थंडीच्या दिवसात व्यायाम केल्याने आजारांपासून कसं दूर राहता येते?

SD &  Admin
0


गळ्या ऋतूंपैकी थंडीचा ऋतू सर्वांनाच त्रास देतो. या ऋतूत रोगराईच्या आणि थंडीच्या  भीतीने सर्वजण हैराण झालेले असतात. प्रत्येकाला सर्दी, फ्लू सारखे आजार होतात. हिवाळ्यात त्वचे संबंधित समस्या सर्वांनाच सतावतात. हिवाळ्यात फुटलेले ओठ आणि पाय, विशेषतः महिलांना त्यांच्या पायांची रोजच काळजी घ्यावी लागते. या ऋतूत डॉक्टरांकडे जाणे हे ठरलेलेच असते. एवढी भीती या दिवसात सगळ्यांनाच वाटत असते. परंतु जर थंडीच्या दिवसात तुम्ही काही ठराविक गोष्टीचं पालन केलत तर, तुम्ही अशा समस्यांपासून दूर राहू शकता.

जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत . ज्या तुम्ही न चुकता थंडीच्या दिवसात केल्यात, तर बहुतांशी समस्यांना दूर पळवू शकता.


थंडीच्या दिवसात आजारांपासून दूर राहण्यासाठी काय करावे?
image credit to pexels.com 


थंडीच्या दिवसात आजारांपासून दूर राहण्यासाठी काय करावे?
   

थंडीच्या दिवसात आजारापासून दूर राहण्यासाठी स्वतःला दररोज एक नियमित दिशा देणे गरजेचं आहे. यामध्ये तुमचा व्यायाम असेल, मानसिक आरोग्यासाठी योग आणि आसने, दररोज ४ ते ५ किलोमीटर धावणे आणि ऋतूनुसार योग्य आहार. हे तुम्ही योग्य मेंटेन केले तर, तुम्हाला कोणत्याही ऋतूत हेल्दी राहता येईल.      

१. योग आणि व्यायाम

थंडीच्या दिवसात निरोगी राहण्यासाठी योग आणि व्यायाम खूप मदत करतात. दररोज योगासने आणि व्यायाम केल्याने तुम्ही ताजेतवाने दिसता. तसेच तुमचे स्नायू मजबूत होतात. ज्यामुळे आजार तुमच्यापासून दूर पळतात. शक्यतो घरी किंवा जिममध्ये व्यायाम करा. जर या दिवसात तुम्हाला काही त्रास होत असेल तर, बाहेर व्यायाम करू नका. तसेच या ऋतूत बाहेर अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते.

२. खूप पाणी प्या

थंडीच्या दिवसात तहान लागत नाही, त्यामुळे लोक कमी पाणी पितात. पण या ऋतूत शरीराच्या गरजेनुसार पाणी प्यावे. त्यामुळे तोंडात ओलावा टिकून राहतो. थंडीच्या दिवसात तुम्हाला तहान लागत नाही, असे वाटत असले तरीही तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी प्यावे.

३. श्वासोच्छवासाचे व्यायाम

थंडीच्या काळात आपल्या श्वासामध्ये अनेक बदल होतात. या ऋतूत आपली उभी आणि बसण्याची पद्धत वेगळी असते. जेव्हा आपण श्वास घेतो, तेव्हा हवा शरीरात प्रवेश करते, तेव्हा आपल्या फुफ्फुसांच्या विस्तारामध्ये अडचण येते. ज्यामुळे आवश्यक हवा आपल्या शरीरात पोहोचत नाही आणि आपण कमी श्वास घेतो. म्हणूनच या दिवसात श्वासोच्छवासाचे व्यायाम करायला हवेत. 

४. स्ट्रेचिंग

स्ट्रेचिंग हा थंडीच्या दिवसातील एक उत्तम व्यायाम आहे. या ऋतूमध्ये शरीरासाठी मसाज, उकडीचा आणि पौष्टिक संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमचे शरीर बाहेरून आणि आतून मजबूत बनवता.

५. चालणे

चालणे हा सर्वात स्वस्त आणि उत्तम व्यायाम आहे. चालण्यामुळे तुम्ही अधिकांश रोगांना दूर ठेवू शकता. या साठी सकाळी न चुकता कमीत कमी ३ ते ४ किलोमीटर चालच. आणि या पेक्षा अधिक चालत असाल तर, ते अधिकच चांगले आहे. आणि थंडीमध्ये चालणे कधीच चुकवूच नका.

६. आहार

या सगळ्यात आहार खूप महत्वपूर्ण आहे. तुम्ही सगलं काही करत आहात, परंतु तुम्ही जर आहाराच योग्य घेतला नाही तर, त्याचा काहीच उपयोग नाही. शरीरासाठी कसरत आणि योग्य आहार फार गरजेचा आहे.                     

Read More : सकाळी चालण्याचे फायदे : सकाळचे चालणे चुकवू नकाच : Don't Miss the Morning Walk


मित्रहो व्यायाम थंडीच्या दिवसातच नव्हे तर प्रत्येक दिवसी केला पाहिजे. मी म्हणतो.. व्यायाम करायचा कंटाळा येत असेल तर, कोणती ना कोणती कसरत नक्कीच करा. त्याने शरीरला बराच आराम मिळतो आणि आपले स्नायू जवान राहातात. त्यामुळे आपण हेल्दी आयुष्य जगतो.

जर तुम्हाला कंटाळा येत असेल तर, थोडा वेळ तुमच्या आवडीचे गाणे अथवा सकारात्मक प्रेरणा देणारा एखादा कोट्स वाचा, त्यामुळे तुमच्या अंगात जोश वाढेल आणि तुम्ही पुन्हा जोमाने व्यायामाला सुरुवात कराल.

तसेच मित्रहो.. तुम्हाला व्यायाम करायला सतत कंटाळा येत असेल तर, एकदा २१ दिवस आलास न करता व्यायामाला जात राहा. तुम्ही अनुभव कराल की, तुमचा आलस कमी होत चालला आहे. आणि हे तुम्ही ज्या कामात तुम्हाला कंटाळा येतो, त्या कामावरती ही टिप्स नक्कीच फॉलो करा.             


     

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!