निसर्गावर आणि मुक्या प्राण्यांवर मी खूप खूप प्रेम करतो. जर कोणी विनाकारण झाडांची तोड किंवा मुक्या प्राण्यांना त्रास देताना किंवा मारताना दिसलं की मला खूपच राग येतो. खरं तर हा राग माझ्या खूप डोक्यात जातो आणि नको ते शब्द त्या वाईट माणसांसाठी माझ्या मनात येतात. आणि म्हणून बकुल ही कविता मला अधिकच जवळची वाटते. खरं तर मला निसर्गावरच्या कविता खूपच आवडतात. आणि त्या मी आवडीने वाचत असतो.
Read More : द्वारका मराठी कविता | Dwarka Marathi Kavita | Prabha Ganorkar
कवयित्री स्पृहा जोशी यांची बकुळ मराठी कविता | स्पृहा जोशी यांच्या कविता
मध्ये तू दिसतेस,
थरथरत उभी असलेली ..
लोक चालत राहतात धुळीतून
वाट होत जाते आणखी मळलेली ..
तू तशीच उभी आहेस..
थोडी मुळं हलवून इकडे तिकडे बघ तरी..
तुझ्या आसपासच्या या मळकट करडेपणात
तू किती सुंदर दिसतेयस!
मी तुला खूप वर्षं बघतेय..
आकाश निळी झालर,
पाऊस त्याची रिमझिम,
चंद्र मोतिया चांदणं देतो.
तू हलत नाहीस पण जागची..
थोडंसं मोहरल्यासारखं दाखवतेस फक्त..
आपण आता इतकं बोलतोय म्हणून,
पण पलीकडे हिरवेगार डोंगर आहेत
उसळणारा समुद्र आहे..
तुला नाही वाटत एकदा त्यांच्याकडे पहावंसं?
त्या मळक्या पाऊलवाटेवरून दूर कुठेतरी जावंसं?
पण.. तू आपली तिथेच नेहमी..
दुधाळ झर्याच्या आणि हिरव्या पाउलवाटेच्या मध्ये थरथरत उभी..
संध्याकाळच्या वाऱ्याची वाट पहात..
आपण आता इतकं बोलतोय म्हणून,
पण..
तुझा आणि संध्याकाळच्या वाऱ्याचा
जीव आहे ना एकमेकांवर?
मला कसं कळलं?
अगं, संध्याकाळचे दुखरे होऊन
इतके घमघमता न दोघेही..
आपल्यालाच वाटतं की जातायेता माणसं पहात नसतात..
आपण आता इतकं बोलतोय म्हणून,
पण अशी दुखरी गुपितं फार काळ लपत नसतात...
कवयित्री - स्पृहा जोशी