प्रत्येक वाराच एक स्पेशल गुण असतो आणि या गुणाचा माणसावरती सकारात्मक प्रभाव पडत असतो. तसेच प्रत्येक वाराचा एक अलग रंग असतो. जसे मंगळ ग्रहाचा लाल रंग, शनी ग्रहाचा निळा रंग इ. असं म्हटलं जातं, ग्रहाच्या दिवशी त्याचा रंग परिधान केला तर, त्याचा त्या दिवसावर सकारात्मक परिणाम होतो.
भारतीय लोक ग्रह, ज्योतिषावरती विश्वास ठेवणारे आहेत. यामध्ये ठराविकच लोकांचा ग्रहावरती कमी विश्वास आहे. परंतु योगायोगाने वेळ तसी आली तर, न विश्वास ठेवणारे लोकही ग्रह, ज्योतिषा वरती विश्वास ठेऊ लागतात. यामध्ये स्त्रियांचा वाटा अधिक आहे. स्त्रिया ह्या प्रत्येक गोष्ट मिक्सर मध्ये जसा जूस घोळवून बनवला जातो ना, तसी प्रत्येक गोष्ट त्या विचार पूर्वक करत असतात. त्यांना कोणत्या गोष्टी कधी कराव्यात हे त्यांनी पक्क मनासी ठरवलेलं असते. आणि कदाचित त्यांच्यासाठी ते बरोबर ही असेल. परंतु काही अंशी ते बराबरच ठरत असते. जसे घराचा दरवाजा कुठे असावा, किचन कुठे असावे. शनिवारी शनीची पूजा केली तर शनीच्या कोपातून मुक्ती मिळते. सोमवारी उपवास केला तर तो फलाला येतो, असे बरेच काही. म्हणजे कोणत्या ना कोणत्या वाराचा सकारात्मक फायदा हा माणसावरती होत असतो.
स्त्रिया ह्या साड्यांच्या खूपच शौकीन असतात. त्यांना दिवसातून दहा वेळा सांगितले की, प्रत्येक चार तासांनी वेगवेगळ्या साड्या नेसा, तरीही त्यांना कधीच कंटाळा येणार नाही.
कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करणे लाभदायक असते?
सोमवार:
सोमवार या दिवसी पांढरा, चंदेरी, फिकट रंग घालणे शुभ मानले जाते. या दिवसावर चंद्राचा प्रभाव असतो.
मंगळवार:
मंगळवार हा मंगल ग्रहाचा दिवस. या दिवशी तुम्ही मरून किंवा लाल रंगाचा छटा असलेले कपडे परिधान करू शकता.
बुधवार:
हिरवा रंग व त्याच्या छटा बुधवारी घालू शकता. या दिवसावर बुध ग्रहाचा प्रभाव असतो.
गुरुवार:
गुरुवार या दिवसावर गुरु ग्रहाचा प्रभाव असतो. या दिवशी सोनेरी पिवळा किंवा पिवळ्या रंगाचा कोणताही शेड या दिवशी घालू शकता.
शुक्रवार:
शुक्र ग्रहाला प्रभावित करण्यासाठी शुक्रवारी ऑफ व्हाईट, सिल्व्हर, फिकट निळा, आकाशी, पांढरा, अशा रंगाचे कपडे घाला.
शनिवार:
काला, निळा, जांभळा या रंगाचे कपडे शनिवारी परिधान करावे.
रविवार:
रविवार हा रवीचा म्हणजे सूर्याचा वार. रविवारी गुलाबी, केशरी व जांभळा रंग घालणे लाभदायक असते.
Read More My Page
१. आनंदाचं झाड माझ्या अंगणी आहे
२. महाभारतकालीन राजकन्या जिला तिच्याच पित्याने वेश्या होण्यास भाग पाडले