बाल संस्कार | मुलांना त्यांची कामं करायला शिकवा

SD &  Admin
0

क सुसंकृत मुल घडवण्यासाठी आई वडिलांचा खूप मोठा रोल असतो. यामध्ये थोडी देखील चूक मुलांच्या भविष्यावर वाईट परिणाम करू शकते.

    असं म्हटलं जातं सगळ्या प्राण्यामध्ये माणसाचं मुल सर्व काही शिकण्यासाठी जास्त वेळ घेतं. कारण इतर प्राण्यांपेक्षा माणसाच्या मुलांना अधिक माहिती आणि कला - कौशल्य आत्मसात करायची असतात.

 

एक पालक म्हणून आपल्या मुलांच्या बाबतीत खूप मोठी जबाबदारी पार पाडावी लागते. आणि पालक आपल्या मुलांची काळजी जबाबदारीने घेतातच. परंतु कधी कधी माणूस या नात्याने चुका होतात. आणि आपल्या मुलांना बिघडवण्यात कुठे तरी चूक होते.

बाल संस्कार | मुलांना त्यांची कामं करायला शिकवा

अधिकांस वेळा पालक मुलांवरती अपेक्षांचं ओझं खूप लादतात. तू हे कर, ते कर, ते करू नको. तुला वर्गात प्रथम नंबर मिळवलाच पाहिजे. आणि असं करण्यासाठी ते मुलांच्या मनाचा आणि भावनांचा थोडा देखील विचार करत नाहीत.

एक पालक म्हणून आपल्या मुलांकडून नैतिक इच्छा असणे काही चुकीचे नाही. परंतु मुलांच्या बुद्धीच्या आवाक्याबाहेरचे आपण ज्या वेळी सांगतो, ते वेळी त्यांना अपयश हे येणारच. परंतु पालकांना हे मान्य नसते. शेजारच्या मुलाने खूप मार्क आणले म्हणून, आपल्या मुलांकडून ही जबरदस्ती अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे.

Read More: मोबाईल फोनमुळे हाडे कमकुवत होतात का ? Do mobile phones weaken bones?

दुसरी गोष्ट जर मुलं अभ्यासात किंवा स्पर्धा परीक्षेत नापास किंवा कमी मार्क्स मिळाले तर पालक त्यांना कमी लेखतात. त्यांना हिणवू लागतात. इतर मुलांशी तुलना करत राहतात. बैला, मूर्ख, तू असाच सगळ्यांच्या पाठीमागे राहशील, आळशी असे अनेक नको त्या शब्दाने बोलू लागतात. त्यामुळे होते काय, मुलं अपोआप बिघडली जातात. पालकांचं थोडं देखील ऐकत नाहीत. खोटं बोलनं तर दररोजच होऊन जातं. नको त्या चुकीच्या वाटेकडे जातात. आणि यात पालकांचाच मोठा हात असतो.

या सगळ्या गुष्टी होऊ नयेत म्हणून मुलांना समजतुने घेतले पाहिजे. त्यांच्या मनाचा विचार करून, त्यांना कशाची गरज आहे ते प्रथम जाणून, त्यांना त्यांच्या कामात मदत केली पाहिजे. त्यांची कोणाशी तुलना न करता, त्यांना पुढे जाण्यास प्रोत्साहन केले पाहिजे. प्रत्येक चांगल्या कामात त्याचं कौतुक जरूर केले पाहिजे. असे केल्याने त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढेल, आणि ते नव्याने लक्षकेंद्रित करतील.

    पालकांना एक विनंती आहे की, स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांना अपेक्षा आणि जबाबदारीत न अडकवता, त्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात काम आणि शिक्षण घेण्याची संधी द्या. मग बघा तुमची मुल किती यशस्वी होतात ते.    
     





Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!