साठीनंतरचे नवे आयुष्य आनंदात कसे जगावे?

SD &  Admin
0


साठी गाठल्यानंतर बहुतेक लोकं दुखी होत जातात. त्यांचा जगण्यातला सगळा राम निघून गेलेला असतो. आपलं  पुढे कसं होणार या चिंतेने ते व्याकूळ झालेले असतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे.. एक मृत्यू कडे वाटचाल आणि दुसरं म्हणजे म्हातारे झाल्यामुळे घरात कोणीच किंमत देत नाही. या मुळे त्यांचे जीवन निरागस झालेले असते. सतत ते स्वप्नाच्या आधीन झालेले असतात. आणि ती स्वप्नही फार भयावह असतात. खूप दु:खाच्या खाईतलं त्याचं जीवन असतं.     

माझे आदरणीय लोकंहो.. मी तुमचं दु:ख समजतो. एकटेपणा आणि तेही शेवटच्या क्षणी.. फार हृदयाला वेदना देणारं असते. म्हणून मी येथे तुम्हाला सांगू इच्छितो की, जर तुम्ही सकारात्मक विचार केलात तर तुम्हाला नवीन आशेचा किरण नक्कीच भेटेल. तुम्हाला तरुण झाल्यासारखे वाटेल. साठी म्हणजे काही मरण नव्हे. जर तुमच्याकडे जगण्याची इच्छा शक्ती असेल तर, तुम्ही खूप काही करू शकता. असं म्हटलं जातं.. वय तीन प्रकारे मोजलं  जातं. एक म्हणजे जन्मानंतर, दुसर तुमच्या शारीरिक आणि आरोग्याच्या स्थतीनुसार आणि तिसरे म्हणजे तुमच्या मासिकते नुसार. जर तुम्ही साठी गाठलेली आहे, तर तुम्हाला आता मानसिकता बदलावी लागणार. जर तुम्ही आरोग्याबरोबर आपली मानसिकता बदलली, तर तुम्हाला साठीनंतरचे नवे आयुष्य देखील सुंदर दिसेल.

तुम्हाला असे सुंदर आयुष्य जगण्यासाठी काय करावे लागेल, ते या लेखात आपण जाणून घेऊया. या लेखातून सर्व निरागस लोकांना आपले आयुष्य जगण्याची प्रेरणा मिलो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.

साठीनंतरचे नवे आयुष्य आनंदात कसे जगावे?
image credit to pexels.com  

 

जीवन जगण्याचा एक सरळ आणि उत्तम मार्ग आहे आणि तो म्हणजे तुमच्या मनाला आणि विचारांना सतत तरुण ठेवा. तुम्हाला सांगतो शरीर म्हातारे होते, मन आणि विचार नाही.

 

म्हातारपणात आनंदी जीवन जगण्याच्या सुंदर टिप्स  

१. आरोग्य हीच संपत्ती : - 

आरोग्य ही तुमच्या जीवनाची गुरु किल्ली आहे. जर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी व्यवस्थित घेत असाल, तर तुम्ही साठीनंतर ही तुमच्या घरच्यावरती बोझ म्हणून राहणार नाही. या साठी आरोग्य तपासणी, डॉक्टरांचा वेळोवेळी सल्ला घेणे आणि दररोज व्यायाम करणे तुम्हाला आवश्यक आहे.

२. प्रत्येक बदलाचा/ परिवर्तनाचा स्वीकार करा : -

आपण बदल स्वीकारले पाहिजेत. बदल होणे हे निश्चित आहे. त्यांना कोणीही बदलू शकत नाही. आपल्याला बदला- बरोबर चालायला पाहिजे. बदलातून तुम्ही चांगल्या गोष्टी शिकू शकता.

३. आराम आणि मनोरंजन :-

माणसाला चांगले आरोग्य जगण्यासाठी आराम आणि मनोरंजन देणाऱ्या गोष्टी करायला पाहिजेत. धार्मिक वृत्ती, चांगली झोप, संगीत आणि हास्य हे आपल्याला नक्क्कीच करायला पाहिजे. हे आपल्याला चांगले आयुष्य जगण्यासाठी मदत करतात.

मनात कोणताही द्वेष, राग न ठेवता सगळ्यांना ज्याच्या त्याच्या चुकी नुसार माफ करून, निखळ मनाने रात्री झोपी जा. तुम्ही स्वप्नात देखील हसत राहाल.

 

४. स्वार्थ सोडा :-

स्वार्थ माणसाचा शत्रू आहे. तो माणसाला आनंदापासून दूर घेऊन जातो. स्वार्थ आपल्याला शिकवतो की, जे काही आहे ते आपल्यालाच पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला ती गोष्ट मिळत नाही, तेव्हा तुम्ही दुःखी होता. म्हणून सतत समाधानी असावे आणि सगळ्यांशी प्रेमाने वागावे.

५. वेळेचे महत्व ओळखा :-

वेळ कोणासाठी थांबत नाही. आपल्याला तिच्या बरोबर चालायला शिकले पाहिजे. गेलेल्या वेळेकडे लक्ष देऊ नका. ती पुन्हा परत येणार नाही. तुम्ही येणाऱ्या वेळेची कदर करा आणि तिच्या बरोबर चाला. म्हणजे तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप होणार नाही.

असं म्हणतात.. आपल्याला जे ते काम त्याच वेळेत पूर्ण केले पाहिजे. जेणे करून भविष्यात आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासली तर पश्चाताप होत नाही.

 

६. माफ करा आणि विसरा :-

हे वय राग किंवा बदला घ्यायचे नसते. मुळात बदला घेणे वगैरे चुकीचे आहे. त्यातून आपल्याला खूप मनस्थाप होतो. आपल्या मनात नाही ते विचार घोलावत राहतात. यासाठी दुसऱ्याच्या चुकीचा जास्त विचार करत बसू नये. असे तुम्ही या वयात करत नसाल, तर तुमचा विनाकारण रक्तदाब वाढत राहील.

७. प्रत्येक गोष्टीमागे कारण असते:-

ह्या वयात विनाकारण चीड चीड होत असते. कोण काय करेल, न करेल.. तिकडे विनाकारण लक्ष असते. हे तुम्हाला बदलायला पाहिजे. आयुष्य जसे तुमच्या समोर येते, तसेच तुम्ही देखील त्याला सामोरे जा. तुम्ही स्वतः जसे आहात तसेच स्वीकारा. इतर ही जसे आहेत, तसेच त्यांना पण तुम्ही स्वीकारत चला. प्रत्येक व्यक्ती त्याच्या जागी ती योग्य समजत असते. तुम्ही बदलायचा प्रयत्न करू नका.

कोणतीही गोष्ट घडो, ती चांगली असो किंवा वाईट तीच्या मागे कारण नक्कीच असते. आणि याला आपणच कारणीभूत असतो. कारण आपल्याच कर्माचा त्यावर प्रभाव पडत असतो.

Read More : नाते घट्ट करण्यासाठी कोणत्या चुका टाळायला हव्यात.


८. मृत्यूच्या भीतीतून बाहेर पडा :-

मृत्यू हा प्रत्येकाला येणार आहे. ह्या सत्याला कोणीही बदलू शकणार नाही. आणि प्रत्येकाला ह्याची पूर्णपणे जाणीव असते. तरीपण आपण मृत्यूला घाबरत असतो. आपण विनाकारणच पाठचा विचार करत असतो. माणूस हा शरीर प्रिय आहे. त्याला वाटते की, त्याने कायम अमर राहावे. इथला उपभोग कायम घ्यावा. परंतु असे होत नाही. आपण नश्वर आहोत. मरण हे आपल्याला चुकलेले नाही. म्हणून त्याची चिंता करत बसणे चुकीचे आहे.

थोडी सावधानी :-

आयुष्य जगण्यासाठी पैसा अतिशय आवश्यक आहे. आयुष्यात सुरक्षा, आरोग्य, कुटुंब, जगण्यासाठी विविध गरजेसाठी पैसे आवश्यक असतो. परंतु तुम्ही विनाकारण कुटुंबांसाठी, नातवंडासाठी, मुलांसाठी पैसा गरजे पेक्षा अधिक वाया घालवू नका. इतके दिवस तुम्ही त्यांच्यासाठी जगत होता. परंतु आता वेळ आली आहे, तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराबरोबर वेळ घालवण्याची. जर तुम्हाला मुलं व्यवस्थित संभाळत असतील, तर खूपच उत्तम आहे. परंतु हेच  दिवस कायम राहतील ह्याची शाश्वती नसते.







Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!