पुणे देशातील सुंदर शहरा पैकी एक आहे. या शहराला विद्येचे माहेर घर म्हणतात. आणि त्याचे कारण ही तसेच आहे. पुण्यात उच्च प्रतीचे शिक्षण संस्था आहेत. तसेच संशोधन, खेळ क्षेत्रात ही देशात पुण्याचे नाव प्रसिद्ध आहे. पुणे शहर हे इतिहासाचे मार्गदर्शक आहे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ह्याच शहरात झाला. शिवनेरी गडावर पहले सोनेरी किरण या राजाच्या पदस्पर्शाने पडले आणि सारा महाराष्ट नव्हे तर, सारा भारत या शूर पुण्यात्म्याच्या जन्माने भाग्यवान झाला. या शहरासी या महान आत्म्याचे ऋणानुबंध आहेत आणि ते प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देत असतात. पुण्यातील कसबा गणपती या मानाच्या गणपतीची स्थापना शिवाजी महराजांचे गुरु दादोजी कोंडदेव यांनी केली होती. या पुणे शहरात ऐतिहासिक वास्तूंचा असा ठेवा आहे, त्यामुळे पुण्यातील भटकंतीसाठी सुंदर स्थळे पाहण्यासाठी जो येथे भेट देऊन जातो, तो पुन्हा पुन्हा येथे येण्याची वाट पाहतच असतो.
पुणे दर्शनाला तुम्ही जर योजना आखली असेल तर, तर नक्कीच आपली ही योजना सफल होईल. कारण येथे मनाला मनमोहित करणारी अनेक ठिकाणे आहेत जी आपल्याला पुण्यातच पहायला मिळतील.
पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळे : Famous tourist places in Pune district in marathi
शनिवार वाडा
शनिवारवाडा पेशव्यांचे निवास स्थान होते. त्यांनी ह्या वाड्याची निर्मिती १७३६ साली केली होती. शनिवारवाड्याचे मुख्य द्वार दिल्ली दरवाजा आणि इतर दरवाजे मस्तानी, जंभल, गणेश अशा नावानी ओळखले जाते. या वाड्याची रचना सुरक्षितेच्या बाजूने भक्कम केलेली आहे. या वाड्यात हस्तिदंत महल, रंग महल, गणेश महल, दिवाणखाना, कारंजे अशी सुंदरतेने नटलेली ठिकाणे पाहायला मिळतात.
जाण्याचा मार्ग : शनिवारवाड्याकडे जाणारा मार्ग : पुणे रेल्वेस्टेशन पासून ३-४ किलोमीटर अंतर आहे.
पार्वती हिल मंदिर
पार्वती हिल मंदिर हे पुण्यातील प्रमुख मंदिरापैकी आहे. या मंदिरात भक्तांची मोठ्याप्रमाणावर ये जा होत असते. या मंदिराच्या दर्शनाचा वेळ हा सकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत असतो.
जाण्याचा मार्ग : पार्वती हिल मंदिरकडे जाणारा मार्ग: स्वारगेट पासून १ किलोमीटर अंतर आहे .
आगाखान महाल
ब्रिटीश राजवटीत या जागेचा उपयोग भारत छोडो आंदोलनात भारतीय देशप्रेमी लोग, महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि महादेव भाई देसाई यांना तुरंगात ठेवण्यासाठी केला होता. कस्तुरबा गांधी आणि महादेव भाई देसाई यांनी याच जागेत आपला अंतिम श्वास घेतला.
जाण्याचा मार्ग : आगाखान महालकडे जाणारा मार्ग : पुणे रेल्वेस्टेशन पासून ६ -७ किलोमीटर अंतर आहे
लाल महाल
लाल महाल हे शिवाजी महाराजांचे निवास स्थान. याच महालात शिवाजी महाराजांनी आपले बालपण घालवले. शिवरायांनी बलाढ्य सेने सोबत आलेल्या शाहीस्तेखानाची बोटे याच महालात कापली होती. प्रत्येक माणसाला हा महाल पाहिल्यावर नक्कीच या महान आत्म्याचे बालपणीचे दिवस आठवतात.
जाण्याचा मार्ग : लाल महालाकडे जाणारा मार्ग: पुणे रेल्वेस्टेशन पासून ३ किलोमीटर अंतर आहे.
सारसबाग
सारसबाग ही पुण्यातील मुख्य बागेपैकी आहे. ही बाग स्वारगेट बसस्थानकापासून खूपच जवळ आहे. ही आकाराने मोठी असून लोक दिवसभराचा थकवा घालविण्यासाठी इथे गर्दी करत असतात. या बागेच्या मध्ये गणपतीचे मंदिर आहे. ही बाग पूर्वी प्राणीसंग्रलायासाठी प्रसिद्ध होती.
सारसबागकडे जाणारा मार्ग : स्वारगेट पासून काही अंतरावरच आहे, तर पुणे रेल्वेस्टेशन पासून ४-५ किलोमीटर अंतर आहे.
कात्रज सर्फ उद्यान
कात्रज सर्फ उद्यानाला राजीव गांधी झुलॉजिकल पार्क देखील म्हणतात. हे पार्क कात्रज मुख्य चौकातून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे. या उद्यानात साफांची संख्या अधिक आहे. प्राण्यावरती संशोधनप्रकल्प येथे राबावला जातो. या उद्यानात फिरण्यासाठी वेळ ही सकाळी १०.३० पासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असते. दर बुधवारी उद्यान बंद राहते.
लोणावळा आणि खंडाला
लोणावळा-खंडाला ही थंड हवेची ठिकाणे असून, येथे पर्यटक हजोराच्या संख्येने येथे येत असतात. सुंदर निसर्ग, किल्ले, तलाव, धब धबे, अनेक प्रकारच्या वनस्पती येथे पर्यटकांना आकर्षित करत असतात. लोणावळा-खंडाला ही सह्याद्रीच्या पर्वत रांगात समुद्र सपाटी पासून ६३० मीटर उंचीवर आहे. लोणावळ्या पासून फक्त ५ किलोमीटर अंतरावर मलवली या स्थानापासून लोहगड, विसापूर, तिकोणा हे किल्ले पर्यटकांचे लक्ष वेधत असतात.
जाण्याचा मार्ग : लोणावळा आणि खंडाला येथे जाण्याचा मार्ग : पुण्यापासून ६५ किलोमीटर ( हायवेने) अंतरावर आहे.
शिवनेरी किल्ला
शिवनेरी किल्ला हा छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान आहे. म्हणून या किल्ल्याला ऐतिहासिक महत्व आहे. शिवनेरी किल्ला जुन्नर तालुक्यात स्थित आहे. या किल्ल्याला खूपच कठीण चढाव असलेला बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे प्राचीन छोटे मंदिर आहे.
जाण्याचा मार्ग : शिवनेरी किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग: पुण्यापासून १०० किलोमीटर अंतरावर आहे.
सिंहगड
हा किल्ला हवेली तालुक्यात डोणजे गावाजवळ आहे. शिवकालीन या किल्ल्याला कोंढाणा या नावाने ओळखला जाई. छत्रपती शिवरायांचा शूर नरवीर मावला तानाजी मालुसरे याला याच गडावर शूर मरण आले होते आणि याच मावलाच्या पराक्रमाने पावन झालेल्या या गडाला सिंहगड हे नाव सार्थक झाले होते.
जाण्याचा मार्ग : सिंहगड हा पुण्यापासून ३५-४० किलोमीटर अंतरावर आहे.
खडकवासला धरण
खडकवासला धरण हे पुण्यातले मुख्य धरण असून पुण्याला याच धरणापासून अधिकांस पाणी पुरवठा होतो. फिरण्यासाठी हे स्थळ खूपच छान आहे.
जाण्याचा मार्ग : खडकवासला धरण हे पुण्यापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे.
तुळशी बाग
तुळशी बाग ही पुण्यातील नावाजलेली बाजारपेठ आहे. या प्रसिद्ध बाजार पेठेचं पुण्यातच नाही तर, राज्य, देश विदेशातील लोकं येथे ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने शॉपिंग करत असतात.
येथे छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत सर्वच वस्तू मिळतात. फॅशनच्या बाबतीत तर येथे अनेक सुंदर सुंदर कपड्यापासून ते ज्वेलरीपर्यंत सगलं काही माफक दारात उपलब्ध असतात. एकदा नक्कीच पुणे दर्शन करता करता येथे अवश्य भेट द्या. हा.. येताना खिशात पैसे भरपूर ठेवा... कारण येथे आल्यानंतर खरेदी करण्याचा मोह आवरत नाही.
येथे जाण्याचा मार्ग : स्वारगेट पासून फक्त ३ किलोमीटर अंतरावर. आणि बरोबर मंडईच्या शेजारी.
पुण्याच्या या ऐतिहासिक ठिकाणाबरोबर पुण्याला तीर्थक्षेत्राचे देखील मुख्य स्थान म्हणून नावाजले जाते. याच जिल्यात रांजणगावचा महागणपती, ओझरचा विघ्नेश्वर, मोरगावचा मोरेश्वर, या नावाने प्रसिद्ध अष्टविनायकाची मंदिरे आहेत. तसेच येथे दगडू शेठ गणपतीचे प्रसिद्ध मंदिर आहे.
Read More My Page
कोंकणातलं निसर्गाचं मनमोहक दृश्य | डिलाईट लाइफ स्टाईल
ट्रॅवल करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?