मोठ्या आवाजात गाणी ऐकताय | सावधान हेल्थ ऑर्गनायझेशनचा इशारा

SD &  Admin
0


स्मार्ट फोनचा जमाना आहे. आज प्रत्येक मनुष्य शिक्षित असो किंवा निरक्षर प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन असतोच. आज स्मार्ट फोनचे युजर जगभरात झपाट्याने वाढत आहेत. स्मार्ट फोनचे अनेक प्रकारचे तोटे आहेत, परंतु त्याच बरोबर काही फायदे देखील आहेत. अस म्हणतात की, कोणतीही गोष्ट असू दे, तिचा मर्यादेत वापर केला तर ती कधीच घातक नसते आणि झाला तरी कमी प्रमाणात होतो. गाणी ऐकायला प्रत्येकालाच आवडते. दुःखी अवस्थेत गाणी आपल्याला चांगल्याप्रकारे साथ देतात, त्यामुळे आपण काही वेळ दुःखापासून दूर राहतो. पूर्वी गाणी रेडीओवर ऐकायचो. परंतु त्याची जागा आता स्मार्ट फोनने घेतली. जिथे स्मार्ट फोन आला की, त्यावरती एअर फोन लाऊन गाणी ऐकण हे आलच. लोक तासान तास फोनवरती गाणी ऐकत असतात. मग एक प्रश्न पडतो की इतक्या वेळ एअर फोन वरती मोठ्या आवाजात गाणी ऐकणे धोक्याचे आहे का?

Read More : वजन कमी करणे आणि मधुमेह ( डायबेटीस ) नियंत्रण | डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा डाएट प्लॅन


गाणी ऐकणे खूप चांगले आहे. त्यामुळे तुम्ही इतर गोष्टीपासून दूर होऊन, तुम्ही मनाला आनंद देण्याचा प्रयत्न करता. परंतु तुम्हाला एका गोष्टीकडे नक्कीच लक्ष द्यावे लागेल आणि ते म्हणजे गाण्याचा आवाज छोटा करून हळुवार लयबद्ध होकर गाणी ऐकणे. त्यामुळे तुमच्या कानाला कमी प्रमाणात इजा पोहचेल अथवा गाण्याच्या वेळा ठराविक करून त्याचे प्रमाण कमी करा. आपल्या कानाच्या आरोग्यासाठी तुम्हाला हे करणे आवश्यक आहे. 

 


मोठ्या आवाजात गाणी  ऐकताय | सावधान हेल्थ ऑर्गनायझेशनचा इशारा
image credit to pexels.com 

हेल्थ ऑर्गनायझेशनने दिलेल्या इशाऱ्या नुसार, हिअरिंग लॉसच्या समस्येमुळे जगभरात ७५० मिलियन डॉलर खर्च होण्याचा अंदाज आहे. संघटनेच्या अधिकारी शेला चड्डा म्हणाल्या की, जगभरात एक अरब पेक्षा अधिक तरुणांना स्मार्ट फोनचा मोठ्या आवाजात गाणी ऐकायला पसंत असते. ते यासाठी इअरफोन किंवा हेडफोनचा वापर करतात. परंतु यामुळे ते बहिरेपणाचे शिकार होत आहेत. त्यांची ऐकण्याची शक्ती कमी होत चाललेली आहे. शेली चड्डा यांच्यानुसार ही आकडेवारी त्यांच्या एका अभ्यासावर आधारित आहे. हा अभ्यास साधारण चार वर्ष करण्यात आला. यात तरुणांची ऐकण्याची सवय आणि ते किती मोठ्या आवाजात ते गाणी ऐकतात या दोन गोष्टीवर लक्ष देण्यात आले होते.

या अभ्यासातून तरुणांच्या बहिरेपणापासून बचाव करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टीही समोर आल्या आहेत. प्रयत्न हाच केला जात आहे की, युजरला वाईट परिणामाबद्दल जागरूक केल जावं आणि मनाने सशक्त करणे जेणेकरून ते योग्य ऐकू शकतील आणि निर्णय घेऊ शकतील. 

महत्वाची टिप्स

वाढत्या इलेक्ट्रोनिक वस्तूमुळे तरुण-तरुणींचा त्यांचा उपभोग घेण्याची क्षमता झपाट्याने वाढत आहे. परंतु येथे लक्ष देण्याची गोष्ट ही येते की, त्यांचा अति वापरामुळे त्यांच्या शरीरावर चुकीचे परिणाम दिसून येत आहेत. त्यातलाच महत्वाचा विषय म्हणजे, मोठ्या आवाजात गाणी ऐकणे किंवा इतर घातक गोष्टींचे श्रवण अधिक करणे. परिणामी आजच्या तरुण-तरुणींमध्ये बहिरेपणाची लक्षणे वाढत आहेत. यातून योग्यवेळी बाहेर न आल्यास, ही समस्या वाढू शकते. किंवा कायमचा बहिरेपणा येवू शकतो.

                   









Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!