जगात सर्व प्रकारची नाती आहेत आणि त्यांची विशेषता ही वेग-वेगळी असते. जेव्हा आपण रिलेशनमध्ये असतो तेव्हा आपल्याला कोणते ना कोणते अनुभव येत असतात. त्यापैकी काही अनुभव आपल्याला आनंद देतात तर काही अनुभव दु:ख देतात. जे अनुभव आपल्याला दु:ख देतात, ते आपल्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप रोगी बनवतात. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांना असे अनुभव अधिक प्रमाणात येतात. कारण या नात्यात शारीरिक आकर्षण जास्त असते. आणि जेव्हा हे आकर्षण कमी होते, तेव्हा त्यांना त्या व्यक्तीचा कंटाळा येतो. मग ते प्रत्येक बाबतीत एकमेकांना अडवण्याचे काम करतात. मग यादरम्यान त्यांच्यात मोठी भांडणे होतात. यामध्ये कधी कधी गंभीर इजा ही होतात.
टॉक्सिक रिलेशनशिप म्हणजे काय आहे? What is a Toxic Relationship?
ज्या नातेसंबंधात व्यक्ती मानसिक आणि भावनिकदृष्ट्या कमकुवत होते. तसेच शारीरिक आकर्षणाशिवाय काही उरत नाही, ते नाते टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये बदलते. याचा अर्थ जोडीदार आपल्या जोडीदाराशी गैरवर्तन करत राहतो. त्याला नेहमी आपल्या कट्रोलमध्ये ठेवायचे असते. जोडीदाराच्या इज्जतीशी त्याला काही देणेघेणे नसते. जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडतो. अशा नात्याला टॉक्सिक रिलेशनशिप म्हणतात.
Read More : जोडीदाराचे कोणते गुण प्रत्येक पुरुषाला आकर्षित करतात ?
टॉक्सिक रिलेशनशिप कसे असेल? What would a toxic relationship look like?
१. आदराचा अभाव
टॉक्सिक नातेसंबंधात आदराची भावना फारच कमी असते. नाही म्हटले तरी चालेल. हे लोक कधीच आपल्या जोडीदाराचा आदर करत नाहीत. तो नेहमी स्वतःला महान समजतात. त्याला जोडीदाराच्या भावनांशी काही देणेघेणे नसते.
२. स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवणे
यामध्ये लोकांना नेहमी आपल्या पार्टनरवर नियंत्रण हवे असते. त्याचा जोडीदार त्याच्या पुढे जाऊ नये असे त्याला वाटत असते. त्यांच्यामध्ये अहंकार भरगच्च भरलेला असतो. त्याच्या अहंकाराला थोडा जरी धक्का लागला तर ते लगेच हिंसक बनतात.
३. सतत संशय घेणे
असे लोक आपल्या जोडीदारावर सतत संशय घेतात. त्यांचा जोडीदार त्याच्या मित्राशी बोलत असला तरी ते संशयदृष्टीने बघतात.
४. वाईट दिवसात साथ देत नाहीत
यामध्ये जोडीदार वाईट दिवसात कधीच साथ देत नाहीत. त्यांचाशी स्वार्थासाठी रिलेशन ठेवतात. जोडीदाराला निराश करणे ही त्यांची सवयच झालेली असते.
५. अधिक शारीरिक संबध ठेवणे
यामध्ये शारीरिक आकर्षणामुळे लोक पार्टनरसोबत राहतात. हे काम झाल्यानंतर, त्यांचे जोडीदाराशी दुसरे कोणतेही नाते नसते. त्यात काही अडचण आली तर त्यांच्यात भांडणे होतात. जोडीदाराला मारहाण करतात.
६. कोणतीही जबाबदारी नसते
नातं दीर्घकाळ टिकवण्यात जबाबदारीचा मोठा वाटा असतो. पण नात्यात एक जोडीदार जबाबदारी घेतो आणि दुसरा जबाबदारीपासून पळ काढतो, मग असे नाते फक्त नावापुरतेच असते, बाकी काही नाही.
७. शोषण करणे
सतत शोषण हा टॉक्सिक संबंधांचा एक मोठा दोष आहे. यामध्ये पार्टनर नेहमी चुका करत राहतो, त्यामुळे तो अडचणीत पडत राहतो, पण तो स्वत:ची चूक मान्य करत नाही, उलट तो दुसऱ्या पार्टनरवर टाकतो.
८. आपुलकीचा आधार नसणे
रिलेशनशिपमध्ये असूनही पार्टनर आपुलकीने कधीच साथ देत नाही. त्याच्यासाठी तुम्ही कठपुतळीसारखे असता. ते मुद्दाम त्यांना वेळ देऊ इच्छित नाही.
Read More: या सहा वाईट सवयींपासून नेहमी दूर रहा | हेल्दी शरीर टिप्स
टॉक्सिक नातेसंबंधाबाबत तुम्हाला काय वाटते?
टॉक्सिक नातेसंबंधात खूप दुखापत आणि असुरक्षित वाटते. आपण नातं बनवलं आहे, म्हणून ते टिकवण्याचा प्रयत्न करतात. घर आणि समाजाच्या भीतीने ते नाते जपण्याचा प्रयत्न करतात. पण हे नाते त्यांना नरक यातना देते. नाते तुटण्याच्या भीतीने त्यांचे मन काम करू शकत नाही. ते डिप्रेशनमध्ये जातात. मानसिक व शारीरिकदृष्ट्या खाली उतरतात. त्यांना निरुपयोगी वाटू लागते. कधी कधी ते हे नातं संपवण्याचा विचार करतात, पण त्यातून बाहेर पडणं त्यांना अवघड जातं. त्यांचे मन इकडे तिकडे भटकत असते. ते योग्य निर्णय घेण्यात कमकुवत होतात. अशा वेळी योग्य मार्ग सापडला नाही तर जीवन संपवण्याचा विचार ही करतात.
टॉक्सिक नातेसंबंधातून कसे सुटायचे?
जेव्हा एकमेकांबद्दल आदर आणि विश्वास कमी होतो, तेव्हा कोणतेही नाते टॉक्सिक नातेसंबंधात बदलते. नवीन नातं आलं की सगळं चांगलं असतं, पण जसजसं नातं वाढत जातं, तसतसं काही ना काही कारणानं तुमच्यात भांडणं होतात. एक जबाबदारी घ्यायला तयार असेल, तर दुसरा तयार नसतो. जेव्हा तुमच्या जोडीदारामध्ये तुमच्यासाठी महत्त्व नसते, तेव्हा असे नाते घडते. अशा वेळी नात्यामधून दूर राहणेच तुम्हाला योग्य असेल.
टॉक्सिक रिलेशनशिप टाळण्यासाठी काय करावे?
१. नाते पुढे नेण्यापूर्वी तुमच्या पार्टनरला पूर्णपणे समजून घ्या, तो कसा आहे? त्याला तुमच्याकडून काय हवे आहे. तुमच्यासोबत राहण्याचा त्याचा उद्देश काय आहे?
२. पार्टनर तुमची जबाबदारी घ्यायला तयार आहे की नाही, त्याची माहिती घ्या.
३. जोपर्यंत तुम्ही त्याला पूर्णपणे ओळखत नाही, तोपर्यंत त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवू नका.
४. जेव्हा तुम्ही मित्रांसोबत असता तेव्हा, ओळख की, तो तुमचा किती आदर करतो.
५. तो तुमची भावनिक आणि मानसिक काळजी घेतो का?
६. शारीरिक संबंध करण्यासाठी तो तुमच्यावर वारंवार बळाचा वापर करतो का?
७. त्याला तुमच्यावर नियंत्रण ठेवायचे आहे का?
८. एखाद्या गोष्टीवरून भांडण झाल्यावर, तो सॉरी बोलून तुमची माफी मागतो का?
९. तुम्ही लिव्ह इन रिलेशनमध्ये असाल तर, तो लग्नासाठी तयार आहे की फक्त अशा प्रकारे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू इच्छितो.
१० सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्हाला त्याच्यासोबत सुरक्षित आणि मनापासून प्रेम वाटते का?
या सर्व गोष्टींचा अभ्यास आधी करावा. त्यानंतरच कोणतेही नाते पुढे न्यायला हवे. अन्यथा तुम्हाला पुढे टॉक्सिक नातेसंबंधाला सामोरे जावे लागू शकते.
Read More: स्वतःला दिवसभर फ्रेश आणि सकारात्मक उर्जेने भरून कसे ठेवायचे?
टॉक्सिक नाते वाचवण्यासाठी काय करावे?
जर तुम्हाला हे नातं वाचवायचं असेल तर आधी तुम्ही तुमच्या जोडीदाराची मानसिक तयारी करा. जर त्यालाही हे नातं टिकवायचं असेल तर या टिप्स नक्की वापरा.
१. सर्वप्रथम तुमच्या पार्टनरला विश्वासात घेऊन चांगल्या रिलेशनशिप कौन्सिलरची मदत घ्या, जेणेकरून तो तुमच्या पार्टनरला चांगले मार्गदर्शन करू शकेल.
२. जोडीदाराला समजून घेण्यासाठी काही दिवस तुमचा स्वभाव बदला, जेणेकरून तुम्हाला जोडीदाराचा स्वभाव कळू शकेल.
३. दोघात कम्युनिकेशन गॅपचा अभाव असेल तर, त्यावर नक्कीच काम करा.
४. दोघांच्या जीवनशैलीत काय फरक आहे? याबाबत माहिती घेऊन दोघांनीही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नात्यात दोघांची लाईफ स्टाईल वेगळी असेल तर नातं टिकवताना खूप अडचणी येतात. त्यामुळे दोघांची लाईफ स्टाईल समजून घेण्याचा प्रयत्न करा.
५.दररोज एकमेकांसाठी अधिकाधिक वेळ काढण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या दोघांमध्ये प्रेम आणि जिव्हाळा कायम राहील.
६.जर तुम्हाला वाटत असेल की, एकमेकांची प्रायवसी धोक्यात आली आहे, तर तुम्ही दोघांनी एकमेकांच्या प्रायवसीचा आदर केला पाहिजे.
७. शेवटच्या क्षणी तुमच्या दोघांमध्ये काही शंका किंवा काही गैरसमज असेल तर बसून ते सोडवा म्हणजे त्या विषयावर पुढे चर्चा होणार नाही.
जर हे सर्व केल्यानंतर, तुमच्या दोघांमध्ये काहीही चांगले होत नसेल, तर तुमच्या जोडीदारापासून दूर राहणेच तुमच्यासाठी चांगले राहील. कारण नातं चालवायचं तर मागून ढकलावं लागणे, म्हणजे नात्याला वाचण्याचा कितीही प्रयत्न केला तरी, ते नातं सुखानं टिकवता कधीच येणार नाही.
जर जोडीदाराला यावर काही आक्षेप असेल तर एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीने किंवा तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता. कधीकधी असे होते की पार्टनर तुम्हाला त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी वापरू इच्छितो. तुमच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याच्या लालसेपोटी तो तुम्हाला संबंध तोडू देत नाही.