Aabhal Marathi Kavita by Spruha Joshi

SD &  Admin
0


बाप या आभाळावर फारच कमी साहित्य लिहिलं गेलं आहे. का.. कुणास ठाऊक पण हे सत्य आहे. खरं तर आई आणि बाबा यांचा रोल समानच असतो. दोघांशिवाय जग कधीच विचार करू शकत नाही. मग एक प्रश्न असा पडतो की, बापाला कुटुंब दूरच्या नजरेने का बघतं? तो जेव्हा घरात असतो तेव्हा घर शांत आणि मनात भीती असल्यासारखे वागते. परंतु बाप घरातून निघून गेला की, सगळे आनंदात नाचू लागतात. असं का होतं? 

आभाळ मराठी कविता | Aabhal Marathi Kavita | कवयित्री स्पृहा जोशी

कधी कोणी विचार केला आहे? नक्कीच केला असणार आहे. कारण किती ही झालं तरी शेवटी बापच असतो. आभाळ या कवितेत हेच ठामपणे सांगितले आहे. कविता वाचतानाच सगलं काही लक्षात येतं की, या कवितेत बाप म्हणजे काय असतो.

या कवितेत कवयित्रीने बाप उत्तमपणे सर्वांसमोर ठेवला आहे. बाप तसा सगळ्यांनाच कठोर दिसतो. त्याची प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच भीती असते. त्याच्या समोर काहीजणांची तर मान वर काढायची हिंमत्तच नसते. असा हा बाप सगळ्यांच्या मनात खुपत असतो.

Read More : भय इथले संपत नाही मराठी कविता | Bhay Ithale Sampat Nahi | कवी ग्रेस                 
                 

जरी हे असे असले, तरी बाप हा कुटुंबासाठी सतत झटत असतो. आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता करत असतो. आपल्या मुलांनी खूप शिकून मोठे व्हावे असे त्याला वाटत असते. म्हणून तो सतत कष्ट करत असतो. तो जरी मुलांवरती रागावला तरी तो त्यांच्या भल्यासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी रागवत आणि बोलत असतो.

अशा सुंदर पद्धतीने आभाळ या कवितेत बापाचं वर्णन केले आहे. प्रत्येकाला ही कविता जवळचीच वाटणार यात काही शंका नाही. कारण प्रत्येकाने बाप हा जवळून अनुभवलेला असतो.

कवयित्री स्पृहा जोशी  यांची मराठी कविता आभाळ 


च्च काळ्या ढगांनी भरलेलं काळंकुट्ट आभाळ,
भीती वाटते त्याची कधी कधी.
सारं आसमंतच व्यापून टाकलेलं असतं त्याने,
पळणार तरी कुठे आपण त्याच्यापासून?
त्याने डोळे उघडले तर लक्ष लक्ष एकदाच?
फोडून काढलं तर पावसाच्या चाबकाने?
विजेचा तिसरा डोळा भयकारी रागामध्ये,
आगीत लपेटून टाकेल आपल्याला..!!

जीव मुठीत धरून आपलं क्षुद्र जगणं जगत राहणं.. एवढंच आपल्या हातात..
त्याच्या डोळ्याला डोळे भिडवायची काय,
मान वर करून पाहण्याची सुद्धा हिमंत नाही..
सृष्टीच्या आतलं काहूर जाणवत असतं खरंतर..
तिची इच्छा असते, आपला संवाद घडावा आभाळाशी..
पण तीही मुक्याने हे कडू सत्य पचवत राहते..
आतले कढ आतच दाबत राहते..

ळू हळू अंतर वाढतं, वाढतच जातं..
क्रांती करायला लागतं मन, वाढत्या वयानुसार.
आभाळच अस्तित्वच झुगारून द्यायला लागतं..
धाडस करतं त्याच्या नजरेला नजर देण्याचं
ताठ मानेने त्याच्या समोर उभं राहण्याचं..

ता हळू हळू आभाळही म्हातारं व्हायला लागतं.
वयानुसार अनुभवाने निवळायला लागतं,
अशीच कधी नजर जेव्हा आभाळावर जाते,
काळेभोर क्रद्ध  निघून गेलेले असतात..

भाळाच्या वृद्ध नजरेत वेगळेच भाव दिसतात.
शांत निरभ्र आभाळ तेव्हा कौतुकाने पाहतं,
काहीतरी आपल्याही मनात उगाच दाटून येतं
हात पसरून, वय विसरून आपण मोठे होतो,
थकलेल्या आभाळाला मायेने कवेत घेतो..
आभाळाच्या डोळ्यात तेव्हा आनंदाश्रू दाटून येतात;
                      सुरकुतलेल्या सृष्टीचे कातर क्षण जागे होतात..!!!                    
 

                                                   कवयित्री - स्पृहा जोशी 


आभार 

या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला आभाळ  कवितेचा कंटेंट कवयित्री स्पृहा जोशी यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम  ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.

The content of Abhal poem published in this blog is by Poet Spruha Joshi. A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem



 







                           

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!