सुपरहिट मराठी चित्रपट आनंदाचं झाड हा चित्रपट पाहिल्यावर खरच आनंद म्हणजे काय असतो आणि कोणत्याही परीस्थित आनंदाने कसे जगायचे असते ह्याचे उत्तम उदाहरण या चित्रपटातून पाहायला मिलते. दुःखापासून आणि संकटापासून कोणीही सुटलेलं नाही. जिथे जन्म मिळाला, तिथे संघर्ष हा आलाच. परंतु अशा ही परीस्थित स्वतःला स्थिर ठेऊन आनंदाचा क्षण वेचण्याचा जो प्रयत्न करतो, तो सतत दु:खाच्या छायेत असून ही आनंदाच्या अंगणातला अनुभव घेत असतो.
संकटे कितीही आणि कधीही येवोत. परंतु आपल्या मनामध्ये आनंदाच्या झाडाचे सात्विक गुण असतील तर संकटे आपल्याला छोटी वाटतात आणि आपण आनंदाने बहरून जातो.
मला आठवतं, कोंकणातल्या त्या छोट्याशा निसर्गरम्य गावात माझं छोटसं घर. पुढे अंगण आहे. बाग बगीचा आहे. आणि बरोबर अंगणाच्यामध्ये एक आंब्याचे झाड आहे. हे आंब्याचे झाड माझे आनंदाचे अंगण आहे. हे आंब्याचे झाड, मला वाटतं.. कित्येक पिढ्याचा साक्षीदार असेल. ह्या झाडाने उन्हाले, पावसाले, सुख दुःखाची लहरे पाहीली असतील. परंतु आजही हे झाड आनंदाच्या छायेखाली एका रुबाबात, माणसाला खऱ्या जीवनाचे उदाहरण देत आहे. ह्या आनंदाच्या झाडाखाली जेव्हा जेव्हा मी समय व्यतीत करतो, तेव्हा मला एक वेगळीच अनुभूती येथे. मन आनंदाने भरून जाते. या झाडाखाली बसल्यावर बालपणीचे दिवस आठवू लागतात. या आठवणीत सुख दु:खाचे भानच राहत नाही. या झाडाच्या अंगणात खेळताना किती तरी वेळा पडलो असेल. आई जेव्हा माझ्यावरती रागवायची तेव्हा मी याच झाडाच्या छायेखाली रडत बसायचो. आणि जेव्हा मी या झाडाच्या छायेखाली बसायचो तेव्हा रडणे वैगरे लगेच दूर पलायचे. खरच.. वेगळेच ते दिवस होते. आज नुसती या झाडाची आठवण तरी झाली तरी, पाय लगेच आपोपाप शहरातून गावाकडे ओढले जातात.
आनंद म्हणजे काय असतो हो? आणि तो कसा मिळवायचा? हे आजपर्यंत कित्येक लोकांना माहिती नसेल. आणि हेच मुख्य कारण त्यांच्या दु:खाला कारणीभूत ठरत असते. परंतु तुम्हाला हे सांगावेसे वाटते की, आनंदाचे झाड हे कोठेही रुजत नाही तर, ते आपल्याला मनातून रुजवावे लागते. दु:खात छोटीसी का होईना आशेचा आणि स्वप्नाची धार आपल्याला आनंदाची आणि सुखाची अनुभूती देत असते.
Read More : चांगले विचार : तुमच्या आयुष्यातील चांगली कामे कोणती आहेत? | Delight Life Style
थोडसं आपल्याला सांगावेसे वाटते, दु:खाच्या आणि संकटाच्या छायेत प्रत्येकाला सुखाचा छोटासा का होईना कवडसा मनामध्ये अलगद येऊ द्यावा. हा छोटासा कवडसा आपल्या दु:खी मनाला सुखाकडे जाण्यासाठी मार्ग मोकळा करत असतो. अंधकारातून जाताना एक छोटीसी मशाल देखील आपल्याला अंधकारातून प्रकाशाची वाट दाखवत असते. सांगायचा एकच उदेश हा आहे की, दु:खात घाबरून न जाता, त्यातून सुखाचा क्षण शोधण्याचा प्रयत्न करा. माणसाला आशा नावाची सुखाची सखी आहे. ही आशा आहे ना.. ती माणसाला भल्या भल्या संकटाला सामना करण्यासाठी ढाल म्हणून मदत करत असते.
मी जेव्हा कधी दु:खी असेल, तेव्हा या माझ्या अंगणातील आंब्याच्या झाडाखाली बसून बालपणीच्या आनंदाचा छोटासा कवडसा मनामध्ये आठवून दु:खावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातून जी सुखाची उब मिलते ना त्याने मन ओसंबून जाते. काही माणसांच म्हणण असतं की, स्वप्नात राहणे म्हणजे वेळ बरबाद करणे आहे. परंतु काही अंशी बरोबर असले तरी, स्वप्न पाहायल्या शिवाय माणूस कधीच प्रगती करू शकत नाही. स्वप्न माणसाला प्रेरणा देतात. माणसाला प्रगतीच्या पथावर उभे राहण्यासाठी मार्ग मोकळा करून देतात. परंतु स्वप्न ह्या ही पुढे जाऊन जे महत्वाचे काम करतात ते म्हणजे, माणसाला दु:खाच्या समयी सुखाची किरणे बनून माणसाच्या मनाला आनंदाचा स्पर्श देण्याच काम करतात.
Read More : बालपणीच्या आठवणी | ९० व्या दशकातील बालपणीच्या आठवणी | Childhood Memories in marathi
आनंदाचे झाड हे प्रत्येकाच्या अंगणी असायलाच पाहिजे. ह्या झाडाचा गारवा हा आईच्या मायेच्या उबे सारखा जाणवतो. धुंध आणि दु:खी मनाला येथे सुखाचा विसावा मिळतो. मनातील सगळी मरगळ आणि शरीरातील त्राण निघून येथे मोकळा श्वास मिळतो.
आनंदाच्या अंगणातील फार सुंदर मधुर कविता. मनाला सतत गारवा देत राहील...
आनंदाचे झाड माझ्या अंगणी असावे, दुख गळून जावे आणि सुखाचे कोंब यावे,
नवीन पालव्यानी आनंदाने मन बहरून जावे,
दुःखाच्या फांद्यांना सुखाची ही फुल फळे यावी,
दुख कितीही येवोत आनंदाचे झाड प्रत्येकाच्या मनी असावे,
प्रत्येकाच्या मनात आनंदाच्या झाडाचे बीज रुजावे,
आनंदाच्या झाडाने प्रत्येकाच्या मनावर सुखाचा वर्षाव करावा,
दु:खी मनाला सुखाची पालवी फुटावी,
बालपणीच्या आठवणीने मन आनंदाने बहरून जावे,
आयुष्य कितीही वाढले तरी आनंदाचे झाड मनी बसावे,
आनंदाचे झाड माझ्या अंगणी असावे ...हिऱ्या मोत्याप्रमाणे जीवन उजळावे....
फार सुंदर कविता आहे. वाचताना अगदी मनाला खूप भावते. तुम्हाला एक आनंदी राहण्याचे सिक्रेट सांगतो. जेव्हा कधी तुम्हाला दु:ख वाटतं किंवा कशात मन रमत नाही, तेव्हा तुम्ही आठवणीतील सुखाच्या क्षणांना कुठेतरी निसर्गाच्या कुशीत एकांतात उजळणी करा. हे क्षण एखाद्या मधुर कविते सारखेच असतात. मनाला खूप आनंदाचा गारवा देतात.
मित्रहो आनंदाचं झाड हे तुमच्या मनात आहे, ते तुम्ही कसे रुजवता हे तुमच्याच हातात आहे. आणि माझी एक विंनती आहे की, या झाडाला कधी निर्जीव करू नका. ते सतत जगत ठेवा.