वैवाहिक जीवन सुखी कसे करावे ? How to Make Married Life Happy ?

SD &  Admin
0


लाइफ खूप खडतर आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने संकटे आपला पाठलाग करतच असतात. आणि या सर्व धावपळीत आपलं खरखुरं आयुष्यच विसरून जातो.

असुद्या.. माणसाचा जन्म मिळाला आहे, म्हणजे संघर्ष हा आलाच. म्हणून काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. मित्रहो आज आपण वैवाहिक जीवन सुखी कसे करावे ? या बद्दल चर्चा करणार आहोत. माणसाच्या आयुष्यातील हा  एक गंभीर विषय आहे. आणि आजपर्यंत माणूस यावरती कारगर सोलुशन शोधतआहे.

विवाह हा आपल्या मानवी जातीचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे मनुष्याची उत्पत्ती कायम राहते. यामध्ये  लग्नाचे शास्त्रानुसार नियम ठरवले जातात. आणि या नियमाच्या आधारे माणूस आपले वैवाहिक जीवन व्यतीत करतो. धर्मानुसार पती-पत्नी एकमेकांना बांधले जातात. 

परंतु येथे एक प्रश्न पडतो की, आज मनुष्य विवाहाचे जे अतूट नियम आहेत, त्याचे पालन करतो का? जर आपण याचा अभ्यास केला तर, आज विवाह फक्त वासना तृप्त करण्याचा एक सार्वजिनक मान्य विधी वाटते. यावरती लोकं उघडपणे बोलत नाहीत, परंतु सत्य मात्र हेच आहे.


Marriage is a sacred union of two persons, two minds.
image credit to pexels.com 

आज पुरुष असो वा स्त्री. समाज दोघांना ही समान अधिकार देतो. त्यामुळे दोघेही शिक्षणाने आणि बुद्धीने एका पेक्षा एक वरचढ असतात. कोणीही एकेमकांना ऐकायला तयार नसतो. थोडासा इगो जरी दुखावला गेला, तरी दोघंही कुत्र्यासारखे एकमेकांवर धावत जातात. याचा परिणाम त्यांच्या नात्यावर नक्कीच दिसून येतो. अशा नात्यात वारंवार चुका केल्याने बांधलेलं नातं कचेसारखं तुटून जातं. मग असं नातं वाचवणे फार कठीण असते.

Read More : डेटिंग टिप्स : डेटिंगला जाताना कोणत्या टिप्स लक्षात ठेवायला हव्यात


लग्ना सारख्या पवित्र नात्यामध्ये अशा चुका होऊ नये म्हणून, दोघांनी समान पुढाकार घेतला पाहिजे. कारण असे नाते एकदा तुटले की, पुन्हा जोडणे फार कठीण असते.

मित्रहो.. जाणून घेऊया असे 
वैवाहिक नातं सुखी करण्यासाठी काय करायला हवे, म्हणजे असं नातं तुटण्याची  वेळच येत नाही. 
  
                     

How to Make Married Life Happy in Marathi ?


१. तुम्हा दोघांमध्ये कधीच इर्षा नसावी. ही ईर्षाच एकमेकांना स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्यास प्रवृत्त करते. जर तुमच्यात इर्षा नसेल तर तुम्ही एकमेकांना समान समजाल.

२. दोघांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. एकमेकांचा आदर केल्याने दोघेही एकमेकांचा आदर करतील. एकमेकांचा आदर केल्याने दोघेही एकमेकांचे विचार समजून घेतील. यामुळे दोघांमध्ये प्रेमाची भावना निर्माण होईल.

३. रोज नाही.. पण पतीने आठवड्यातून एक-दोनदा बायकोची स्तुती केली तर, बायकोही तुम्हाला प्रेमाच्या दृष्टीने सतत बघेल. त्यामुळे दोघेही एकमेकांकडे आकर्षित होता.

४. जर पतीने आपल्या पत्नीला महिन्यातून एकदा बाहेर फिरायला नेले, तिला एखादी छानसी भेट दिली तर, पत्नी खूप आनंदी होते. घराबाहेर एखादा दिवस एकमेकांसोबत शांतपणे घालवला तर दोघांमध्ये कितीही भांडणे झाली तरी या वेळी ती सर्व काही विसरते.

५. पती-पत्नीमध्ये विश्वास असणे खूप महत्वाचे असते. विश्वास ही एक अशी भिंत आहे, जी कोणत्याही तुटलेल्या नात्याला बांधून ठेवण्याची क्षमता असते. दोघांमध्ये प्रेम असते पण विश्वासाचा अभाव असतो, मग हे नाते फार काळ टिकत नाही.

६. पती किंवा पत्नीने शंका घेण्यापूर्वी शंभर वेळा विचार करावा. संशय हे एक विष आहे, जर हे विष दोघांच्या हृदयात आणि मनात बसले तर ते नाते काचेच्या तुकड्यासारखे तुटते आणि ते जोडणे खूप कठीण असते. म्हणून दोघांमध्ये विश्वास असेल तर संशयाला कुठेच वाव नसतो.

७. पत्नीने नेहमी अनोळखी पुरुषाशी सन्मानाने बोलावे किंवा वागावे. कोणत्याही पुरुषाला आपल्या पत्नीने अनोळखी पुरुषासोबत जास्त वेळ बोलावे किंवा कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवावे असे बिलकुल वाटत नाही. यातून संशय निर्माण होतो. बरोबर हे नाते तुटायला वेळ लागत नाही आणि हा नियम नवऱ्यालाही लागू होतो.

८. प्रणय पुरुष आणि स्त्रियांना आकर्षित करतो. तसेच या सुंदर क्षणासाठी पत्नीने नेहमी पतीसाठी वेळ काढावा. असे केल्याने तुमचा पती तुमच्यावर खुश राहील. तुमच्या जवळच राहील.  

९. पत्नीने कधीही आपल्या पतीची तुलना दुसऱ्या स्त्रीच्या पतीशी करू नये. आणि पतीनेही आपल्या पत्नीची तुलना दुसऱ्याच्या पत्नीशी करू नये.

१०. पतीने नेहमी आपल्या कुटुंबातील सदस्यांसमोर पत्नीची बाजू घेतली पाहिजे. पण दोष कोणाचा आहे, हे त्याने आधी तपासावे. दोष घरातील सदस्यांचा असेल तर, त्याने पत्नीच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. आणि दोष पत्नीचा असेल तर पत्नीला तिचा दोष सांगावा.

११. पती-पत्नीने कधीही संवेदनशील आणि गुप्त गोष्टी एकमेकांपासून लपवू नयेत. हे तुमच्यासाठी विनाआमंत्रित  संकटाला आमंत्रण देण्यासारखे असेल.

१२. तुमचे वैवाहिक जीवन यशस्वी करायचे असेल तर पतीने ही युक्ती अवलंबली पाहिजे. पत्नी नोकरी करत असेल आणि ती जेव्हा संध्याकाळी घरी येते, तेव्हा तिच्याशी प्रेमाने..  काळजी घेऊन बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिला कॉफी किंवा चहा पाहिजे का ते बोला. असे केल्याने तिला खूप आनंद होईल. तिला घरच्या कामात मदत करा. तिला कामात काही अडचण येत असतील तर, तिला त्याबद्दल विचारा. यावरून तुम्ही दोघं किती जवळ येत आहात ते तुम्हाला दिसेल. ही युक्ती सोपी आहे परंतु करायला सगळ्यांना अवघड वाटते. मित्रहो.. अहंकार बाजूला ठेवून एकदा असा प्रयत्न नक्कीच करा.

Read More : तुमची पत्नी या स्वभावाची आहे का?

१३. नवरा-बायकोचे नाते हे लहान मुलांसारखे असते. दोघंही कोणत्यातरी विषयावर बोलत असतात आणि त्यातली एखादी गोष्ट कुणाला आवडली नाही तर लगेच भांडण सुरू होतात. म्हणूनच हे नातं लहान मुलांसारखं असल्याचं म्हटलं जातं. पण जर कोणी अशावेळी समजूतदार होऊन समोरच्याला आपले मूल समजून माफ केले किंवा माफी मागितली तर ते भांडण लगेच थांबते. मित्रहो.. योग्य वेळी गप्प बसण्याचा किती फायदा होतो ते पहा. समजूतदारपणाने आणि थोडा वेळ माफी मागितल्याने मोठे संकट पटकन टळले जाते.

एक लेखक आणि रिलेशनवरती सतत काहीना काही अभ्यास करत असतो, म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आई-वडिलांच्या पश्चात पत्नी ही नवऱ्यासाठी आई असते आणि पत्नीसाठी नवरा हा बाप असतो. आई-वडिलांच्या पश्चात पत्नीच आईची जागा घेते. जसे घर संभाळणे, मुलांचे संगोपन करणे, नवरा आजारी पडल्यास त्याची काळजी घेणे, सुख-दुःखात पतीची साथ देणे. असे कित्येक कामे ती कोणत्याही विना मोबदल्यात करत असते. मग अशा वेळी पतीने जर थोडी काळजी, थोडी स्तुती, तिची जबाबदारी घेतली तर कुठे बिघडेल. शेवटी तुमचाच संसार सुखाचा होईल ना... 




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!