प्रेम ही देवाने माणसाला दिलेली अशी देणगी आहे, जी जगात कधीही संपणार नाही. आणि खरं तर प्रेम या विश्वासामुळेच आज या जगात नाती टिकून आहेत. म्हणून असं म्हटले जाते, खरे प्रेम हे फक्त नसीबवाल्यांनाच मिळते. आणि ज्या व्यक्तींच्या आयुष्यात प्रेम नसते, त्या व्यक्तींना कम नसीबवान म्हणावे लागेल, कारण अशा व्यक्तींच्या आयुष्यात एकटेपणा अधिक असतो. प्रेमाने बोलणारं आणि काळजी घेणारं कुणीच नसते.
परंतु हे सगळे खरं असलं तरी, तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या अती प्रेमामुळे तुमचे वजन वाढू शकते.., होय.. हे खरे आहे. एका रिसर्च युनिव्हर्सिटीच्या संशोधनात असे आढळून आले आहे की, जे लोक आपल्या प्रियकरावर या प्रियेसीवरती खूप जास्त प्रेम करतात, त्यांचे वजन सामान्य माणसांच्या तुलनेत अधिक तेजीने वाढते. ऑस्ट्रेलियाच्या ‘सेंट्रल क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी’च्या अहवालानुसार, प्रेमात पडलेल्या लोकांचे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. असे सांगण्यात आले आहे.
Image Credit to : Pexels.com
जाणून घ्या, कोणती कारणे आहेत जी वजन वाढवण्यास सक्रिय असतात.
♥१. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्या प्रेमात तुम्ही इतके व्यस्त होता की, तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेणे विसरता. तुम्हाला तिच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच सुचत नाही. तासान तास तुम्ही एका ठिकाणी बसून तुमच्या पार्टनरशी बोलत असता. तुम्हाला यामध्ये भूक लागलेली आहे, हे सुद्धा समजत नाही. एवढे तुम्ही प्रेमाच्या आहारी गेलेले असता, त्यामुळे तुमच्या खाण्याच्या वेळा बदलत राहतात आणि तुमचे वजन वाढू लागते.
♥२. जे लोक प्रेमात इतके खोलवर जातात की, ते जिममध्ये व्यायाम करणे विसरुन जातात. या काळामध्ये त्यांची अंग मेहनत फारच कमी होते. त्यांच्या शरीरामध्ये अनेक बदल होत आहेत, याचे देखील त्यांना भान राहत नाही. आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे ते नेहमी त्यांच्या जोडीदारासोबत संपूर्ण वेळ घालवत असतात. त्यामुळे त्यांच्या शरीराचे काम संपते आणि ते लठ्ठ होऊ लागतात.
♥३. प्रेमात पडल्याने तुम्हाला खूप आनंद होतो. तुम्ही स्वप्ने पाहू लागता. तुमच्या शरीरामध्ये एकप्रकारे गोडवा निर्माण होतो. आणि यासर्व प्रक्रियामध्ये तुमच्या शरीरात ऑक्सिटोसिन आणि डोपामाइन हे हार्मोन्स बाहेर पडतात. त्यामुळे तुम्हाला खूप गोड पदार्थ खावेसे वाटतात. आणि पुढे पुढे गोड पदार्थ खाणे तुमचे वाढत जाते. कधी कधी तुमचे गोड खाण्यावर कंट्रोल सुटते. त्यामुळे तुमचे वजन वाढू लागते.
Read More : वैवाहिक जीवन सुखी कसे करावे ? : How to Make Married Life Happy मित्रहो.. वरील कारणे, एका रिसर्चच्या आधारे देण्यात आली आहेत. यामध्ये प्रेमात पडलेल्या लोकांना एकत्र ठेवले जाते, आणि त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून, त्यांच्या कार्यपद्धतीचे संशोधन केले जाते.
तरीही वजन वाढणे फक्त प्रेम असू शकत नाही, असे मला वाटते. याची अनेक करणे असू शकतात. तुम्हाला फक्त कोणतीही गोष्ट करताना, त्यामध्ये भरकटत जाऊ नये, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टींचा त्रास होणार नाही. होतं काय.. प्रेमात लोकं सतत भरकटत जातात. त्यांना इतर कोणत्याही गोष्टीचं भान नसते. फक्त ती आणि फक्त ती. तिच्याशिवाय जगात कुणीच नाही, असे तुम्ही वागत असता. आणि याचं जाळ्यात गुरफटल्यामुळे लोकांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. व्यायाम करायचे विसरून जाता. दिवसभर एका ठिकाणी बसून राहिल्यामुळे, फक्त यावेळी गोड पदार्थ मात्र तुम्ही जास्त खाता. यामध्ये मात्र तुम्ही विसरून जाता की आपले शरीर नको तिकडे वाढत जात आहे. आणि जेव्हा शरीर नको त्या गोष्टी बाहेर फेकण्यास सुरवात करते, तेव्हा वजन वाढण्यास जोराने सुरवात होते. आणि कदाचित प्रेमात अति व्यस्त होणे लट्ठपणाला कारणीभूत ठरतात, असे शास्त्रज्ञ म्हणतात.
या महत्वाच्या पोस्ट वाचा
वैवाहिक जीवन सुखी कसे करावे ? : How to Make Married Life Happy ? How to Save Love Relationship in Marathi : बिघडलेलं प्रेम कसं वाचवू शकतो ? तुमची पत्नी या स्वभावाची आहे का?