घरातील फर्निचरची काळजी कशी घ्यावी?

SD &  Admin
0


ज प्रत्येक घरात फर्निचरचा ट्रेंड जोरात सुरू आहे. आणि ते असणं गरजेचे ही आहे. कारण त्याशिवाय घरही सुंदर दिसत नाही. घर छोटं असो किंवा मोठं, ते सजवण्यात फर्निचर महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणून घरामध्ये फर्निचर आणताना आपण हे नक्कीच पाहतो की, फर्निचरच्या सहाय्याने घराचे सौंदर्य वाढवण्यासोबतच घरात कोणतीही अडचण येणार नाही. म्हणजे विनाकारण आणलेल्या फर्निचरमुळे घराचे सौंदर्य कमी होणार नाही.

मित्रहो.. फर्निचर घरी आणल्यानंतर त्याची काळजी घेणेही आवश्यक असते. त्यात उशीर केल्यास फर्निचरचे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे वेळीच काळजी घेणे तुमच्यासाठी आवश्यक असते.  

घरातील फर्निचरची काळजी कशी घ्यावी?
image credit to pexels.com 

फर्निचर आणण्यापूर्वी लक्षात ठेवा :-

फर्निचर आणण्यापूर्वी आपण त्याचे बजेट पाहतो. जर तुम्ही घरात टिकाऊ फर्निचर आणले तर ते चांगले राहील. आणि ती तुमची गुंतवणूकही असेल. जर तुम्ही असे फर्निचर आणले तर त्याचे लाइफ ही वाढेल.

असे फर्निचर घरी आणतो, तेव्हा त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. घरात लहान मुलं असतात, त्यांच्यापासून ही फर्निचरची काळजी घ्यावी लागते. लहान मुलं काही ना काही करामती करत असतात. यासाठी आपण येथे फर्निचरची काळजी कशी घ्यावी, म्हणजे ते जास्तीत जास्त वर्ष सुंदर आणि टिकाऊ राहील. या बद्दल जाणून घेऊया. 

How to Take Care of Furniture in Marathi - फर्निचरची लाइफ कशी वाढवू शकता?   

१. फर्निचरवर साचलेली धूळ रोज साफ करणे आवश्यक आहे. असे न केल्यास फर्निचरची पॉलिश हळूहळू कमी होते आणि फर्निचर खराब दिसते.

२. तुम्हाला घरातील स्टील आणि प्लॅस्टिकच्या फर्निचरची चांगली काळजी घ्यावी लागेल. कारण असे फर्निचर सूर्यप्रकाश, आग आणि पाण्यामुळे खराब होते. 

३. फर्निचरला सूर्यप्रकाश, उष्णता, एअर कंडिशनर, रेडिएटर्सपासून दूर ठेवा. कारण त्यातून निघणाऱ्या उष्णतेमुळे फर्निचरचे नुकसान होते.

४. लाकडी फर्निचरपासून पाणी दूर ठेवा. कारण लाकडी फर्निचरमध्ये पाणी भरून त्याच्या पट्ट्या बाहेर येतात. तसेच फर्निचरच्या चाकाला नियमित तेल आणि ग्रीस लावल्याने फर्निचर हलवणे सोपे होते.

५. फर्निचर हलवताना त्यावर ओरखडे येणार नाहीत याची काळजी घ्या.

६. फर्निचर एक किंवा दोन वर्षांनी पॉलिश करणे आवश्यक आहे.

७. लाकडी फर्निचर साफ करताना पाण्यात खोबरेल तेल मिसळून, त्यात कापूस भिजवून स्वच्छ करा. त्यामुळे फर्निचर चांगले स्वच्छ होते.

८. लाकडी फर्निचरवर चहा किंवा कॉफीचे डाग पडल्यास, ते स्वच्छ करण्यासाठी चमचाभर तेलात एक चमचा व्हिनेगर टाकून त्या मिश्रणात एक सुती कापड भिजवून लाकडावर घासावे.

९. अर्धा कप वॉशिंग सोडा पाण्यात मिसळून लावल्याने फर्निचर चांगले स्वच्छ होते.

१०. घरातील निरुपयोगी फर्निचर काढून टाका.

११. नवीन फर्निचर आणण्यापूर्वी घरात पडून असलेल्या फर्निचरचा काही उपयोग होतो की नाही ते पहा. अनावश्यक खर्चात बचत होईल.

१२. लाकडी फर्निचर देखील पेट्रोलियम जेलीने साफ करता येते. पेट्रोलियम जेली हा एक नैसर्गिक पदार्थ आहे, जो लावल्याने फर्निचरची चमक वाढते.

१३. लाकडी फर्निचरलाही ऑलिव्ह ऑईलने चमक येते. दहा मिनिटे लावल्यानंतर कोरड्या कापडाने स्वच्छ करा.

१४. स्वच्छ पाणी आणि लिंबू योग्य प्रमाणात मिसळा. आणि लाकडी फर्निचरवर लावा, काही वेळाने कोरड्या कापडाने स्वच्छ करा. लाकडी फर्निचर तुम्हाला चमक

दार लुक देईल.

Read More : कोकणातील मातीची घरं | कोकणातील मांगर | Kokanatil Mangar | माझं कोकण


अशा प्रकारे, तुम्ही फर्निचरची काळजी आणि त्यांना चमक आणू शकता. तसेच दोन किंवा तीन वर्षांनी ते पॉलिश किंवा रंग देऊन, फर्निचरला नवीनसारखा लुक देवू शकता. शक्यतो आपल्याला फर्निचरची काळजी दररोज घेतली पाहिजे. जेणेकरून महागडे फर्निचर खराब होण्यापासून वाचवू शकतो.

महत्वाची टिप्स

फर्निचर शक्यतो.. भिंतीला लागून अधिक ठेवू नका. असे केल्यास ते खराब होण्याची शक्यता अधिक असते. अशी काळजी लाकडी फर्निचरच्या बाबतीत विशेषता घ्यायची आहे. त्याचबरोबर भिंतीला टेकून असलेल्या फर्निचरची काळजी घेणे अवघड जाते किंवा ते सतत इकडून तिकडे हलवत राहणे कठीण होऊन जाते.              




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!