कथा माधवीची : स्त्री यौन शोषण हा सामाजिक आघात सध्या वर्तमान काळातच घडत नसून, तो पौराणिक कालापासून होत आलेला आहे. कलीयुगात या घटना घडणे स्वाभाविक आहे. कारण कली युंगाचे वैशिष्टच हेच आहे. परंतु इतर जी युगे होऊन गेली, सत युग, त्रेता युग, द्वापार युग, ह्या ही युगात नारी शोषण होत होते हे आपल्याला पौराणिक ग्रंथामधून आढळून येते. सत युगात नारी शोषणाचा उल्लेख नाही, परंतु त्रेता युग, द्वापार युगात मात्र स्त्री शोषणावरती बराच उल्लेख केलेला आहे. याचा अर्थ असा होतो की, स्त्रीचे पौराणिक कालापासून यौन शोषण होते आलेले आहे.
जर त्रेता युग आणि द्वापार युगात महापुरुषांच्या उपस्थित स्त्रीचे यौन शोषण होत होते तर, वर्तमान काळ म्हणजे कलियुगात पुढील काळ स्त्रियांसाठी कसा असेल, हे मात्र पुढील येणारा कालच आपल्याला सांगेल. पुरुषी अहंकाराला बळी पडलेल्या स्त्रियांची व्यथा ही अशा पशु वृत्तीला बळी पडलेल्या स्त्रियाच सांगू शकतील. परंतु एक सांगावेसे वाटते, जिने आपल्याला निर्माण केले.. तिचेच शोषण होने ही या धरतीवरील सर्वात अमानवीय आणि माणूसकीला काळिमा फासणारी गोष्ट आहे.
या लेखात आपण महाभारतकालीन अशा एका स्त्री विषयी जाणून घेणार आहोत, तिला खुद्द पित्यानेच वेश्या बनण्यास भाग पडले. प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की, तिचे रूपवान, शक्तिशाली पुरुषाशी विवाह झाला पाहिजे. विवाहानंतर सुखी संसार आणि पुत्र प्राप्ती याच गोष्टीची ती मांगणी करत असते. परंतु याच्या उलट जर असे घडले की, तिच्याच पित्याने स्वत:च्या स्वार्थासाठी आपल्याच मुलीला वेश्या होण्यास भाग पाडले तर, आपण त्याला काय म्हणाल.
आपल्या स्वप्नपूर्तीचा भंग झाल्यावरती काय वाटले असेल त्या स्त्रीला? पुरुषप्रधान संस्कृतीमधील ही लज्जास्पद गोष्ट आहे असे म्हणावे लागेल, लागेल म्हणजे आहेच. कदाचित तिची व्यथा तीच सांगू शकेल. या लेखात आम्ही अशाच स्त्रीची व्यथा आपल्या पुढे सादर करत आहोत.
राजा ययातिपुत्री माधवीची न ऐकलेली व्यथा
ही कथा सुरु होत आहे ऋषी विश्वामित्रांच्या आश्रमातून. कथा नुसार ऋषी विश्वामित्र यांचा शिष्य गालव याची विद्याप्राप्ती पुरी होताच, तो आपल्या गुरुला दक्षिणा मांगण्यास सांगतो. परंतु विश्वामित्र शिष्य गालवची परिस्थिती जाणून असतात, म्हणून ते दक्षिणा घेण्यास नकार देतात. परंतु गालव दक्षिणा दिल्याशिवाय जायला तयार नव्हता. तो आपल्या गुरूला म्हणतो, "गुरुदेव जर तुम्ही माझ्या कडून दक्षिणा घेतली नाही तर, मी अर्जित केलेल्या विद्येला काहीच महत्व राहणार नाही, म्हणून तुम्ही गुरुदक्षिणा मांगावी."
Read More : ईश्वर काय आहे? कोणाला माहित आहे ईश्वराच अस्तित्व कशात आहे?
विश्वामित्र गालवच्या हट्टापुढे काहीच करू शकत नव्हते. म्हणून ते गालवला ८०० शामकर्ण अश्व दक्षिणा म्हणून मांगतात. गालव तयार होतो आणि तो शामकर्ण अश्व शोधण्यास बाहेर पडतो. वाटेत त्याला त्याचा खास मित्र गरुड भेटतो. गालव त्याला झालेला वृन्तात सांगून टाकतो. गरुड ही त्याला मदत करण्यास तयार होतो. गरुडावर बसून गालव निम्या धरतीला पादाक्रांत करतो, परंतु त्याच्या हाती अपयशच येते. शेवटी गरुड त्याला राजा ययातिकडे जाण्यास सुजाव देतो. आपल्याला राजा नक्कीच मदत करेल यात कोणतीच शंका नाही. गरुडचे बोलणे ऐकून गालव राजा ययातिकडे जाण्यास तयार होतो.
गरुड आणि गालवला आपल्या राज्यामध्ये पाहून राजा त्यांचे स्वागत करतो. स्वागत झाल्यानंतर राजा त्यांना येण्याचे कारण विचारतो. गरुड राजा ययातिचा मित्र असल्याने तो राजाला कथन करतो की, राजन ऋषी विश्विमित्रानी दक्षिणा म्हणून माझा मित्र गालव याच्याकडे ८०० शामकर्ण श्वेत वर्णाचे अश्वांची मागणी केलेली आहे. आम्ही संपूर्ण धरती शोधून काढली परंतु आम्हाला कुठेच अशा प्रकारचे अश्व भेटले नाहीत. म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. तुमच्या कडून आम्हाला ८०० श्वेत वर्ण अश्व भेटले तर ऋषी विश्वामित्रांची आणि ऋषी गालवची नेहमीच तुमच्यावर कृपा राहील. बरोबर गालवची गृरू ऋणातून मुक्तता होईल. राजा ययाति हे फार मोठे दानशूर होते. परंतु त्यांच्याकडे पूर्वी सारखी परिस्थिती राहिली नव्हती. अनेक यज्ञ केल्यामुळे त्यांच्या राज्याचा कोश भांडार कमी झालेला होता. राजा ययाति आपली सत्य स्थिती सांगतात. परंतु ते गालवला आपली कन्या माधवी भेट देतात, आणि त्यांना सांगतात की, ऋषी गालव माझी ही कन्या दैवी भेट आहे. ती सर्वगुण संपन्न आहे. हिच्या पोटी चार शक्तिशाली पुत्र जन्माला येणार आहेत. म्हणून तुम्ही ही माझी कन्या दुसऱ्या एका राजाला भेट देऊन त्यांच्या कडून ८०० शामकर्ण अश्व मांगावे. माझ्या या कन्येचे सुंदर रूप बघून कोणीही तुम्हाला नाही म्हणणार नाही. परंतू आपल्याला एक विनंती आहे, आपले हे काम पूर्ण होताच माझी कन्या पुन्हा परत करावी.
राजा ययातिची आज्ञा घेऊन माधवी बरोबर गालव अयोध्याचा राजा ह्रीशबकडे जातात. गरुड राजा ह्रीशबकडे जाऊन माधवीच्या बदल्यात ८०० शाम कर्ण अश्वाची मागणी करतो. राजा ह्रीशब माधवीची सुंदरता पाहून मोहित होतो. राजा तयार होतो, परंतु त्याच्याकडे सध्या २०० शाम कर्ण अश्व आहेत ते मी तुम्हाला देतो. माधवी कडून माझी एका मुलाची इच्छा आहे, ती पूर्ण होताच माधवीला तुम्ही घेऊन जाऊ शकता, असे सांगतो. गरुड आणि गालव माधवीला काही काळासाठी तिथे ठेऊन २०० अश्व घेऊन पुढे निघून जातात. एकवर्ष पश्चात राजा ह्रीशबला एक पुत्र प्राप्ती होते. नियमानुसार एक पुत्र प्राप्ती नंतर गरुड आणि गालव माधवीला तेथून घेऊन पुढील ६०० अश्व शोधण्यासाठी जातात. या प्रमाणे गालव आणि गरुड क्रमश काशीराज दिबोदास आणि भोजराज उशीणर या राजांजवळ जाऊन माधवीच्या बदल्यात २०० या प्रमाणे ४०० अश्वाची प्राप्ती करतात. काही कालाने माधवीला दोन्ही राजांपासून एक एक पुत्र प्राप्त होते. ६०० अश्व प्राप्त झाल्यानंतर गरुड आणि गालव पुन्हा पूर्ण धरती शोधून काढतात परंतु त्यांना २०० अश्व कोठेही मिळाले नाहीत. या वरती गरुड गालवला म्हणतो की, या धरतीवरती आता शाम कर्ण अश्व समाप्त झालेले आहेत. त्याचबरोबर गुरु विश्वामित्रांनी दिलेली वेळपण जवळ आलेली आहे, म्हणून कृपा करून ६०० अश्व घेऊन आपण आपल्या गुरुंना भेट करावे. गालवलाही गरुडचे म्हणणे पटते. गालव मिळालेले ६०० अश्व बरोबर माधवीला घेऊन गुरु विश्वामित्रांकडे जातो.
Read More : आम्हाला जगण्याचा अधिकार द्याल का ? Why do some of us enjoy torturing animals?
गालवने मिळालेले ६०० शाम कर्ण अश्व आपल्या गुरुला भेट करतो आणि क्षमा मांगतो की, हे गुरुदेव या धरतीवरती शाम कर्ण अश्व समाप्त झालेले आहेत. तरी कृपा करून तुम्ही हे ६०० अश्व स्वीकार करावे. राहिलेल्या २०० अश्वच्या बदल्यात तुम्ही माधवीला स्वीकार करावे. गुरु विश्वामित्र गालवची स्थिती समजून, २०० अश्वच्या बदल्यात माधवीला स्वीकार करतात. पुढील वर्षात ऋषी विश्वामित्र आणि माधवीच्या संयोगाने एक पुत्र जन्माला येतो, त्याचे नाव अष्टक ठेवले जाते. गुरूला दिलेले वचन आणि माधवीला चार पुत्र झाल्यानंतर गालव माधवीला तिच्या पित्याकडे घेऊन जातो.
स्त्री शोषणवरती विचार करायला लावणारे बिंदू
ही कथा पौराणिक असल्यामुळे आपल्याला कदाचित काहीही वाटणार नाही. परंतु कदाचित तुम्ही माधवीच्या ठीकांनी राहून जर विचार केला तर, तुम्हाला नक्कीच कल्पना येईल की त्या काळी स्त्रियांची अवस्था किती बेचैन करणारी होती. जर एका राजाची पुत्री असून देखील माधवीला एवढे कष्ट आणि यौन शोषणाला बळी पडावे लागले तर इतर खालच्या जातीतील स्त्रियांना कोणत्या कोणत्या शोषणाला बळी पडावे लागले असेल याची कल्पना देखील करू नये.
एक पिता स्वत: च्या स्वार्थासाठी आपल्या मुलीला अनेक पुरूषांबरोबर देहविक्री करण्यास भाग पाडतो. त्याने थोडा देखील आपल्या मुलीचा विचार केला नाही की, आपल्या मुलीला कोणत्या प्रकारचे कष्ट सहन करावे लागतील. प्रत्येक स्त्रीचा पवित्रता हा एकच अनमोल दागिना असतो आणि तो जर ती गमावून बसली तर तिच्या पुढे फक्त मृत जीवन शिल्लक राहते. म्हणून माधवीने पुन्हा लग्न न करता, तपस्चर्या करण्यास वनात निघून जाते. काय वाटले असेल तिला. अनेक पुरूषांबरोबर रात्र काढून, बरोबर चार मुलांची आई कशी पुन्हा पित्याच्या सांगण्यावरून दुसऱ्याशी लग्न करेल. तिचे दु:ख स्वत :च्या पित्याने जाणले नाही, ते दुसरा पुरुष कसा जाणेल. ऋषी विश्वामित्र आणि गालव सारखे विद्वान ऋषी देखील एका स्त्रीची व्यथा समजू शकले नाहीत, तर सामन्य पुरुष कसा समजू शकेल. पुरुष प्रधान वृत्ती ही एवढ्या खालच्या दर्जाची असेल हे कदाचित या विधात्याला देखील वाटले नसेल. ……….या गंभीर प्रश्नावरती प्रत्येकाने विचार करायला हवा.