ग्रामीण भागातील शाळातील विद्यार्थ्याची संख्या कमी का होत आहे? जाणून घ्या काय आहे खरे कारण

SD &  Admin
0


ग्रामीण भागातील शाळातील विद्यार्थ्याची संख्या कमी का होत आहे? याची मुख्य कारणे या लेखात A Delight Life टीम देण्याचा प्रयत्न करत आहे. लेख आवडल्यास Like आणि Share करण्यास विसरू नका.

    भारतासारख्या विकानशील देशात औदोगीकीकरण झपाट्याने वाढत आहे. शहरात उद्योगधंदे वाढत असून नोकरीच्या निमिताने शहराकडे येणाऱ्यांचा कल जोरात वाढत आहे. परिणामी शहरात रियल इस्टेटची ईनवेस्टमेंट जोरात वाढत असून, लोक भविष्यातील आर्थिक तरतूद म्हणून शहरांना ग्रामीण भागा पेक्षा अधिक पसंदी देत आहेत.

    पूर्वी ग्रामीण भागात मुला-मुलींची संख्या जास्त असायची. त्यामुळे शाळेत ही विद्यार्थ्याची संख्या जास्त असायची. परंतु जसा जसा काळ पुडे निघत गेला, तसे तसे औदोगीकीकरण झपाट्याने वाढत गेले आणि लोकांचा कल हा शहराकडे वळू लागला. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी ह्या मर्यादित असल्यामुळे लोकांना जीवन जगण्यासाठी जबरदस्ती रोजगारासाठी शहराकडे जावे लागण्यास भाग पडत आहे.

ग्रामीण भागातील शाळातील विद्यार्थ्याची संख्या कमी का होत आहे? ...खरे कारण जाणून घ्या

    तस पहायला गेलं तर, काही अंशी लोकांची मानसिकता ही ग्रामीण भागात रहाण्याचा कल कमी होण्याचा मोठे कारण आहे. ग्रामीण भागात अनेक गोष्टीची कमतरता असते, म्हणून शहरी भागातील लग्झरी जीवन लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनत आहे. मुलांबाळांच्या उच्च शिक्षणाच्या दृष्टीने ही लोग शहराला पसंदी देत आहेत. लोकांची मानसिकता असते की, ग्रामीण भागात राहिल्यामुळे आपले ध्येय साध्य करता येणे अवघड आहे. प्रत्येक गोष्टीसाठी गावापासून दूर तालुक्याच्या ठिकाणी दररोज पायी जावे लागते. आपल्या मुलांना अशा प्रकारचे कष्ट नशिबी नको यावे, या साठी लोक स्वतःचे हक्काचे घर सोडून शहराकडे जाण्यास तयार होतात.

Read More : कोकणातील मातीची घरं | कोकणातील मांगर | Kokanatil Mangar | माझं कोकण 

    काही ग्रामीण भागातील शाळांचा सर्वे केलेल्या रिपोर्टनुसार विद्यार्थ्यांची पट संख्या ही हाता-पायाच्या बोटा इतकीच आहे. प्रत्येक वर्गात मुलांची संख्या ही चार किंवा पाचच्या घरातच आहे. परिणामी शिक्षकांना आपली नोकरी गमवावी लागते किंवा बदली होऊन दुसरी कडे जावे लागते. यांचा सरळ सरळ परिणाम हा विद्यार्थ्यांवरती होत असतो. यावरती आवर्जून सगळ्यांनी विचार करायला हवा.

    साहजिक आहे लोकांचा कल हा शहराकडे असल्यामुळे, त्यांच्या मुलांचे भविष्य ही त्यांच्या बरोबर शहरात जाते. अशा ह्या गोंधळामुळे ग्रामीण भागातील शाळातील विद्यार्थ्यांची संख्या आपसूक कमी होत आहे. काही शाळा तर बंद पडण्याच्या वाटेवर आहेत, तर काही एकदमच आजारी पडलेल्या आहेत.

    ग्रामीण भागातील अशी अवस्था चिंता जनक आहे. अशा लोकांच्या मानसिकतेमुळे काही काळाने गावे ओस पडून जातील. हे आपल्यासाठी व देशासाठी फायद्याचे नाही आहे. लोकांनी आपली मानसिकता बदलायला हवी. जरी शहरातील उत्तम जीवनाकडे पाहिले तरी, आरोग्याच्या दृष्टीने शहरापेक्षा ग्रामीण भाग स्वर्गासारखा आहे. शिक्षण दोन्ही बाजूने समान आहे. फक्त शहरात शिक्षणाची साधने अनेक आहेत आणि ग्रामीण भागात ती काही अंशी मर्यादित आहेत. परंतु शिक्षणाची गुणवत्ता मात्र दोन्ही बाजूला समान आहेत. तसं म्हटलं तर.. ग्रामीण भाग हा शिक्षणाच्या गुणवत्तेत शहराच्या पुढेच आहे. फक्त गरज आहे पालकांनी आपली मानसिकता बदलायला हवी.

    गांधीजीनीही स्वातंत्र्य लढ्यात जनतेला उदेशून म्हटले होते की, “शहरातून खेड्याकडे चला'' याचे कारण ही तसेच आहे. आपला देश हा शेती प्रधान आहे. आणि शेती हा आपला मुख्य व्यवसाय आहे. आणि जर खेड्यातून शहराकडे जाण्याची सगळ्याच लोकांची मानसिकता असेल तर, शेती करणार कोण? ह्या अशा मानसिकतेमुळे दोन प्रकारे देश धोक्यात येत आहे. एक म्हणजे ग्रामीण भागातील लोक संख्या कमी होऊन ग्रामीण भागातील शाळा ओस पडू लागल्या आहेत. त्याचबरोबर शहरातील लोकसंख्या वाढून शहरातील प्रशासनाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. दुसरी म्हणजे लोक शेतीला राम राम ठोकून शहराकडे पलायन केल्यामुळे, शेती क्षेत्र कमी होऊन देशाला उपासमारीची वेळ येऊ शकते.

    देशातील प्रशासनाने देखील या गंभीर विषयावरती विचार करून, या वरती उपाय शोधून काढणे आवश्यक आहे. शहराबरोबर ग्रामीण भागात आवश्यक ती साधने उपलब्ध करून देऊन, ग्रामीण भागात मुख्य समस्या असलेली रोजगार या वरती प्रशासनाने विशेष काम करावे. जेणेकरून लोकांना शहरात रोजगारासाठी जावे लागणार नाही. आणि विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातून दूर शहरात जावे लागण्याची वेळ येणार नाही.






Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!