मुलीला इम्प्रेस करण्याच्या प्रभावी टिप्स : How to Impress a Girl

SD &  Admin
0


हृदय हा माणसाचा असा भाग आहे, त्याशिवाय माणूस विचारही करू शकत नाही. हेच हृदय माणसाला सुखाची परिभाषा शिकवते. म्हणून तर या जगात तीन सुखे अशी आहेत, त्यांना मनुष्य आपल्या मृत्यूपेक्षा अधिक महत्त्वाचं  मानतो. पहिले भौतिक सुख, दुसरे प्रेम सुख, तिसरे धन सुख. या तीन सुखांशिवाय माणसाचे जीवन अपूर्ण आहे, असे ते मानतात. आणि आज या परिभाषेवरून आपण प्रेम सुखाबद्दल बोलणार आहोत. प्रेम माणसाला आकाशाच्या उंचीवर घेऊन जाते. प्रेम करणारी माणसं वेगळ्याच स्टाईलमध्ये असतात, हे तुम्ही पाहिलंच असेल.

आज या ब्लॉगच्या माध्यमातून आपण मुलीला प्रेमात इम्प्रेस करण्यासाठी कोणत्या हेल्दी आणि नैतिक गोष्टी केल्या पाहिजेत, जेणेकरून मुलगी तुम्हाला इम्प्रेस होईल आणि तुमचं नातं पुढे वाढत जाईल. जर तुम्हाला या ब्लॉमध्ये दिलेल्या टिप्स आवडल्या तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

स्त्री आणि मुली या देवाने पुरुषांना दिलेली अनोखी देणगी आहे. ही मुलगी सर्वप्रथम कोणाची तरी मुलगी आणि बहिणीच्या रूपात समोर येते. पुढे ती कोणाची तरी बायको म्हणून रूपात येते. पत्नी झाल्यानंतर ती सून आणि आईची भूमिका बजावते. आणि त्यानंतर ती सासूची भूमिका पूर्ण जबाबदारीने करते.

मुलीला इम्प्रेस करण्याच्या प्रभावी टिप्स : How to Impress a Girl
image credit to pexels

मित्रहो एका मुलीला आयुष्यात खूप मोठी जबाबदारी पार पाडावी लागते. म्हणून जेव्हा तुम्ही मुलीला इम्प्रेस करायला जाता, तेव्हा त्यांच्याशी हेल्दी आणि नैतिक गोष्टीचं नातं निर्माण करा. त्या नक्कीच तुम्हाला साथ देतील. परंतु हे करताना चेहऱ्यावर कोणताही नकली मुकवटा नको. जे काही सत्य असेल, तेच तिच्या पुढे ठेवा. म्हणजे पुढील काळात तुम्हाला कोणत्याही अडचणी येणार नाहीत.

मुलीला प्रेमात प्रभावित करण्याच्या सर्वोत्तम टिप्स :  How to Impress a Girl


मित्रहो.. प्रेमात अधिक घाई नको. म्हणून पहिल्या भेटीत... तुम्हाला ज्या मुलीला इम्प्रेस करायचे आहे, त्याआधी त्या मुलीशी हलकीशी मैत्री करण्याचा प्रयत्न करा. असे होऊ नये  की, तुम्ही एका मुलीला भेटला आणि लगेच तिला आय लव्ह यू म्हटले. यामुळे मुलीला गैरसमज बरोबर वाईट वाटू शकते. ती तुम्हाला फालतू मुलगा समजू शकते. त्यामुळे पुढे काय होईल, ते तुम्हीच समजू शकता. अर्थात तुमचा प्रस्ताव नक्कीच नाकारला जाईल. म्हणूनच प्रेमात अधिक घाई न करता, विचार पूर्वक निर्णय घेतले पाहिजेत.

मुलीला प्रभावित करण्यासाठी काही प्रभावी टिप्स आहेत. त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच मुली तुमचा विचार करू शकतात. आणि आता पर्यंतच्या संशोधनानुसार या टिप्स यशस्वी ठरल्या आहेत. परंतु मित्रहो.. तुम्हाला कळकळीने सांगू इच्छितो की, प्रेमात खोटारडेपणा नको. जे पण तुम्ही प्रेमात कराल, ते सगलं प्रामाणिक असायला हवं आहे. कुणाला धोका देऊन तुम्ही कधीच जीवनात सुखी राहू शकत नाही. आणि पुढे तुमचेच मन तुम्हाला सतत शिक्षा देत राहील.          

मुलींना इम्प्रेस करण्यासाठी त्याचं मन जाणून घेतलं पाहिजे. म्हणजेच त्यांना काय आवडतं, त्याने त्या खुश होतात. पाहूया त्या प्रभावी टिप्स 

१. प्रेमात हट्टी मुले

प्रेमात असलेल्या हट्टी मुलाच्या प्रेमात मुली लवकर पडतात. (सावधगिरी: तुमच्या हट्टी प्रेमामुळे त्या मुलीला दुखापत होऊ नये) जर तिला खरं वाटले की तुमचे तिच्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्ही तिच्याशिवाय राहू शकत नाही. मग अशावेळी तुमचे ९०% चान्सेस जिंक्ण्याचेच असतात. मित्रहो.. मुलीचा असा स्वभाव असतो, की जर कोणी तिच्या प्रेमात वेडे होऊन तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असेल, त्यावेळी त्या भावूक होतात. त्या मुलाचा विचार त्यांच्या मनात उसळू लागतो. अशा वेळी तुमचे प्रेम खरच प्रामाणिक असेल तर, तुम्ही डेट वर जाण्यासाठी तयार राहा. 

२. भावनिक मुले

मुलींचा असा विश्वास आहे की भावनिक ( Emotional ) मुले खूप काळजी घेणारी असतात. म्हणूनच जर तुम्ही एखाद्या मुलीशी भावनिक होऊन बोललात तर ती मुलगी पटकन ऐकते. तुमच्या डोळ्यातील अश्रू तिला एका ठिकाणी गप्प बसू देत नाहीत. ती हळूहळू तुमच्यावर विश्वास ठेवू लागते. त्यात कुठेतरी प्रेमाची झुळूक असते. आणि ती सतत वाढत जाते.

मित्रहो येथे तुम्ही काळजी घ्या, ते अश्रू खोटे नसावेत. तुमच्या बोलण्यातील शब्द प्रामाणिक आणि सत्य असावेत. खोटं बोलून तुम्हाला मुलगी नक्कीच भेटेल परंतु तिचं तुम्हाला खरं प्रेम नक्कीच भेटणार नाही. आणि पुढे कधीतरी तुम्ही मिळवलेलं खोटं प्रेम, नक्कीच कमी होत जाणार आहे.    



३. मुलींना स्वतःबद्दल ऐकायला आवडते

मित्रहो.. ही टिप्स फक्त तुमच्या हातात आहे. आणि तुम्ही हे केलत तर प्रेमाचं माहित नाही, परंतु ती मुलगी तुमच्या बरोबर बोलण्यासाठी सतत तुमच्या सोबत असेल. मित्रहो तुम्ही जेव्हा एखाद्या मुलीशी बोलता तेव्हा त्यातील 80% तिच्याबद्दल बोला. तिची स्तुती करा. तिच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक करा. आणि एवढं प्रमाणे आणि आपुलकीने बोला की, ती मुलगी आकाशात गिरक्याच मारत बसेल. येथे तुम्ही अर्धी लढाई जिंकता. पुढे सर्व तुमच्यावर आहे. तुम्ही कशा पद्धतीने तिच्यासमोर आपली बाजू मांडता.   

४. मुलींना उज्वल भविष्याची स्वप्ने दाखवा

मुलींना भविष्याची स्वप्ने पाहायला आवडतात. अशी स्वप्ने तिला कोणी दाखवली तर ती त्यात हरवून जाते. पुरुष आणि स्त्रियांमध्ये पाहिले तर पुरुषांपेक्षा स्त्रियांना स्वप्ने पाहण्याची सवय जास्त असते. भविष्यात ती कोणत्या मुलासोबत असेल? तो मुलगा कसा असेल? श्रीमंत की गरीब? तिचे स्वतःचे घर कसे असेल? तिच्या नवऱ्याचा स्वभाव कसा असेल? इ.

मित्रहो तुम्ही खरच त्या मुलीवर प्रेम करत असाल आणि तुमच्याकडे सर्वकाही आहे, जे त्या मुलीला सुखात ठेवता येईल, तर नक्कीच तुम्ही या टिप्सचा उपयोग करा.    

५. जबाबदार आणि क्षमाशील मुले

मुलींना भविष्याबद्दल अधिक काळजी वाटते, म्हणून ते जबाबदार आणि क्षमाशील मुले निवडतात. जर तुम्ही मुलींना जबाबदार असल्याची भावना दिली तर मुलगी लवकरच तुमच्याबद्दल विचार करेल. मुलीला इम्प्रेस करताना कोणत्याही गोष्टीवर लवकर रागावू नका. जर मुलीने कोणत्याही कारणाने काही चूक केली असेल तर तिला लहान समजून माफ करा, ती लवकरच प्रभावित होईल. ती समजते की, आज जर हा मुलगा मला माफ करत असेल तर लग्नानंतर जर काही चूक झाली तर तो मला नक्कीच माफ करेल.

6. मुलीला इतरांच्या तोंडून तुम्ही बोललेले प्रेमाचे शब्द ऐकायला आवडतात.

कदाचित कमी लोकांना माहित असेल की, मुलींना प्रेमाचे शब्द इतरांच्या तोंडून ऐकायला आवडतात. जेव्हा कुणी तिच्या तोंडून तुमच्याकडून बोललेले प्रेमाचे शब्द ऐकते, तेव्हा ती खूप आनंदी होते. जेव्हा तुम्ही आपल्या प्रेयशीबद्दल मित्रांशी बोलता, जसे की ती खूप सुंदर आहे. ती खूप छान बोलते. ती स्वभावाने खूप प्रामाणिक आहे. ती सगळ्यांशी प्रेमाने बोलते. जेव्हा ती अशा गोष्टी ऐकते तेव्हा तिचा तुमच्यावरचा विश्वास अतूट होतो.


मित्रहो आजकल मुलींना इम्प्रेस करणे अवघड नाही राहिलं आहे. जर तुमच्याकडे पैसा आणि पॉवर असेल तर, महत्वाकांशी मुली लगेच तुमच्या प्रेमात पडतात. परंतु मित्रहो येथे सांगू इच्छितो की, तुम्ही तरीही खऱ्या प्रेमाला कधीच मिळवू शकत नाही. खरं प्रेम मिळवण्यासाठी दोघांचं मन जुळलं पाहिजे. आणि ते तेव्हाच जुळेल, जेव्हा तुम्ही खरं प्रेम कराल.


         





Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!