पावसाळा सुरू झाला की, आपली धरती नवा शृंगार धारण करते. तिचे ते सौंदर्य पाहून सगळेच जीव आनंदामहात्सोव साजरा करतात. आणि हे सर्व पावसाला म्हणजेच आपला मान्सून खुशीने भरलेला संदेश घेवून येतो. विशेषत: लहान मुलांना मान्सूनच्या आगमनाची खूप घाई असते. उन्हामुळे अनेक महिने घरातच राहिल्याने लहान मुले नाराज राहतात. पण पावसाळा आला की सगळी मुलं खेळायला धावतात. या क्षणी त्यांचे पालकही त्यांना पावसात खेळण्यापासून रोखत नाहीत. तसे, ते ही पावसात मुलांबरोबर खेळण्याचा आनंद घेतात.
परंतु पावसाचा आनंद लुटताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अन्यथा अशा सुंदर हवामानात आपल्याला आजारी पडण्याची शक्यता असते, आणि तुम्हाला ते कधीच नको असेल. म्हणूनच पावसाळ्यात तुम्ही तुमच्या आरोग्याकडे चांगले लक्ष दिले तर, पावसाळ्याच्या दिवसांचा भरपूर आनंद खूप लुटता येईल.
आरोग्य हेल्दी ठेवण्यासाठी व्यायामाची आवश्यक असते. मग पाऊस आल्यावर व्यायाम कसा करायचा? असा प्रश्न सगळ्यांसमोर येतो. परंतु पावसात रोज बाहेर जाणे शक्य नसेल तर, घरीच व्यायाम केल्यास खूप चांगले होईल. जर तुम्ही रोज अर्धा तास व्यायाम करत असाल तर, तो तुम्हाला फिट राहण्यासाठी पुरेसा आहे.
पावसात गरमागरम पदार्थ खाण्यास खूप मजा येते. या दिवसात लोकं गरमा गरम जेवणावर अगदी तावच मारतात. परंतु रात्रीच्या वेळी तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवल्यास ते चांगले राहील. शक्यतो रात्री फक्त पचण्याजोगे अन्न खावे. असे अन्न खाल्ल्याने तुमची पचनशक्ती उत्तम राहील. बाहेरचा नाश्ता खाणे टाळा. या दिवसात बाहेरचे पकोडे खायला खूप मजा येते, पण त्यावर नियंत्रण ठेवावे. मला वाटतं, अशा सुंदर वातावरणात भोजनाचा लाभ आपल्या कुटुंबासह घरी घ्या. यातून तुम्हाला आनंद मिळेलच बरोबर तुमचे कुटुंब ही खुश होईल. याबरोबर तुमची तब्बेत ही हेल्दी राहील.
Read More : निरोगी राहण्यासाठी जेवल्यानंतर काय करू नये आणि काय करावे
जेवण झाल्यावर थोड्या वेळाने पावसात छत्री घेऊन नक्कीच फिरायला जावे. त्यात जास्त भिजणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर सर्दी होऊ शकते. पावसात घरात डास पाहुणे म्हणून येतात. म्हणूनच ते टाळण्यासाठी, आपले घर स्वच्छ ठेवले पाहिजे. कुटुंबाला सोबत घेऊन हे काम करा. पावसात सर्वत्र पाणीच पाणी असते, त्यामुळे डास तिथे घरटी करतात आणि अन्न म्हणून रक्त शिजवतात. म्हणूनच घरासमोरील टबमध्ये पाणी साचू नये याची खबरदारी घेतली पाहिजे. अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांनीही अशी खबरदारी घ्यावी, अन्यथा तुम्ही स्वतःच डासांना आमंत्रण द्याल. जर तुम्ही डासांना आमंत्रण दिले तर, तुम्हाला नक्कीच हॉस्पिटलमध्ये जावे लागेल. तुमच्या घराजवळ कुंडी असेल तर ती साफ करत रहा, ते डासांचे घर असते. ते टाळण्यासाठी तुम्ही घर आणि घरासमोरील संपूर्ण जागा स्वच्छ करा आणि झोपताना मच्छरदाणी लावायला विसरू नका. हा एकच पर्याय तुमच्याकडे आहे. विषारी गोष्टी मच्छर मारण्यासाठी वापरू नका. त्याचा तुम्हालाच त्रास होईल.
पावसाळ्यात चहा पिण्याचा आनंद काही औरच असतो. पावसाळ्यात गरमागरम चहा प्यायला तर, शरीराला खूप आराम मिळतो. पावसात हर्बल चहा घेणे खूप चांगले असते, परंतु जर आपल्या येथे मिळत नसेल तर, चहामध्ये तुळशीची पाने टाकून प्या. तुळशी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. आजही अनेकांना गवती चहा पिण्याची सवय असते. असा चहा पावसात पिऊ शकतो.
पावसात भिजण्याचा आनंद प्रत्येकाने घ्यावा. पावसाचा प्रत्येक थेंब आपल्याला या ईश्वराची अनुभूती देतो. पाऊस हा या पृथ्वीतलावरचा एक अलौकिक सुंदर क्षण आहे. तो कोणत्याच शब्दात मोजता या सांगता येणार नाही. पावसात भिजण्याचा आनंद घ्या, पण त्यात आजारी पडणार नाही याची काळजी घ्या.
पावसात छत्री आणि रेनकोट वापरा. त्यात कसूर करू नका. ओले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवू नका, यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. पावसात शरीर पूर्णपणे स्वच्छ ठेवणे आवश्यक असते. यावेळी केस स्वच्छ करणे आणि ते कोरडे करणे आवश्यक असते. अन्यथा तुम्हाला सर्दी होऊ शकते. अशा वेळी तुम्ही केसांना निलगिरी तेलाने मसाज करू शकता. पावसात थंडी असल्याने लोक अंघोळ करण्यास टाळाटाळ करतात. काही लोक आपले काम अर्ध्या बादलीतच पूर्ण करतात. तसेच पावसाळ्यात डोळ्यांचे आजार होतात. त्यामुळे डोळे स्वच्छ करणे खूप गरजेचे आहे.