एकाच्या प्रेमात असताना दुसऱ्यासाठी मन धडधडतय? जाणून घ्या त्यावेळी काय करावे

SD &  Admin
0


काच्या प्रेमात असताना दुसऱ्यासाठी मन धडधडतय? ऐन तारुण्यात पदार्पण करणाऱ्या तरुण-तरुणींना भेडसावणारा प्रश्न. आणि त्या वेळी मनाची होणारी कोंडी, अशावेळी काय करायला हवे. प्रत्येकाने आवर्जून वाचवा असा लेख..

"मन उधान वाऱ्याचे, गुज पावसाचे. का होते बेभान कसे गहिवरते.." ही एका गाण्याची सुरवातीची ओल आठवली आणि प्रेमाच्या पावसात आपलं मन कस उधळतं याची प्रचीती साधारण: सगळ्यांनाच येते. प्रेमाला अंतिम क्षणापर्यंत पोहोचण्यासाठी मनाची भूमिका ही खूप मोठी असते. मन जर स्थिर असेल तर प्रेमाला आलेल्या उधानाला आपण रोखु शकतो.

प्रथम बार एखाद्याच्या प्रेमात आपण एवढे बुडालेलो असतो की, आपल्याला त्याच्याशिवाय दुसरे कही सुचत नाही. त्याच्यासाठी आपला जीव धडधडत असतो. त्याच्या स्वप्नात आपण अनेक स्वप्ने रंगवत असतो. त्याच्याशिवाय आपल्या जीवनात कोणीही नाही अशी आणाभाका करत असतो. एक क्षण ही एकमेकांशिवाय न राहण्याची कसमे खात असतो. परंतु अचानक कोणतं तरी तुफान येतं आणि  काय..  प्रेम उधान वाऱ्यासंग असं बिखरून जातं की, अस म्हणावे लागेल की, प्रेमाला कोणाची तरी नजर लागली आहे. हे मन ज्याच्यासाठी धडधडत होते, ते अचानक दुसऱ्यासाठी धडधडू लागते. एकाच्या प्रेमातून निघून दुसऱ्याच्या प्रेमात शिरण्याचा प्रयत्न करते. असे का असावे बरे? पण अशावेळी या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यापेक्षा दुसऱ्याच्या प्रेमात पाण्याच्या प्रवाहांसारखे वाहत जातो.

एकाच्या प्रेमात असताना दुसऱ्यासाठी मन धडधडतय? जाणून घ्या त्यावेळी काय करावे
image credit to pexels.com 

एकेकाळी ज्याच्याकडे मन आकर्षित होत जायचे, ते आता दुसऱ्यासाठी विशेष वाटू लागते. ज्या पार्टनर सोबत पूर्ण लाइफ एक सोबत जगण्यासठी आणाभाका केल्या होत्या, त्याच्या बद्दल आस्था कमी होऊन.. आता दुसऱ्याच्या जीवनात आपल्याला रस वाटू लागतो, असे का होते?

या बद्दलची कारणे आणि समाधान आपण या लेखात जाणून घेऊया. लेख आवडल्यास Like आणि Follow करायला विसरू नका.

लेखाच्या पहिल्याच ओळीत म्हटले होते, प्रेम हे उधान वाऱ्यासारखे वाहत असते. या प्रेमाला रोखण्याचे साहस फक्त प्रेमात असण्याऱ्या विश्वासा आणि कर्तव्यावरती टिकून असते. परंतु हे तेव्हा शक्य असते, जेव्हा आपण खरोखरच त्या व्यक्तीवरती प्रेम करत असतो. परंतु जेव्हा तुमच्यात अपरिपक्व प्रेम असते, तेव्हा ते उधान वाऱ्यासारखे भटकत असते. अशा वेळी दोघात प्रेम असते, परंतु दोघांचा एकमेकांवरती विश्वास नसतो. जो पर्यंत दोघांमध्ये शारीरिक आकर्षण असते, तो पर्यंत हे टिकून असते. परंतु जेव्हा हे आकर्षण कमी कमी होत जाते, तेव्हा प्रेमाची ओढ देखील कमी कमी होत जाते. अशा वेळी तुम्ही दुसऱ्याकडे आकर्षित होत जाता. त्याच्यात तुम्हाला नवीन काहीतरी दिसू लागते. आता तुम्ही त्याच्या मनाच्या गाभाऱ्यात पोहोचण्याचा प्रयत्न करता.

Read More : मुलींना प्रपोज करण्याच्या बेस्ट ट्रिक : Best trick to propose a girl

परंतु तुम्हाला कल्पना नसते की, हे पण प्रेम पहिल्या प्रेमासारखेच असणार आहे. कारण तुम्ही अपरिपक्व प्रेमाबरोबर राहत असता. म्हणजेच तुम्हाला प्रेमाची परिभाषाच समजलेली नसते. मग तुम्ही एका व्यक्तीबरोबर आयुष्यभर सहवासात कसे काय राहू शकता?

तुम्ही प्रेमात पडला आहात आणि तुम्हाला ते प्रेम टिकवायचे असेल तर, तुम्हाला काय करावे लागेल? जाणून घेऊया ……

१.
सर्वप्रथम तुमचे अशा प्रकारे मन विचलित झाले असेल तर, तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत या विषयी चर्चा करा. तुमचा पार्टनर खरच तुमच्यावरती प्रेम करत असेल तर तुम्हाला तो समजावून घेईल. तुम्हाला असे का वाटते? तुमचं त्याच्याविषयी प्रेम का कमी होतेय? या बद्दल ही सविस्तर चर्चा करा. जेणे करून तुमचा पार्टनर तुम्हाला ह्यात मदत करेल आणि तुम्हाला तुमचे रिलेशन टिकवण्यास मदत मिळेल.

२. कधी कधी पार्टनरच्या कोणत्यातरी कमतरतेमुळे तुमचे मन आपोआप दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होते. अशा वेळी आपले मन स्थिर करून, आपल्या पार्टनरच्या चांगल्या गोष्टीची आठवण करा. खऱ्या प्रेमाचे मूल्य लक्षात घेऊन आपल्या पार्टनरच्या कमतरते विषयी जाणून घेऊन, त्या कमी करण्याचा प्रयत्न करा.

३. महिला ह्या भावनीक गोष्टीत जास्त रस घेत असतात. अशा वेळी महिला भावनीक आधार शोधण्यासाठी दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होत जातात. जर अशा वेळी तुमच्या मनात अपराधेपणाची भावना निर्माण होत असेल तर, तुम्ही तुमच्या पार्टनरशी या विषयावरती सविस्तर चर्चा करायला हवी.

४. तुम्हाला पुन्हा पुन्हा दुसऱ्या व्यक्तीचे आकर्षण वाटत असेल तर, तुम्ही तुमच्या पार्टनरसोबतचे पूर्वीचे दिवस आठवा. तुमच्या एक दुसऱ्याचे प्रेमाचे अनमोल क्षणाची आठवण करून, त्यात तुम्ही काय काय केले याचे स्मरण करा. असे केल्याने तुमचे मन तुमच्या जोडीदाराकडे वळत जाईल.

५. तुमच्या मनात कोणासाठी अशी भावना निर्माण होत आहे, असे वाटत असेल तर तुम्ही प्रथम लगेच आपल्या पार्टनरच्या चांगल्या गोष्टीविषयी आठवण करा. त्याच्यामध्ये सर्वात्कुष्ठ गोष्ट काय आहे, याचा प्रथम विचार करा. त्या मुळे आपसूक तुमचे मन दुसऱ्या व्यक्तविषयी कमी होईल.

मित्रहो.. ऐन तारुण्यात अशा गोष्टी होणे स्वाभाविक आहे. अशा वेळी न घाबरता, आपल्या मनाला स्थिर करून काय चुकीचे आणि काय बरोबर याचा मेल साधा. पुढे बघा... तुमचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल.      




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!