आज आपण आधुनिक युगात जगत आहोत. तरीही या आधुनिक जगात, नात्यामधले संबंध दिवसेंदिवस कमकुवत होत आहेत. पूर्वीसारखे घट्ट नाती आज क्वचितच पाहायला मिळतात. या सगळ्या नात्यात आज सगळीकडे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडचं नातं पाहायला मिळतं, ते मोठ्या शहरांबरोबरच आज छोट्या शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून जपणारे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड नाते, हे लवकर तुटण्याची शक्यता असते. त्याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. त्यांच्या नात्यात कधी दुरावा येईल, हे सांगता येत नाही.
image credit to pexels.com
Read More: टॉक्सिक रिलेशनशिप म्हणजे काय? टॉक्सिक रिलेशनशिप केव्हा बनते ?
या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आणि अशी गंभीर परिस्थिती येवू नये म्हणून, आधीच बॉयफ्रेंडच्या कोणत्या वाईट सवयी आहेत त्या जाणून घेऊन, त्या पासून सावध राहणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. जाणून घेऊया बॉयफ्रेंडच्या कोणत्या वाईट सवयी आहेत, त्या पासून गर्लफ्रेंडला दूर राहिलेच पाहिजे.
अशा बॉयफ्रेंडसोबत कधीही राहू नका - लवकर ब्रेकअप करा
१. वारंवार संशय घेणारा
जो प्रियकर सतत संशय घेत राहतो. अशा बॉयफ्रेंडसोबत कधीही राहू नका. मी तुम्हाला सांगतो, माणसाच्या मनात एकदा शंका निर्माण झाली की, ती दूर करणे फार कठीण असते. जरी त्याने तुम्हाला सांगितले की तो तुमच्यावर कधीही संशय घेणार नाही, तरीही तो भविष्यात याची पुनरावृत्ती करणार नाही याची शाश्वती नसते.
२. बोलण्यावर मार्यदा आणणारा
नात्यातील अधिकारांचा विचार केला तर दोघांनाही समान हक्क मिळणे महत्त्वाचे असते. तुम्ही कोणत्याही विषयावर बोलता किंवा कोणत्याही विषयावर तुमचं मत ठेवलं, तर प्रियकर तुमच्या बोलण्याचा आदर करण्याऐवजी विरोध करतो. तो स्वतःला प्रत्येक गोष्टीत महान समजतो. अशा वेळी तुम्हाला लगेच समजते की, हा प्रियकर तुमच्यासाठी योग्य नाही आहे.
३. तुमच्या जीवनशैलीबद्दल प्रश्न करणारा
हे युग फॅशनचे आहे. तुम्हालाही फॅशनची आवड असणार हे उघड आहे. पण तुमच्या बॉयफ्रेंडला तुमच्या या फॅशनवर आक्षेप असेल. तुमच्या आवडीच्या गोष्टींवर तो लगेच विरोध दर्शवतो. तुम्ही काय करावे, काय नाही. काय घालावे, काय नाही अशा कित्येक गोष्टींवर तो तुम्हाला विरोध दर्शवतो. अशा बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा विचार करत असाल तर, पुन्हा एकदा नक्कीच विचार करा. कारण पुढे जाऊन गंभीर समस्येचा सामना करण्यापेक्षा आजच ती समस्या संपवणे चांगले राहील.
४. तुमच्यावर नियंत्रण करू पाहणारा
जर तुमचा प्रियकर तुमच्यावर नियंत्रण ठेवू इच्छित असेल. त्याला तुमची प्रगती आवडत नसेल. तर अशा वेळी तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की, अशा बॉयफ्रेंडसोबत तुम्ही जास्त काळ राहू शकणार नाही. कारण असे लोक खूप संतप्त आणि हिंसक असतात. पुढे जाऊन तुम्हाला पश्चात्ताप करावा लागू शकतो. म्हणून त्याच्यापासून दूर राहणे कधीही चांगले राहील.
५. जबाबदारी न घेता शारीरक सुखाची सतत मागणी करणारा
प्रेमात व्यक्ती प्रथम एकेमकांच्या मनाने एकत्र येतात. पुढे हे नात जस जसं वाढत जातं, तसं दोघांमध्ये शारीरक संबंध होत जातात. परंतु पार्टनर कोणतीही जबाबदारी न घेता फक्त शारीरिक सुखाची मागणी करत असेल, तर मात्र पुढे धोक्याची घंटा वाजू शकते. एकदा नक्कीच रिलेशनमध्ये असताना याचा विचार करा.
५. जबाबदारी न घेता शारीरक सुखाची सतत मागणी करणारा
प्रेमात व्यक्ती प्रथम एकेमकांच्या मनाने एकत्र येतात. पुढे हे नात जस जसं वाढत जातं, तसं दोघांमध्ये शारीरक संबंध होत जातात. परंतु पार्टनर कोणतीही जबाबदारी न घेता फक्त शारीरिक सुखाची मागणी करत असेल, तर मात्र पुढे धोक्याची घंटा वाजू शकते. एकदा नक्कीच रिलेशनमध्ये असताना याचा विचार करा.
मित्रहो प्रेम करणे खूप सोपं असते, परंतु ते टिकवणं फार कठीण असते. आणि तरीही तुम्ही प्रेमात आहात. तर एकदा वरच्या टिप्स फॉलो करून पहा. या नक्कीच तुमच्या फायद्याची असतील.