पिकनिक हा आज प्रत्येकाच्या जीवनशैलीचा एक मोठा भाग बनला आहे. आज वीकेंडला पिकनिकला जाणे दररोजचे झाले आहे. आणि तसे म्हटले तर आपल्याला पिकनिकचा एक मोठा फायदा आहे आणि तो म्हणजे आपण पुढचा आठवडाभर आरामात आणि रेफ्रेश बनून काम करतो. बरोबर रोजच्या धावपळीपासून वेगळे होऊन आपल्या कुटुंबाबरोबर आणि मित्रांसोबत आनंद लुटतो.
खरच कधी ना कधी एक फॅमिली पिकनिक असावीच. आणि त्याचे महत्त्व आपल्यालाही माहित आहेच. परंतु आज पिकनिक करणे सोपे राहिलेले नाही. पिकनिक आली की खर्च आला. पिकनिकला काय काय करायचं? पिकनिकचं ठिकाण योग्य आहे की नाही? ते आधी ठरवावं लागतं. त्या ठिकाणी मुलं एन्जॉय करतील की नाही? अशी आवश्यक ती प्रथम काळजी घ्यावी लागते. या जर गोष्टी व्यवस्थित नियोजन पद्धतीने केल्या तर पिकनिकला कोणत्याही अडचणी येत नाहीत.
मित्रहो तुम्ही पिकनिकचे प्लान करत आहात, ती पण फॅमिली पिकनिक. मग आपल्याला खबरदारीने पिकनिकचे नियोजन करावे लागेल. या साठी आम्ही तुम्हाला काही नियोजनबद्ध फॅमिली पिकनिक टिप्स शेअर करत आहोत. या आवडल्यास नक्कीच फॉलो करा.
Tips For A Successful Outdoor With Family in Marathi
{कुटुंबासह यशस्वी आउटडोअर पिकनिक कशी करावी}
१. पिकनिक खासकरून आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी आणि मुलांसाठी करत असतो. यासाठी पिकनिकचे ठिकाण प्रथम मुलांचे आवडीचे असावे असे मला वाटते. कारण पिकनिकचे ठिकाण मुलांना आवडले नाही तर, तुमची पिकनिक बोअर होऊन जाईल. जर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवशी पिकनिकचा बेत आखत असाल तर तुमच्यासाठी ते पार्क किंवा एखादी सुंदर निसर्गरम्य जागा योग्य असेल. मित्रानों पिकनिक निर्जन स्थळी बिलकुल नसावी. बरोबर पिकनिकच्या वेळी चुकीच्या माणसांशी मैत्री करू नका आणि महत्वाचं मुलांकडे या वेळी नक्कीच लक्ष द्या.
२. मुलांसाठी खाद्यपदार्थांची यादी बनवा आणि पिकनिकच्या वेळी ते सर्व सोबत घेऊन जा. कारण पिकनिकमध्ये मुलांचा मूड प्रामुख्याने खाण्याचा आणि खेळण्याचा असतो. पिकनिक दरम्यान पचनासाठी जड पदार्थ घेणे टाळा.
३. फर्स्ट अॅड किट घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. खेळताना मुलांना दुखापत होण्याची शक्यता असते. दुखापत झाल्यानंतर लगेच बाहेरून औषध आणणे कठीण होऊन बसते. त्यामुळे फर्स्ट अॅड किट सोबत असणे अत्यंत आवश्यक आहे.
४. पिण्याचे पाणी, कोल्ड्रिंक्स, लिंबूपाणी, ज्यूस सोबत घ्या. खेळताना किंवा गप्पा मारताना असे भरलेले ग्लास तुमच्या हातात असतील तर, वातावरण अगदी आल्हादायक होते. एक वेगळीच मजा येते.
५. पिकनिक होत आहे, म्हणजे तुम्ही कुठेतरी जेवायला किंवा गप्पा मारायला एकत्र बसाल, म्हणून सोबत आरामदायी चटई, उशा तसेच आवश्यक तुमच्या आवडत्या गोष्टी नक्कीच घ्या.
६. आपली एक सामाजिक जबाबदारी असते. म्हणून जेव्हा कधी आपण बाहेर फिरायला जातो, तेव्हा आपल्याकडून जो कचरा निर्माण होतो, त्याची व्हील्लेवाट लावणे आपली जबाबदारी आहे. म्हणून सोबत डस्टबिन घ्या. किंवा पिकनिकच्या ठिकाणी डस्टबिन उपलब्ध असेल तर, तुमच्याकडून होणारा कचरा, त्या ठिकाणी टाकायला विसरू नका.
७. जर तुम्हाला पिकनिकमध्ये किंवा प्रवासात गाणी ऐकण्याची सवय असेल. तसेच पिकनिकच्या वेळी तुमच्या मुलांचे मनोरंजन व्हावे, यासाठी तुमचे आवडते मनोरंजन टूल्स घ्यायला विसरू नका.
८. पिकनिक लोकेशन हे मुलांच्या आवडीचे तुम्ही निवडत असला तरी, ते फॅमिलीसाठी सुरक्षित आहे की नाही ते नक्कीच एकदा चेक करून पहा.
९. जर तुम्ही स्वतःच्या गाडीने प्रवास करत असाल तर, गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवा. तसेच गाडीचे सर्व पार्टस व्यवस्थित काम करत आहेत की नाही ते तपासून पहा.
१०. रात्रीचा प्रवास टाळाच.. जी काही मजा करायची असेल ती दिवसभर करा..
Read More : पुण्यातील सुंदर पर्यटन स्थळे : Famous Tourist Places in Pune District in Marathi
मित्रहो या बेसिक गोष्टींचं तुम्ही काटेकोरपणे पालन केलत तर, नक्कीच तुमची फॅमिली पिकनिक यादगार बनेल. तसेच पिकनिकच्या वेळी सोबत चालू डेबिट कार्ड तसेच रोख रक्कम सोबत असुद्या. कारण कधी कधी डेबिट कार्ड बंद पडले, तर सोबत रोख रक्कम असणे फार गरजेचं आहे.