सतत मास्क घातल्याने घशातील संसर्ग आणि घसा खवखवण्याची समस्या वाढेल का?

SD &  Admin
0


आज कोरोना वायरसमुळे लोकांमध्ये आरोग्याची चिंता वाढत आहे. यात समाधानाची गोष्ट म्हणजे मास्कमुळे कोरोना वायरसला रोखण्यात काही प्रमाणात मदत होते. त्यामुळे लोकं घराबाहेर पडताना मास्कचा वापर करत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, मास्क घातल्याने घशातील संसर्ग आणि घसा खवखवण्याची समस्या वाढत आहे?

सतत मास्क घातल्याने घशातील संसर्ग आणि घसा खवखवण्याची समस्या वाढेल का?
image credit to pexels.com 

बहुतेक लोकांना हे माहित नसते की, एकदा मास्क लावल्यानंतर तो पूर्णपणे धुणे देखील आवश्यक आहे. जर तुम्ही असे केले नाही तर, तुम्हाला संसर्ग आणि घसा खवखवण्याची शक्यता जास्त असते. एकच मास्क जास्त वेळ म्हणजेच दिवसाहून अधिक काळ लावल्याने त्यामध्ये जंतू आणि बॅक्टेरिया बसतात, जे संसर्ग आणि घसा खवखवण्याच्या समस्येचे प्रमुख कारण बनतात.

Read More : हळद शरीरासाठी फायदेशीरच आहे, परंतु तिच्या अधिक सेवनाचे तोटेही आहेत.

    हे कसे शक्य आहे? असा तुम्ही विचार करत असाल तर, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही मास्क वापरता, तेव्हा श्वासोच्छवासाच्या वेळी, बॅक्टेरिया, धूळ आणि इतर प्रकारचे विषाणू घशात जातात. आणि त्यामुळे तुमची संसर्ग आणि घसा खवखवण्याची समस्या वेगाने वाढते. आज कोरोनाच्या काळात तुम्ही ऐकले असेल की, सगळीकडेच  लोकांच्या घशात जळजळ होण्याची समस्या भेडसावत आहे.

संसर्ग टाळण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे?

१. बाहेरून घरी आल्यावर मास्क, न विसरता धुवा म्हणजे त्यावर साचलेले बॅक्टेरिया, धूळ आणि जंतू निघून जातील.

२. मास्क नीट धुणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यामधले जंतू मरतील. त्यासाठी मास्क चांगल्या साबणाने किंवा हर्बल शैम्पूने धुणे आवश्यक आहे. शक्य असल्यास, धुण्यासाठी गरम पाणी वापरा.

३. मास्क धुतल्यानंतर, तो पूर्णपणे वाळल्यानंतरच वापरा. उन्हात वाळवायला ठेवले तर खूप चांगले.

४. मास्क घातल्यानंतर त्याला वारंवार हात लावू नका. मुखवटा उतरवायचाच असेल तर, मागून उघडा आणि काढा.

५. सोबत तीन ते चार मास्क ठेवा. जेणेकरून एक धुतल्यानंतर दुसरा वापरता येईल आणि मग अचानक दुसरा घालण्यास योग्य नसेल, तर तिसरा वापरता येईल. वाढत्या कोरोनाच्या दिवसात तुम्हाला हे करावे लागेल. कारण तुमच्या आरोग्यापेक्षा मोठे कारण या जगात दुसरे असूच शकत नाही.


महत्त्वाची टिप्स: तुमच्या आरोग्याबरोबरच इतरांच्या आरोग्याचीही काळजी घ्या. कारण हा विषाणू इतरांकडून आपल्यापर्यंत पोहोचतो आणि आपल्याकडून इतरांपर्यंत पोहोचतो. म्हणूनच एकमेकांची काळजी घ्या आणि वायरस टाळा.



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!