कवी ग्रेस यांची कविता विश्वात एक वेगळीच ओळख आहे. ते म्हणतात की, त्यांच्या कवितेचा अर्थ रसिकांनी स्वतःहून समजून घ्यावा . खरं तर.. त्यांच्या कवितेचा अर्थ पटकन समजून येण्यास फार अवघड असते. कवितेत फार खोलवर जाऊन तिला समजून घ्यावे लागते. तेव्हा कुठे हळू हळू कवितेत काय आहे ते समजते.
कवी ग्रेस यांच्या अधिकांश कविता या साजसंध्या वरती लिहिल्या आहेत. वाचायला फार छान वाटते. कवितेचा अर्थ लगेच समजत नाही, परंतु कविता किती हृदयाच्या खोलवर जाऊन लिहिली आहे, ते समजते.
Poem Content and image Credit to Poet Grace
Read More : निरोप : कवी ग्रेस यांची मराठी कविता | Nirop Marathi Kavita | Poet : Grace
या कवितेचा भावार्थ तुम्हाला काय लागतो, ते तुम्हाला ही कविता वाचूनच समजेल. जसे म्हटल्या प्रमाणे प्रत्येकाच्या विचारांवर अवलंबून आहे की, त्यांना या कवितेबद्दल काय वाटते. नक्कीच आम्हाला कळवा.
कवी ग्रेस यांची कविता : भय इथले संपत नाही | Poet : Grace
भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते
ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे
त्या वेली नाजुक भोळ्या वाऱ्याला हसवुन पळती
क्षितिजांचे तोरण घेउन दारावर आली भरती
देऊळ पलिकडे तरिही तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळांपाशी मी उरलासुरला थेंब
संध्येतिल कमळासम मी नटलो शृंगाराने
देहाच्याभवती रिंगण घालती निळाइत पाने
ते धुके अवेळी होते की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या निष्पर्ण तरुंची राई
कवी - ग्रेस
आभार
या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला भय इथले संपत नाही कवितेचा कंटेंट कवी - ग्रेस यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.
या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला भय इथले संपत नाही कवितेचा कंटेंट कवी - ग्रेस यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.
The content of Bhay Ithale Sampat Nahi poem published in this blog is by Poet Grace. A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem