मनात शंका निर्माण होऊ शकते. कदाचित त्यांना असेही वाटू शकते की, या मुलाचे बाहेर दुसरे अफेअर तर नाही ना? म्हणूनच मोबाईल बंद करणे तुमच्यासाठी योग्य ठरेल.
५. नम्रपणे बोला
तुमच्या शब्दात शिष्टाचार असणे अनिवार्य आहे. जर चुकून तुमच्या गर्लफ्रेंडच्या आई-वडिलांचा आवाज उठला असेल, तर तुम्ही त्यांच्यासारखी चूक करू नका. तुम्ही त्यांना विचारपूर्वक आणि मोठ्या प्रेमाने उत्तर द्या. यामुळे त्याच्या मनात तुमच्यासाठी एक चांगला मुलगा असल्याची प्रतिमा नक्कीच दिसून येईल.
६. खोटे बोलू नका
तुम्ही कितीही खोटे बोलले तरी, ते कधी ना कधी पकडले जाणारच. म्हणूनच तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते त्यांना प्रामाणिकपणे सांगा. गर्लफ्रेंडच्या आई-वडिलांना प्रभावित करा.. पण खोटे बोलून नव्हे तर, तुमची खरी स्थिती सांगून. खरे बोलतांना कोणी घाबरत नाही आणि भविष्यात खोटे बोलल्याचा पश्चाताप होणार नाही.
७. रिकाम्या हाताने जाऊ नका
पाहुण्याला रिकाम्या हाताने जाणे शोभा देत नाही. आणि जर तुम्ही गर्लफ्रेंडच्या पालकांना भेटायला जाणार असाल तर नक्कीच काहीतरी गिफ्ट घेवून जा. या गोष्टीची काळजी घ्या, ती महाग किंवा विचित्र वस्तू असू नये.
मीटिंग संपल्यानंतर तुमच्यासमोर कोणतीही परिस्थिती असू शकते. कदाचित तुमचा अपमान झालेला असू शकतो. परंतु अशा वेळी तुम्ही तुमचा संयम अजिबात गमावू नका. निघताना त्यांना मनापासून, प्रेमाने आणि हसत-हसत निरोप द्या. यातून चांगल्या आणि सुसंस्कृत मुलाचे गुण दिसून येतात.
...... तुम्हाला नक्कीच सकारात्मक प्रतिसाद मिळेल.....