Zala Bebhan Pavus Marathi Kavita by Nalesh Patil

SD &  Admin
0


वी नलेश पाटील हे निसर्ग कवी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या रचना खूपच सुखद आठवण करून देणाऱ्या असतात. मला तर निसर्ग कविता खूपच आवडतात. दररोज एकतरी निसर्ग कविता वाचतच असतो.

    झाला बेभान पाऊस ही कवितादेखील निसर्गाचे उत्तम दर्शन घडवते. पाऊस येण्याआधीचा दिवस कसा कोरडा आणि वातावरण तापलेलं असते. सगळीकडे गरमीने सर्वच त्रस्त झालेले असतात. अशात पावसाचे आगमन होते आणि वातावरण प्रफुल्लीत होते. सगळीकडे गारवा आणि नवचैतन्य निर्माण होते.
 
झाला बेभान पाऊस मराठी कविता | Zala Bebhan Pavus | कवी नलेश पाटील

मोत्याच्या धारा जशा जमनीवर पडतात, तसे सगळे जीव चिंतामुक्त होतात. मनुष्यच नाही तर सगळेच जीव आनंदाने नाचू लागतात. पावसाच्या सरी जश्या जोर धरू लागतात, तसे पशू-पक्षांची धावपळ होते. त्या मोत्या समान थेंबाला टिपण्यासाठी ते शर्यती करू लागतात. एकंदरीत काय पावसामुळे सगळीकडे मंगल झालेले असते.

अशा सुंदर पद्धतीने कवी नलेश पाटील यांनी पावसाचे अनेक सुंदर अलंकारांनी सजवले आहे. प्रत्येक ओळ निसर्गाचे अप्रतिम दर्शन घडवते. मला वाटते अशा कविता प्रत्येकाच्या संग्रहात असायलाच पाहिजे. एकदा ही कविता सगळ्यांनी नक्कीच वाचून बघा आणि तुम्हाला काय वाटते ते नक्कीच कळवा                           


झाला बेभान पाऊस मराठी कविता | कवी नलेश पाटील यांच्या कविता 


 झाला बेभान पाऊस दिस कोरडा सरला 

तरंगाचा निळा चुडा आज तळ्याने भरला 

लाखमोलाच्या ओतल्या भरभरून मोहरा

निळ्या खजिन्यास उभा ओल्या झाडांचा पहारा 

त्याच्या भोवताली फेर त्यांनी हिरवा धरला .... 

काळोखाच्या कळपात सूर्य बुडून विझला  

मेघ उश्याला ओढून शांत डोंगर निजला 

रानी कालवीत धुके वारा माखत फिरला .. 

धी मध्येच ठिणगी काळ्या कपारीत उडे 

जणू दागिना तेजाचा निळ्या ऐरणीत घडे 

असा लयीत उजेड कुणी आकाशी कोरला.. 

झाडांमध्ये पाखरांचा थवा ओथंबला चिंब 

आभाळाच्या मालकीचे त्यांच्या डोळ्यांमध्ये बिंब 

श्वास पानांचा हिरवा पिसापिसात मुरला.. 

कुठे थांबलेले पाणी  कुठे वाहणारी गाणी 

तुडुंबल्या जागोजागी गच्च आकाशाच्या खाणी 

खुलेआम निळाईचा रंग पाण्याने चोरला .. 

सूर्य मेघातून पुन्हा जसा लागला यायला 

ऊन-पावसाचा ओला साज सृष्टीने ल्यायला

यात सर्वात सरस इंद्रधनुष्य ठरला.. 

सारे गुंतले गवत गेले काठास लवत 

आली दिवाळी रानात थेंब हसले तेवत 

ओल्या उजेडाचा सण पानापानात उरला .. 


                                    कवी - नलेश पाटील



आभार 

या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला "झाला बेभान पाऊस" कवितेचा कंटेंट कवी नलेश पाटील यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम  ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.

The content of Zala Bebhan Pavus poem published in this blog is by Poet Nalesh Patil . A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!