आजचे युग फास्ट फूडचे आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फास्ट फूडची आवड आहे. याचा परिणाम म्हणून आपल्या जिभेला आवडणाऱ्या गोष्टी आपण सहज खातो. पण ते पदार्थ आपल्या शरीरासाठी चांगले आहेत की वाईट, हे आपण कधीच पाहत नाही.
या गरज नसलेल्या पदार्थांचं सेवन आपण दैनंदिन जीवनात करत असतो. परंतु आपण येथे विसरतो की, त्याचा आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. त्यांपैकी आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग म्हणजे किडनी यांवरही असे पदार्थ घातक परिणाम करतात. आणि मग एकदा का किडनी खराब झाली की, ती अनेक धोकादायक आजारांना आमंत्रण देते. तुमचे जीवन खूप वेदनादायक बनते. तुमचं जीवन नर्क होऊन जाते.
किडनी आपल्या शरीरात कसे कार्य करते?
Read More : हेल्दी आरोग्यदायी फळे कोणती आहेत? रोगांपासून दूर ठेवतात ही फळे
कोणत्या पदार्थाच्या सेवनापासून दूर राहिले पाहिजे?
१. कोल्ड्रिंक्स
कोल्डड्रिंक्स हे जगभरातील लोकांचे आवडते शीतपेय आहे. हे परदेशात अधिक लोकप्रिय आहे, परंतु आज आपल्या देशातही लहानांपासून मोठ्यांपर्यंत दैनंदिन दिनचर्येत याचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. आणि विशेष म्हणजे त्याचा वापर उच्च दर्जाचा आणि प्रतिष्ठेचा मानला जातो. आज मोठे कलाकार कोल्ड्रिंक्स कंपनीची जाहिरात करून लोकांना आकर्षित करतात आणि लोक त्याची कॉपीही करतात.
तुम्हाला माहीत नसेल, कोल्ड्रिंक्सच्या गडद रंगाच्या पेयांमध्ये भरपूर कॅलरीज असतात. यामध्ये साखर असते, जी आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असते. तसेच कोल्डड्रिंक्समध्ये फॉस्फरसचा वापर रंग, चव आणि शेल्फ लाइफ देण्यासाठी केला जातो, जो आपल्या शरीरासाठी अजिबात योग्य नाही. आणि त्याचा सर्वात वाईट परिणाम किडनीवर दिसून येतो.
२. कँडी फूड
आपण झटपट सूप, सोयाबीनपासून बनवलेल्या वस्तू, साठवलेल्या भाज्या, फळांचा रस, मासे इ. सेवन करत असतो. अशा कँडी पदार्थांमध्ये सोडियम आणि प्रेसेव्ह्रेटीव्ज असतात. या पदार्थांमध्ये सोडियम आणि प्रिझर्व्हेटिव्ह्जचा यासाठी वापर केला जातो, ज्यामुळे पदार्थ जास्त काळ टिकतो. पण हे पदार्थ किडनीसोबतच आपल्या शरीराचे अधिक नुकसान करतात.
३. दुग्धजन्य पदार्थ
दही, लोणी, चीज यांसारख्या पदार्थांच्या सेवनाने लघवीतील कॅल्शियमचे प्रमाण झपाट्याने वाढते. आणि हे किडनी स्टोनचे कारण बनते. ज्यांना आधीच मूत्रपिंडाचा त्रास आहे आणि ते या पदार्थांचे अधिक सेवन करतात, त्यांना डायलिसिसवर ठेवण्याची वेळ येऊ शकते. म्हणूनच या पदार्थांचे जास्त सेवन करू नका.
४. कॅफिन
चहा-कॉफीचे शौकीन सर्वत्र आढळतात आणि आज ही प्रत्येकाची सवय झाली आहे. पण मी तुम्हाला सांगतो की, चहा आणि कॉफीमध्ये कॅफीन असते. त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. आणि त्यामुळे किडनी खराब होते.
चहा-कॉफीच्या सेवनामुळे आपल्याला किडनी स्टोन आणि किडनीच्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. चहाच्या पानांमध्ये आणि कॉफीच्या बियांमध्ये तयार होणारे उत्तेजक किडनीमध्ये पाणी शोषून घेण्याच्या कामात अडथळा निर्माण करतात, त्यामुळे किडनी आपले काम नीट करू शकत नाही. आणि यामुळे तुम्हाला अनेक आजार होतात.
५. मीठ
आपल्या जेवणात मिठाचे प्रमाण योग्य असेल तर, जेवणाची चव वाढते. पण जर तुम्ही जास्त मीठ खाल्लं तर तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होतात. मिठाचे अतिसेवन मूत्रपिंडासाठी अत्यंत हानिकारक असते. त्यामुळे रक्तदाब वाढतो आणि त्याचा थेट परिणाम किडनीवर होतो.
६ . चिप्स - कुरकुरे
बहुतेक मुले चिप्स आणि कुरकुरे यांचे अधिक शौकीन असतात. त्याचबरोबर प्रौढ देखील हे पदार्थ आवडीने खातात. या पदार्थांची चव खूप चांगली असल्याने मुले त्यांच्याकडे आकर्षित होतात. आणि पालकही विचार न करता बालहट्टापुढे नतमस्तक होऊन, असे पदार्थ खायला देतात. परंतु येथे मी सांगू इच्छितो की, त्यात मीठाचे प्रमाण जास्त असते, जे तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असते.
चिप्समध्ये असे घटक असतात, जे आपल्याला पचन प्रक्रियेत त्रास देतात. तसेच हा पदार्थ तळलेला असल्याने त्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे किडनीसाठी अत्यंत हानिकारक असते.
खबरदारी
हे पदार्थ खाऊ नयेत, असे माझे म्हणणे नाही, पण या पदार्थांचे मानवी शरीरावर चटकन दुष्परिणाम होतात, त्यामुळे ते कमी प्रमाणात आणि आपल्या शरीराच्या गरजेनुसार सेवन करावे. यासोबतच ज्यांना मधुमेह, रक्तदाब, हृदयाचे विकार, दारू पिणे असे आजार आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.