आपल्या पाळीव प्राण्याशी नातं कसं असावं ? How to have a relationship with your pet?

SD &  Admin
0


पाळीव प्राणी हे सर्वात जास्त प्रामाणिक असतात, हे तुम्ही ऐकले असेलच. जीव धोक्यात घालून ते आपले कर्तव्य पार पाडतात. परंतु माणूस सतत, प्राण्यांना त्रासच देत असतो. कधीच त्यांना जवळ करत नाही. प्रेम करणं सोडूनच द्या.

मित्रहो माणुसकीच्या नात्याने तरी या मुक्या प्राण्यांवर प्रेम करायला शिकले पाहिजे. त्यांची काळजी घ्यायला शिकले पाहिजे. त्यांना कोणता त्रास होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. मित्रहो जर तुम्ही अशा प्रकारे त्यांची काळजी घेतली तर ते, मरेपर्यंत तुमची साथ सोडणार नाहीत. सतत ते घरातील सदस्याप्रमाणे तुमच्या सोबत राहतील.  

मित्रहो अनेक जणांना पाळीव प्राण्यांवर प्रेम करायला आवडते. आणि ही खरच चांगली गोष्ट आहे. परंतु जेव्हा तुम्ही त्यांना घरी आणता तेव्हा त्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेणे आवश्यक असते. खाण्याच्या बाबतीत त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. निष्काळजी होऊन चालणार नाही. जर एखादे लहान पिल्लू तुम्ही घरी आणले असेल तर, लहान मुलांपासून थोडे दिवस दूर ठेवा. कारण लहान मुले त्यांना नकळत इजा पोहावत असतात. त्यासाठी तुम्हा मोठ्यांना त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

मित्रहो येथे मी तुम्हाला पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी, त्याचे मार्गदर्शन केले आहे. तुम्हीही अशाच प्रकारे त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.    `

आपल्या पाळीव प्राण्याशी नातं कसं असावं ? How to have a relationship with your pet?
image credit to pexels.com


How to have a relationship with your pet in marathi? Pet Caring Relationship

पाळीव प्राणी  घरी आणण्यापूर्वी खबरदारी

पाळीव प्राणी आणण्यापूर्वी तुमच्या घरातील वातावरण तुम्ही घरी आणत असलेल्या पाळीवसाठी योग्य आहे की नाही, तसेच तुमच्या घरातील सदस्य हे पाळीव घरी आणण्यास तयार आहेत की नाही, याकडे प्रथम लक्ष द्या. कारण पाळीव घरी आणल्यावर, ज्यांना ते आवडत नाहीत, ते सदस्य रागावतात. अनेक प्रसंगी तुम्ही घरात नसताना ते त्या पाळीव प्राण्याला त्रास ही देतात. त्याची खाण्या-पिण्याची काळजी ही घेत नाहीत. यामुळे त्या बिचाऱ्या मुक्या प्राण्याला खूप त्रास सहन करावा लागतो.

पाळीव घरी आणण्यापूर्वी, त्यासाठी योग्य जागा उपलब्ध आहे की नाही हे लक्षात ठेवा. असे होऊ नये की त्याला आणल्यानंतर कुठे ठेवायचे. यावरून तुमचे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडण होऊ शकते.

पाळीव आणण्यापूर्वी, ते कोणत्याही आजाराने ग्रस्त नाही याची खात्री करा. ज्याच्याकडून तुम्ही हे पाळीव आणाल, त्याच्याकडून संपूर्ण माहिती (आरोग्य हेतूने) मिळवू शकता.

पाळीव घरी आणल्यानंतर खबरदारी

पाळीव प्राणी आणल्यानंतर, तुमची पहिली जबाबदारी असते, त्याच्या आरोग्यासाठी काय करता येईल. त्याचे जेवण कसे असावे? त्याच्या जेवणाचे वेळापत्रक कसे ठरवावे? याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. त्यानंतर त्याला दिवसातून एकदा तरी आंघोळ घालावी. तसेच तो कुठे फिरतो याकडेही लक्ष द्यावे. कारण तो अस्वच्छ ठिकाणी फिरला तर तुमच्या कुटुंबात आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याला दररोज आंघोळ घालणे तुमची जबाबदारी आहे. 

त्याला चांगले प्रशिक्षण देणे हे आपले कर्तव्य आहे. जेणेकरून तो घरात चांगले राहू शकेल. त्याच्यावर खूप प्रेम करा, पण प्रेमासोबतच चांगल्या सवयीही शिकवा. म्हणजे तो तुमच्यासोबत आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत प्रेमाने राहील. त्याच्याशी खूप कठोर होऊ नका, कारण जर तुम्ही असे केले तर, तो तुमच्यापासून दूर जाईल. तो एक प्राणी आहे, परंतु ते खूप संवेदनशील असतात. त्यांना चांगले माहित असते की, तुम्ही त्याच्याशी कसे वागत आहात.

Read More: आम्हाला जगण्याचा अधिकार द्याल का ? Why do some of us enjoy torturing animals?

मी तुम्हाला एक सत्य घटना सांगतो....

मी पुण्यात राहतो. माझ्या बिल्डिंगमध्ये सुरक्षेसाठी एक कुत्रा ठेवण्यात आला होता. मी त्याला रोज बघायचा. त्याच्या आजूबाजूला फिरायचा. परंतु एक महिनाभर तरी आमच्यात तितकी मैत्री किंवा प्रेम नव्हते. सुरवातीला तर तो माझ्याकडे बघून भुंकायचा.

एके दिवशी त्याच्या जवळ जाऊन त्याला जवळ घेतले. हृदयाशी कवटाळले. त्यानंतर त्याला फिरायला घेऊन जाऊ लागलो. त्याचे आवडती बिस्किटे, तसेच अन्य पदार्थ खाऊ घालू लागलो. आणि असे मी दररोज करू लागलो. यावर माझ्या लक्षात आले की त्यालाही माझ्यासोबत राहणे आवडू लागले होते. पूर्वी तो माझ्यावर भुंकायचा, पण आता मात्र मला समोर बघताच तो येऊन घट्ट मिठी मारतो. रूममध्ये जाऊही देत नाही. माझी सतत वाट पाहत असतो. आणि मी ही घरी असलो की बराचसा वेळ त्याच्यासोबत घालवतो. सकाळ तर त्याच्या सोबतच असते. आता तर ना त्याला माझ्याविना करमत, नाही मला त्याच्या शिवाय करमत. 

मी जेव्हा कधी एक-दोन दिवस कामानिमित्त बाहेर जातो, तेव्हा तो माझ्याशिवाय राहतच नाही. तो रोज संध्याकाळी ६ वाजता माझी वाट पाहत असतो. मी घरी आलो की सगळे मला म्हणतात की, हा तुझ्याशिवाय राहतच  नाही, बिचारा सतत देवासारखी तुझी वाट पाहत असतो.

मित्रहो सांगायचा हाच उद्देश की, हे बिचारे प्राणी फक्त आणि फक्त प्रेमाचे भुकेले असतात. ते अधिक आपल्याकडून काहीच अपेक्षा करत नाहीत. त्यांना प्रेम दिलं की ते खुश होतात. मित्रहो एक मनुष्य नात्याने आपल्यालाही त्यांच्यावर प्रेम करायला शिकले पाहिजे. त्यांना जवळ घेतले पाहिजे.        




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!