बालपणीच्या आठवणी | ९० व्या दशकातील बालपणीच्या आठवणी | Childhood Memories in marathi

SD &  Admin
0


बालपणीच्या आठवणी मनात सतत गुदगुदल्या करत असतात. नुसत्या मनात कुठूनतरी वाऱ्याच्या झुळूकप्रमाणे जागल्या की, आपण आनंदाच्या डोहात बुडून जातो. हृदय आणि मन एक होऊन जातं.

    आयुष्याच्या पारावर सुख दुःखाची सांगड घालताना शरीर आणि मन थकून गेलेलं असतं. काही करावसच वाटत नाही. जीवनात रामच उरला नाही वाटत असते. अशा वेळी बालपणीची एक जरी आठवण मनात गुदगुदली की आनंदाचा गारवा मनात आणि पूर्ण शरीरात संचारला जातो. एक वेगळीच आनंदाची अनुभूती वाटत असते. खरच.. दु:खाच्या लहरीत बालपणीची एक आठवण सुद्धा दवा म्हणून काम करते.

बालपणीच्या आठवणी | ९० व्या दशकातील बालपणीच्या आठवणी | Childhood Memories in marathi

माझा जन्म हा ९० व्या दशकात झाला. आणि तो ही कोकणासारख्या निसर्गसंपन्न प्रदेशात. मी स्वतःला नशिबवान समजतो की, माझा जन्म हा ९० व्या दशकात झाला. येथे मला आनंदी होण्याचे कारण असे की, मला वाटत बालपणीचं खरं खुरं सुख अधिकांश ९० व्या दशकातील लोकांनीच अनुभवलं आहे, असं मला वाटतं. कारण त्या वेळी माणसा-माणसामध्ये माणुसकी भरगच्च भरलेली होती हो.. एकमेकांच्या सुख दु:खात हसत हसत सहभागी व्हायची. इंटरनेटचा काडीचा संबध नसल्यामुळे, मुलं ही मैदानी खेळाशीच जोडलेली असायची. आणि महत्वाच म्हणजे त्या वेळी सोशल मिडिया नव्हतं. त्यामुळे एकमेकांमध्ये भांडणं लावणार कोण नव्हतं. आयुष्यात सगळ्यांना आपलाच म्हणावं असं आमच्या बालपणाने शिकवलं.

Read More : ९० व्या दशकातील बालपण | Childhood in the 90s | माझा पहिला पावसाला | ब्लॉग - २

Read More : ९० व्या दशकातलं बालपण | कधी ही न संपणारा प्रवास | 90th Childhood Memories | ब्लॉग - १

    बालपणीचा प्रत्येक क्षण सुखाने आणि आनंदाने भिजलेला होता. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवस कधी संपून जायचा ते समजायचे देखील नाही. त्यावेळी खेळणे, कुदने, उड्या मारणे, रडणे, थोडासा अभ्यास आणि कधी मधी आईने कुठंच काम सांगितलं तर जा उडत म्हणून म्हणायला मोकळे. या खेरीज जर खाऊ खायची तळप झाली असेल तर, आईला कामाच्या बदल्यात पैसे देशील का म्हणून रोखटोक विचारण्यात कोणतीही भीती नव्हती. वाह.. काय होतं हो आमचं बालपण. आज नुसतं आठवण झाली तरी.. उड्याच मारत गावभर फिरत बसतो. लोकं कधी कधी लहान झालास की काय म्हणून चिडवतात. पण त्यांना काय कळणार बालपणीच्या आठवणींचा आनंद काय असतो.

बालपण हे सगळ्यांसाठीच प्रिय असतं. आपण बालपणीच्या आठवणींपासून कधीच वेगळ राहू शकत नाही. सुख- दु:खाच्या चढ उतारावर बालपणीच्याच आठवणी  आनंदाचे झाड म्हणून आपल्या सेवेला धावून येतात. आणि त्यात आपण मनसोक्त डुबकी मारतो. अशाच बालपणीच्या पारावर आपण केलेल्या बाललीलांच आनंदाचं झाड हे पुस्तक आहे. प्रत्येक शब्द हा तुम्हाला नक्कीच तुमच्या  बालपणीच्या विश्वात घेवून जाईल, हे विश्वासाने सांगेन. तुम्हाला जर बालपणीच्या विश्वातले जग जगायचे असेल तर नक्कीच हे पुस्तक खरेदी करा. शुल्क फार कमी आहे. PDF, Amazon Kindle आणि Google Play Store वर उपलब्ध आहे.

 



  Buy Now Google Play Store : माझं गाव माझं बालपण 

 बालपणीचे गमतीदार किस्से | बालपण स्टेटस आणि कोट्स मराठी

  1. लहानपणी घड्याळ कोणाजवळच नव्हतं, पण वेळ प्रत्येकाजवळ होता, आता घड्याळ प्रत्येकाजवळ आहे पण वेळ कोणाकडेच नाही आहे.

  2. बालपणी एक बॉल विकत घेण्यासाठी अकराजण लगेच तयार व्हायचे, परंतु आता एकटा बॉल घेवून येतो, परंतु अकरा खेळाडू आणणे कठीण असते.

  3. बालपणी रुसवा फुगवा झाला तर , दोन बोटांच्या जुळण्यानेही मैत्री पुन्हा सुरू व्हायची.

  4. शाळेतल्या जेवणाच्या सुट्टीतील तो आनंदाचा क्षण, एकमेकांच्या डब्यातील पदार्थांची देवाणघेवाण आणि ते ही कोणत चांगलं वाईट न करता, असे दिवस पुन्हा कधीच अनुभवता येणार नाही.

  5. शाळेत गुरुजींनी फळा फुसायला सांगितलं तर, आपण किती अभिमानाने उठून फळा फुसायचे, जसे काही लढाईलाच चालला आहे.

  6. दिवसभर गावात खेळ - मस्ती करून झाल्यावर घरी येयला उशीर होतो, तेव्हा आई पाठीमागे काठी हातात घेऊन, या माझ्या बाळानो आईकडे , नाही मारत, असे म्हणत असा फटका मारायची की, ऐशीच्या वेगाने पळत सुटत.

  7. लहानपणी सतत वाटायचे, मोठे असतो बरं झालं असतं, पण आज वाटतं, ते गेलेलं बालपण कोणी परत देईल का? मला लहानपणीचेच दिवस पाहिजेत.

  8. लहानपणी शाळेत नाही गेलो तर, आई खूप मारायची. पण आज ते दिवस मला हवेहवेसे वाटत आहेत. वाटतं.. तो आईचा मारच बरा होता. नको ते आजचे बेकार जीवन.

  9. आज करोडो रुपयाची थैली पण, बालपणीच्या आठवणी विकत घेऊ शकत नाही.

  10. बालपण म्हणजे आनंदाचं झाड. ना कोणती भीती, ना कोणती काळजी, ना भविष्याची काळजी.

  11. बालपणी आपण किती मस्ती आणि स्वप्न बघायचे, परंतु माझ्या मित्रानों तेव्हा जीवघेणी स्पर्धा कुठेच नव्हती.

  12. त्यावेळी श्रीमंती पाहून मैत्री कुणीच केली नव्हती. बालपण फक्त आणि फक्त बालपणच असतं.

  13. बालपणी प्रत्येक गोष्ट कधी मिळेल हे सांगता येत नव्हते, पण जेव्हा ती मिळायची ना.. तेव्हा चेहऱ्यावर आनंद   बघायलाच पाहिजे होता. आकाश पण ठेंगण होत होतं.

  14.  बालपणी अंगणात बसून आजीच्या मस्त मस्त गोष्टी ऐकायला किती आनंद वाटायचा. आज अंगणच कुठे हरवलं आहे.

  15. अहो कोणी बालपण देता का... बालपण. कुठे हरवलं आहे हो... भेटतच नाही हो.. कोणी सांगेल का..?

  16.  लहानपणी मी शाळेतून घरी गेल्यावर किंवा खेळून घरी आल्यावर मला आई दारातच उभी असायला हवी असा माझा हट्ट असायचा. आणि जर आई नाही दिसली की मी.. हां.. म्हणून बोंबा बोंब मारायचा. त्यावेळी अक्का गाव गोळा व्हायचा.

  17. गुरुजींची एक पाठीवरची शाबकीची थाप, असं वाटायचं मी सगलं जिंकलं.

  18. बालपण म्हणजे आनंदाचे झाड.. येथे फक्त आणि फक्त आनंदच मिळतो. आणि यंदाकदाचीत दु:ख समोरून आलं तर हे आनंदाचं झाड दत्त म्हणून आपल्या पाठीशी उभं राहायचं.

  19.  आंब्यावरच लालभडक लटिंग आता दिसतच नाही. तसं म्हंटल तर आता लोकांना रानात राहायला आवडतच नाही. आणि नाही निसर्गावरती प्रेम करायला आवडत. आमच्या वेळी असं नव्हतं बुवा..  

  20. बालपणी खाली पडलं तर उठवायला सगले धावत येतात. पण आता उठवणं सोडा, नुसत बरा आहेस का? म्हणून देखील विचारात नाहीत.

  21.  शेताच्या मळ्यात कागदी होड्यांची शर्यत लावण्याची मजाच कुछ ओर होती.

  22. त्यावेळी शाळा एक मंदिर होतं.. आता मात्र सगळे व्यवसाय म्हणून बघतात.

  23. लहानपणी एकत्र मित्र मित्र नदीवर पोहायला जाताना आलेली मजा, आज शब्दात सांगूच शकत नाही.

  24. शाळेत वर्षातून एकदा वनभोजन असायचं. आणि तो दिवस म्हणजे निसर्गाच्या कुशीत घालवलेला दिव्य दिवस. पण आज मुलांना वनभोजन काय ते माहित आहे का विचारा?

  25. आमच्या वेळी स्त्री - पुरुष समानता या मूल्याचा प्रचार खूप मोठ्या स्तरावर केला गेला आणि शनिवारी शाळेच्या जमनी सारवण्याची वेळ ही मुलींबरोबर मुलांनाही पार पडावी लागत होती.

  26. लहानपणी आमचे खेळ ही मजेशीर होते. आज त्याचं कुणीच नाही असे वागतात.

  27. मी अनुभवलेलं बालपण म्हणजे स्वर्गसुखालाही लाजवेल असं होतं.

    माझ्या बाल मित्रानों बालपणीचे असंख्य किस्से तुम्ही सांगू शकता. ज्याला त्याला आलेला अनुभव हा वेगळा असणार आहे, पण भावना मात्र एकच असणार आहे. मित्रानों एक विनंती आहे की, स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी मेहनत घेतच राहिले पाहिजे, परंतु मित्रानों बालपण या सुखापासून एवढे पण दूर जावू नका की, म्हातारपणी तुमच्याकडे आठवणीच रहाणार नाहीत.

    माझ्या मित्रानों तुम्हाला काय वाटते या बालपणाबद्दल ते नक्कीच कळला...                                                                                                 

             

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!