पुरुषांना त्यांची पत्नी किंवा गर्लफ्रेंडसोबत कधी मत्सर वाटतो?

SD &  Admin
0


ती-पत्नी आणि बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड यांच्यातील नाते हे जगातील सर्वात नाजूक नाते समजले जाते. या नात्यात खूप प्रेम असते, परंतु काही प्रमाणात विश्वासाचा अभाव असतो. दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात, पण नकळत काही कारणाने पार्टनर थोडं दुर्लक्ष करतो, तेव्हा पुरुषाच्या मनात अनेक शंका निर्माण होतात. त्याच्या मनात असुरक्षितता निर्माण होते. तो घाबरतो. त्याच्या मनात विचित्र विचार येऊ लागतात.

पुरुषाला अशा कोणत्या गोष्टी आहेत, त्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडकडून कधीच तो अपेक्षा करत नाही. आणि कदाचित अशा गोष्टी त्याच्या जोडीदाराकडून होत असेल तर, त्याच्या मनात मत्सर निर्माण होतो. त्याला खूप भीती वाटू लागते. पाहूया अशा कोणत्या गोष्टी आहेत.         

पुरुषांना त्यांची पत्नी किंवा मैत्रिणीसोबत कधी मत्सर वाटतो?
image credit to pexels.com 


पुरुषांना त्यांची पत्नी किंवा गर्लफ्रेंडसोबत कधी असुरक्षित वाटतं ?


१. पत्नी किंवा गर्लफ्रेंड एखाद्या मित्राची किंवा अनोळखी व्यक्तीची प्रशंसा करते:

जेव्हा पत्नी किंवा गर्लफ्रेंड आपल्या जोडीदारा समोर एखाद्या मित्राची किंवा अनोळखी व्यक्तीची प्रशंसा करते, तेव्हा त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याच्या मनात मत्सर निर्माण होतो. त्याच मन चलबिचल होते. तो विचार करू लागतो की, त्याचा जोडीदार त्याच्या समोर मित्राची किंवा इतर अनोळखी व्यक्तीची प्रशंसा का करत असेल?

मित्रहो तुमच्या मनात असे विचार येणे स्वाभाविक आहे. माणसाचा स्वभाव आहे, असे होणारच. परंतु तुम्हाला मनावर संयम ठेवून, नेमकी परिथिती काय आहे. त्यामध्ये सत्य काय आहे. हे जाणून घेवूनच शेवटचा निर्णय घ्या.

२. पत्नी किंवा गर्लफ्रेंड एक्स प्रियकराशी फोनवर बोलते:

जर पत्नी किंवा प्रेयसी तिच्या एक्स प्रियकराशी फोनवर बोलते, तेव्हा पुरुषाला खूप मत्सर वाटू लागतो. त्याच्या मनात शंका वाऱ्यासारखी धावू लागतात. तो विचार करू लागतो की, तिचे तिच्या एक्स प्रियकरावर खरोखर प्रेम तर नसेल  ना.. ?

Read More: कोणत्या बॉयफ्रेंडसोबत रिलेशनशिप राहू नये - अन्यथा पश्चाताप करत बसाल

३. पत्नी किंवा गर्लफ्रेंड चॅटिंग किंवा सोशल मीडियावर सक्रिय राहते:

जर पत्नी किंवा मैत्रीण व्हॉट्स अॅप किंवा सोशल मीडियावर जास्त सक्रिय राहते, तेव्हा पुरुषाला असुरक्षित वाटतं. पण तुम्ही असा विचार करणे चुकीचे ठरेल. व्हॉट्स अॅप किंवा सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह राहिल्याने तिचं कोणावर प्रेम आहे, असं म्हणणे चुकीचे ठरेल. तो त्याचा चांगला मित्र असू शकतो. ती कोणत्यातरी ऑनलाइन कामाच्या शोधात असू शकते किंवा इतर कारणेही असू शकतात. तुम्हाला असुरक्षित वाटण्याआधी तुम्ही संपूर्ण माहिती मिळवावी.

४. कामाच्या निमित्त जास्तीत जास्त वेळ बाहेर राहणे:

जेव्हा पत्नी किंवा गर्लफ्रेंड नोकरी किंवा इतर काही कामानिमित्त बाहेर असते, तेव्हा जोडीदाराच्या मनात शंका नक्कीच निर्माण होते. जर जोडीदार खूप दिवसांपासून दूर असेल तर, त्याच्या मनात तिसऱ्या व्यक्तीचे चित्र येऊ लागते. 

५. माहेरी सतत जाणे :

पत्नी सतत माहेरी गेल्यावरही नवऱ्याला असुरक्षित वाटते. पतीसोबत असूनही जेव्हा पत्नी वारंवार आपल्या माहेरच्या घरी जाण्याचे बोलते, तेव्हा पतीच्या मनात जोडीदाराबद्दल शंका निर्माण होते.

६. जेव्हा पत्नी किंवा गर्लफ्रेंड कमी बोलतात:

अनेक दिवस, महिने रिलेशनशिपमध्ये असूनही बायको किंवा गर्लफ्रेंड जोडीदाराशी कमी बोलते. तिची सतत  मनस्थितीत खराब राहते. अशा वेळी त्याच्या मनात असुरक्षितता निर्माण होते.

७. शारीरिक क्षमता:

जेव्हा एखाद्या पुरुषाला असे वाटते की, त्याच्या बायकोचा किंवा गर्लफ्रेंडच्या मित्राची शारीरिक क्षमता त्याच्यापेक्षा जास्त आहे. तो दिसण्यातही त्याच्यापेक्षा जास्त सुंदर आहे. तेव्हा त्याच्या मनात अनेक शंका निर्माण होतात. त्याला वाटत राहते की, त्याचा जोडीदार त्याला सोडून तर जाणार नाही ना..

८. पत्नी किंवा गर्लफ्रेंड त्याच्यापेक्षा अधिक यशस्वी असेल:

प्रत्येक माणसाची एक वाईट सवय असते, ती म्हणजे, तो कधीच त्याच्या जोडीदाराला आपल्यापेक्षा जास्त यशस्वी होताना पाहू शकत नाही. अशा वेळी जर त्याची बायकी किंवा गर्लफ्रेंड त्याच्यापेक्षा मोठ्या पदावर असते, तेव्हा त्याच्या मनात सतत संशय येवू लागतो. त्याला काहीतरी त्याच्यात कमी असल्यासारखे वाटत असते. 

काही महत्त्वाच्या गोष्टी:

नात्यात विश्वास असणे आवश्यक आहे. प्रेम थोडे कमी झाले तरी चालेल, पण विश्वास थोडाही कमी होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. यासाठी नात्यात असताना एकमेकांना नीट समजून घेणं गरजेचं असते. शारीरिक सुखापेक्षा एकमेकांना मानसिक आनंद देणं गरजेचं असते. कोणत्याही नात्यात जोडीदाराला आनंद देण्याची इच्छा असली पाहिजे. तेव्हाच ते नाते घट्ट बनते.  



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!