नाते घट्ट करण्यासाठी कोणत्या चुका टाळायला हव्यात?

SD &  Admin
0


ती-पत्नीचं नातं या धरतीवरचं सगळ्यात विश्वासपूर्ण आणि सवेंदशील नातं समजलं जातं. या नात्यामध्ये होणाऱ्या बदलाचे परिणाम दुसऱ्या नात्यावरही पाहायला मिळतात. म्हणून या नात्यामध्ये विश्वास आणि प्रेम आणि कर्तव्याची जाण असणे खूप आवश्यक आहे. म्हणून पती- पत्नी ने आपले नाते आनंदाने फुलावे, समृद्ध व्हावे असे वाटत असेल तर विनाकारण घडणाऱ्या काही मूर्खासारख्या चुका टाळायला पाहिजेत. पत्नी पत्नीच्या नात्यामध्ये पुरुषांच्या मनात अनेक गोष्टी अनिधिकृतपणे भिरक्या मारत असतात. त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. काही वेळा असे होते की, त्यांना कोणालाही दुखवायेचे नसते पण त्यांचे लहान मुलांसारखे वागणे किंवा निष्काळजीपणामुळे पत्नीला त्यांचे वर्तन अयोग्य वाटते.

नाते घट्ट करण्यासाठी कोणत्या चुका टाळायला हव्यात.
image credit to pexels.com  

 

नात्यामध्ये दोघांनीही स्वतः परिपूर्ण असल्याचा गैरसमज केल्यामुळे, दुसऱ्याला चुका दाखवून देण्यात खोटा अभिमान बाळगणे नात्यासाठी हानिकारक ठरू शकते.

 


आपण या लेखामध्ये पती-पत्नी नकळत कोणत्या चुका करतात, त्यामुळे दोघांमध्ये कलह निर्माण होतो. या बाबत या लेखामध्ये सविस्तर जाणून घेवूया.

प्रेम, विश्वास, कर्तव्य या अशा नात्यामधल्या चाव्या आहेत की, या चाव्यांचा उपयोग तुम्ही नात्यामध्ये असताना केलात तर तुमच्या नात्याला अंतिम क्षणापर्यंत कोणाचीही नजर लागणार नाही.

 

नात्यात गोडवा आणण्यासाठी पती-पत्नीने काय करायला हवे?


१. पती-पत्नीने एकमेकांना कमी लेखू नये :

लग्नानंतर काही वर्ष नवीन असल्यामुळे गोडवा, प्रेम, परस्पारांविषयीचे आकर्षण यामुळे हे नातं दोघांना काही प्रमाणात सांभाळून घेत येतं. परंतु काही वर्ष निघून गेल्यानंतर एकमेकांमधले आकर्षण कमी कमी होत जाते, त्यामुळे साहजिक आहे, या दोघांमध्ये भांडणे होण्यास सुरवात होते. त्यामुळे एकमेकांमधले गुण दोष काढणे चालूच राहते. यामुळे परिवारामध्ये विनाकारण भांडणे निर्माण होतात. हे टाळण्यासाठी शक्यतो दोघांनी आपला ईगो बाजूला ठेऊन एकमेकांना कमी लेखू नये. नातं घट्ट करायचं असेल तर, तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. तुम्हाला एकमेकांच्या आवडी निवडी, तसेच एकमेकांना काही प्रोब्लेम्स आहेत का? कोणत्या गोष्टी आपल्या पार्टनरला आवडत नाही? इकडे दोघांनी जरूर लक्ष देणे आवश्यक आहे. दोघांनी प्रेमाने घेऊन तुम्हाला संधी मिळताच एकमेकांचं कौतुक नक्कीच करा. कधी कधी जरी चुकलं नसेल, तरीही माफी मागितली तर तुम्ही येणाऱ्या भांडणाला रोखू शकता. असे केल्याने पुढच्या व्यक्तीला देखील आपली चूक कळून येईल. अशामुळे नातं घट्ट होण्यास मदत होते.

२. नात्याविषयीची बांधिलकी:

नात्यामध्ये बांधलीकी ही पती-पत्नीचं नातं कायम ठेवण्यासाठी आवश्यक असते. दोघांमध्ये विश्वास आणि कर्तव्याची जाण असणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही दोघ एकांतमध्ये गप्पा मारत असता, तेव्हा तुम्हाला आपल्या जोडीदाराबरोबर भविष्यातील नियोजना बद्दल चर्चा करावीसी वाटत असेल. परंतु तुम्हाला असे करण्याआधी थोडा विचार करायला हवा, कारण तुम्हाला आधी तुमच्या जोडीदाराच्या देखील मनात काय आहे, हे जाणून घ्यायला हवे. असे तुम्ही न करताच, तुम्ही तुमच्या जोडीदारासी चर्चा केली तर, कदाचित तुमच्या जोडीदाराला ही योजना आवडली नाही तर ती तुम्हाला या बद्दल थिंकलेस समजू शकते त्यामुळे तुमचा पार्टनर दुखी होऊ शकतो. बरोबर तुमच्या नात्या मध्ये दुरावा येऊ शकतो.

संसाराची दोन चाके ही पती आणि पत्नी असतात. दोन्ही चाके जेव्हा समान पद्धतीने चालतात तेव्हाच गाडी व्यवस्थितरित्या आपल्या लक्षापर्यंत पोहचते. तसेच पती-पत्नीने देखील विचारांची देवाणघेवाण समान पद्धतीने करून आपल्या लक्षापर्यंत पोहचावे.

 


३. मौन धारण करणे :

रुसवा फुगवा हा प्रत्येक माणसाचा एक गुणधर्मच आहे. काही पुरुषांना वाटते की, ते आपल्या पत्नी बरोबर रुसून मौन धारण केले म्हणजे, आपल्या या वादात विजय झाला असे वाटत असते. परंतु हे बालिशपणाच लक्षण आहे. त्यामुळे तुम्ही तिच्या मनात गैरजीम्मेदार पती म्हणून ओळख राहील. त्या बरोबर जर पत्नी देखील रागावली असेल तर तुमच्या अशा वागण्यामुळे तिला आणखीच राग येऊ शकतो. त्यामुळे राग कमी होण्यापेक्षा त्यामध्ये अधिकच वाढ होईल. म्हणून यामध्ये तुमचा रोल खूप महत्वाचा आहे. रुसून बसण्यापेक्षा प्रेमाने तिच्या जवळ जाऊन तिची समजूत काढणे तुमच काम आहे. तिला जवळ घेऊन तिच्या  डोक्यावरून हात फिरवून तिचे प्रोब्लेम काय आहेत, हे जाणून घ्या. असे केल्याने तुमच्या नात्यामध्ये पुन्हा गोडवा निर्माण होईल.   

४. काहीतरी पार्टनरच्या मनासारखं करा:

मित्रहो आयुष्य हे खूप खडतर असते. ते चालवत असताना पती- पत्नीमध्ये कुठेतरी कंटाळवाणी जीवन जगण्याचा अनुभव येतो. अशावेळी तुम्ही आपल्या पार्टनरच्या मनासारखी चांगली गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे पार्टनर खूप खुश होईल. ती तुमच्या कडे अधिक लक्ष देईल.           

Read More : एकाच्या प्रेमात असताना दुसऱ्यासाठी मन धडधडतय? जाणून घ्या त्यावेळी काय करावे


पती-पत्नीच्या नात्यामध्ये फक्त पतीचीच चुकी असेल किंवा त्यानेच प्रत्येक वेळी पुढाकार घेतला पाहिजे असे नाही. हा संसार दोघांचा आहे. दोघांनी हे नात टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गाडी एका चाकाने चालत नाही. त्यासाठी दोन चाकांची आवश्यकता असते. म्हणून संसारामध्ये चुका ह्या होतच असतात. दोघांनी विचार करून एकमेकाला समजावून घेऊन नातं घट्ट केल जातं.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!