सावधान शीतपेये पिण्याआधी त्यातील घातक गुणधर्माची ओळख करून घ्या.

SD &  Admin
0


शीतपेय पिणे आजच्या आधुनिक काळात स्टेटसचा भाग झाला आहे. प्रत्येक समारंभात जेवणाच्या आधी किंवा जेवणाबरोबर शीतपेयांना पहले स्थान दिले जाते. कॉलेजमधील तरुण मुले-मुली छोटीसी पार्टी का असेना त्यामध्ये शीतपेयांना पहले स्थान दिले जाते.

मोठे मोठे फिल्मी स्टार या शीतपेयांच्या जाहिराती करत असतात. त्यामुळे तरुण तरुणी त्यांचे अनुकरण करत या शीतपेयांच्या प्रमाणापेक्षा आहारी जातात. आज कुण्या घरी पाहुणे म्हणून गेला तर आपल्याला थंड काय घेणार? हा प्रश्न विचारला जातो, साहजिक आहे.. थंडा म्हटल की थम्सप, पेप्सी सारखे मोठे ब्रांड पुढे आणले जातात.

सावधान, शीतपेये पिण्याआधी त्यातील घातक गुणधर्माची ओळख करून घ्या.

चवीने गोड आणि घशाला चूर चूर करणारी चव आजच्या पिढीला हवी हवीसी वाटत असते. काहीजण तर पाण्यापेक्षा शीतपेये पिण्यास त्यांना चांगले वाटते. परंतु आपल्याला थोडीसी भनक देखील नसते की, अती प्रमाणात या शीतपेयांचे सेवन केल्यास आपल्याला त्रास होऊ शकतो. पण ते काहीसी असो, शीतपेय पिणे आवश्यक आहे, नाही तर घशाला आणि पोटाला थंडावा कसा मिळणार, आजची पीढी असी उत्तरे देऊन पुढे निघून जाते.

||थंडा म्हणजे आगीचा गोला ||

शीतपेय प्यायल्याने नक्की काय घटतं ?

शीतपेयांमधले प्रमुख घटक हे साखर आणि पाणी असतात. या प्रमाणामध्ये तीस ते चाळीस टक्के साखर असते. या पेयामध्ये फोस्फोरिक अॅसिड आणि कुत्रिम रंगाचे घटक मिक्स केलेलं असतात, त्यामुळे त्यांना रंग आलेला असतो. त्याचबरोबर चवीसाठी वेगवेगळे फ्लेवर्स त्यात मिक्स केलेले असतात.

शीतपेय जरी आपल्याला वरून थंड वाटत असली तरी, ती शरीरात गेल्यावरती त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गारवा निर्माण करण्याचा गुणधर्म नसतो. शीतपेय जेव्हा पॅक करतो, त्यावेळी पाण्यातून अतिशय मोठ्या वेगाने कार्बनयुक्त वायू दाबाखाली सोडला जातो. त्यामुळे आपल्याला त्यातून बुडबुडे तयार झालेले दिसतात. म्हणून या शीतपेयांना कार्बोनेटेड एरिएटेड ड्रिंक्स असं म्हटलं जातं.

Read More : काली मिरचीचे फायदे : केस पांढरे होणे आणि केस गलतीवर रामबाण उपाय


आपण जेव्हा शीतपेयाची बाटली उघडतो, तेव्हा तिचा हवेसी संपर्क येतो त्यामुळे हळूहळू बुड बुडे कमी होऊन, फेस कमी कमी होत जातो. आपण जेव्हा शीतपेय प्यायला लागतो तेव्हा शीतपेयाबरोबर हवाही आपल्या पोटात जाते आणि तितक्याच वेगाने तो बाहेरही येते, त्यामुळे आपल्याला मोठ्या आवाजात ढेकर ही येतो. या वायुचा वेग इतका असतो की, तो आपल्या नाकातून जाऊन थेट मेंदूपर्यंत झिणझिण्या आणतो.

शीतपेय प्यायलाने होणारे त्रास

असं म्हटल जात, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक सेवन केलं तर, त्याचे अनेक वाईट परिणाम आपल्याला दिसून येतात. शीतपेयाचे देखील तसेच आहे. शीतपेय वारंवार प्यायल्याने  पचन क्रिया बिघडून जाते. त्याचबरोबर गॅस होणे, पोट फुगणे, सतत काही खाल्ल्यानंतर ढेकर येत राहणे, तसेच अतिशय थंड शीतपेय प्यायल्याने, शीतपेयाच्या थंड गुणामुळे अग्नी मंद होतो. अजीर्ण, अपचन, पोट जड वाटणे, भूक न लागणे, गॅस तयार होणे अशा प्रकारचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतात.

शीतपेय जरी थंड असले तरी त्यातील फोस्फोरिक अॅसिड आणि अन्य घातक गुणधर्मा मुळे आपल्या नाजूक आतड्याला इजा पोहोचली जाते. अनावश्यक चरबी तयार होते. शरीरातील नाजूक त्वचा या अॅसिड मुळे खरवडली जाते. बरोबर रक्तस्राव देखिल होण्याची शक्यता असते.

सावधगिरीचा इशारा

प्रत्येकजन जिभेला आवडणाऱ्या वस्तूंचा अतीप्रमाणात सेवन करत असतो. हे जरी सत्य असले तरी आपल्याला आपल्या शरीराच्या आरोग्याची काळजी प्रथम घेणे अनिवार्य आहे. कोणत्या पदार्थापासून आपल्या शरीराला धोका आहे, अशा प्रकारच्या वस्तू चवीने गोड असल्यातरी आरोग्याच्या दृष्टीने कमी सेवन करने गरजेचे आहे. शीतपेयांचे कमीत कमी सेवन करणे आणि आरोग्यासाठी लाभदायक लिंबू सरबत, कोकम सरबत, सोलकढी सारखे नैसर्गिक फळांपासून मिळणाऱ्या पदार्थांचे सेवन अधिक करणे गरजेचे आहे. शक्य असल्यास घरीच कोणत्याही प्रोसेसिंग शिवाय फळांचा तसेच भाज्यांचे सेवन करा. तेच आपल्या फायद्याचे असेल.  




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!