न्यूजपेपरवर तेलयुक्त खाद्यपदार्थ खाणे शरीरासाठी हानिकारक असते : कसे ते जाणून घ्या?

SD &  Admin
0


र तुम्हाला बाहेर खाण्याची खूप आवड असेल तर, तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजीपूर्वक काळजी घेणे आवश्यक आहे. कारण जेव्हा तुम्ही बाहेर फिरायला किंवा कामासाठी घराबाहेर जाता, तेव्हा तुम्ही उघड्यावर  हॉटेलमध्ये नाश्ता करायला जाता. परंतु जेव्हा तुम्ही नाश्ता करायला जाता, तेव्हा तुम्ही पाहिले असेल की, दुकानदार तुम्हाला न्यूजपेपरवर नाश्ता देतो, जसे की पोहे, जिलेबी, समोसा, वडापाव ई. हे पदार्थ तेलकट असल्यामुळे वर्तमानपत्रात असलेली रसायने खाद्यपदार्थांमध्ये मिसळतात आणि हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असते.

न्यूजपेपरवर तेलयुक्त खाद्यपदार्थ खाणे शरीरासाठी हानिकारक असते

वर्तमानपत्रात वापरण्यात येणारी शाई ही केमिकॅल्स डाई आईसोब्यूटाइल फटालेट, डाइएन आईसोब्यूटाइलेट या घातक रसायनांपासून बनवली जाते. आणि ही शाई मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असते. यामुळे तुम्हाला कर्करोगासारखा आजार होऊ शकतो आणि अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागू शकते.

भारतातील खाद्यपदार्थांची तपासणी करणाऱ्या FSSAI या संस्थेनेही याबाबत एक अॅडव्हायझरी जारी केली असून, खाद्यपदार्थांसाठी न्यूजपेपर वापरू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. जर आपण अशा न्यूजपेपरवर गरम किंवा तेलकट अन्न खाल्ल्यास न्यूजपेपरवरील या रसायनांचे बायोएक्टिव्ह सक्रिय होतात, जे शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात.

Read More : सावधान शीतपेये पिण्याआधी त्यातील घातक गुणधर्माची ओळख करून घ्या.

काळजी कशी घ्याल 

♚ भांड्यात पदार्थ देत नसतील तर, इमर्जेन्सी  पांढरा कागद वापरू शकता. तेही कधीतरी.  

♚ वृत्तपत्रावर तेलकट, गरम पदार्थ खाणे टाळाच.  मी म्हणतो एक वेळ उपवास केलेला चालेल, पण घातक केमिकल नकोच. आजारी पडण्यापेक्षा उपवास कधीही चांगला. शरीराला आरामही मिळतो आणि पाचन शक्तीला अन्न डायजेस्ट करण्यासाठी पुरेसा वेळही मिळतो. शरीर निरोगी राहते.         

♚ बाहेरचे पदार्थ खाणे कमी करा. त्यापेक्षा चांगले आणि सकस पदार्थ घरीच शिजवा.

जर तुम्हाला बाहेर जेवण करावेच लागत असेल तर, दुकानदाराला पांढर्‍या कागदावर किंवा अॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये देण्यासाठी विनंती करा. कारण तुम्ही जर बाहेर दररोज असे हानिकारक पदार्थ खाल्ले तर, तुमच्या शरीराला हे अत्यंत हानिकारक आहे. यामुळे तुम्हाला अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. मित्रहो.. जेवढे तुम्ही अशा गोष्टीपासून दूर राहाल, तितके तुम्ही निरोगी जीवन जगाल.   

आरोग्यदायी टिप्स

कोणतेही ओले किंवा तेलकट पदार्थ रंगीत कागद तसेच वृत्तपत्र यावरती घेवून खाऊ नयेत. याचे परिणाम काय होतात, ते मी तुम्हाला या पोस्टमध्ये सांगितलेच आहे. याचबरोबर प्लास्टिकच्या डब्यात देखील असे पदार्थ खाऊ नयेत. हे आपल्या आरोग्यासाठी खूपच हानिकारक असतात. असे म्हटले जाते, माणसाच्या शरीरात प्लास्टिकचा कचरा साठलेला आहे. यामुळे सतत माणसाची प्रकृती खराब होत असते. यासाठी जेवढं शक्य असेल, तितकं निसर्गाला बाधित न करणाऱ्या वस्तूंचा वापर करावा. आणि मुख्य म्हणजे माणसाचा जन्म हा निसर्गातच राहण्यासाठी झाला होता. परंतु माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्या जीवांना आगीत ढकलून दिलेच आहे, त्याचबरोबर स्वतःला देखील आगीत ढकलून दिले आहे. मित्रहो... याचे परिणाम पुढील काळात नक्कीच दिसून येतील.

तत्पूर्वी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे..... यासाठी निसर्गाच्या अनुकूल गोष्टी करा. माणूस म्हणून जीवन सार्थकी होईल.

या महत्वाच्या पोस्ट नक्कीच वाचा

लहान मुलांना काजळ लावणे आरोग्यासाठी चांगले असते का? जाणून घ्या काय म्हणतात तज्ञ  

शरीरात पाणी टिकून राहिल्याने कोणत्या समस्या उद्भवतात : Water Retention Bad for Body




   

                           



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!