इकिगाई : IKIGAI दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी लोकांचे रहस्य

SD &  Admin
0


मित्रहो.. जेवढा आनंद मला या पूर्वी कधी झाला नव्हता, तेवढा आज हा ब्लॉग लिहिताना होत आहे. आणि याचे कारण ही तसेच आहे. जे तुम्हाला हा ब्लॉग वाचता वाचता समजून येईल.

मित्रहो. आज आपण माणसाच्या दीर्घायुषी बद्दल चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा आपल्या इकिगाई पासून करणार आहोत. 'इकिगाई' हा फक्त एक शब्द नसून माणसाला दीर्घायुषी बनण्याचे १००% रामबाण औषध आहे. हे जर तुम्ही प्यायलात तर मी १००% खात्रीने सांगतो, तुम्ही १०० री पार करालच. बरोबर एक निरोगी, सुखी आणि आनंदी जीवन जगाला. खरच.. हा इकिगाई शून्यातून विश्व बनण्याचा मार्ग आहे. जो धरतीवरच्या मोजक्याच लोकांना भेटला आहे. आणि त्या लोकांनी याचे सोने करून आपले आयुष्य यशस्वी केलेच, बरोबर ते आपले जीवन ही आनंदी जगत आहेत.

Ikigai : Life target achivement


मित्रहो तुम्हाला एक नक्कीच प्रश्न पडला असेल, तो म्हणजे  इकिगाई' काय आहे? तर इकिगाई हा एक जपानी शब्द आहे. जो 'इकि' म्हणजे लाइफ/ जीवन असा होतो. आणि गाई म्हणजे लक्ष्य / हेतू . म्हणजेच आपल्या जीवनाला एक लक्ष दिले पाहिजे. विना कोणत्या लक्षा शिवाय आपण जीवन जगूच शकत नाही. जसं सचिन तेंदुलकर हा क्रिकेटचा भगवान समजला जातो. परंतु जर त्याने लहानपणी  ठरवले असते की, त्याला सिंगर व्हायचे आहे. तर मित्रहो मला सांगा.. तो एवढा यशस्वी क्रिकेटर झाला असता का? तर मित्रहो.. याचे उत्तर आहे.. कधीच नाही. म्हणजेच सचिनला आपला इकिगाई समजला होता. त्याला माहित होतं की, त्याला फक्त आणि फक्त क्रिकेट खेळता येते, गाणे नाही. म्हणून तो आज एक यशस्वी क्रिकेटर झाला. अशीच आपल्याला अनेक उदाहरणे देता येतील.

मित्रहो.. इकिगाई पुस्तक हे माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या विषयाचे प्रतिनिधित्व करते. आणि जगभरातील लोकांनी याला मान्यता दिली आहे. जगातील मोठ मोठे डॉक्टर सुद्धा या पुस्तकाचे दिवाने आहे. आणि त्याचे कारणही तसेच आहे. कारण या पुस्तकात दीर्घायुषी होण्याचे १००% रामबाण उपाय सांगितले आहेत. ते इतर कोणत्या पुस्तकात खोलवर मिळणार नाहीत.

 

मित्रहो मी जेव्हा हे पुस्कत वाचायला सुरवात केली, तेव्हा एक वेगळीच उर्जा माझ्या शरीरात संचारायला लागली. येवढं सुंदर जीवन आपल्याला ईश्वराने दिलेले असताना ही, आपण विनाकरण आपलं जीवन बरबाद करत आहोत, असे मला वाटू लागले. उगीचच ६० ते ७० वर्षाच्या मध्येच आपण उड्या मारत असतो. आणि ते ही रोगीट बनून. अनेक वेदना सहन करून. आयुष्यभर मर-मरून कष्ट केले, ते ही नीट आपल्याला खाता येत नाही. मग मी म्हणतो... काय अर्थ आहे, या आपल्या जीवनाचा.

मित्रहो इकिगाई मध्ये आपल्या हेच सांगितले आहे. जीवन कसं जगायचं? जीवनाला सुखी, आनंदी, निरोगी कसं करायचं? फार सुंदर सत्य वचन आहेत, या पुस्तकात. वाचताना एक एक शब्द हृदयाला भिजवून टाकणारा आहे.

मित्रहो.. इकिगाई बद्दल अजून जाणून घेण्याआधी, आपण इकिगाईचा उगम कसा झाला? ते पाहुंया

जसं म्हटल्या प्रमाणे इकिगाई हा जपानी शब्द आहे. आणि तिथेच इकिगाईचा जन्म झाला. मित्रहो जपानमध्ये ओकिनावा एक गांव आहे, तेथे अधिकांश लोकं १०० री पार केलेले आहेत. अधिकांश म्हणजेच ९९% + या गावातील लोकं निरोगी, सुखी आणि आनंदी आहेत. त्यांना जेव्हा प्रश्न विचारला गेला की, तुम्ही इतके निरोगी आणि १०० वर्षापेक्षा अधिक कसे जगता? काय आहे तुमचं रहस्य ? यावरती त्या माणसांनी प्रथम हसून त्याचं स्वागत केले आणि आपल्या जीवनाचे अमृतासमान गुणधर्म सांगितले, ते माणसाला अमृत जिंकल्या सारखेच आहेत.

पाहूया ते कोणते रहस्य आहेत, त्यामुळे जपान मधील लोकं एवढी निरोगी आणि दीर्घायुषी आहेत.

जपानी लोकांचे दीर्घायुषी होण्याचे रहस्य काय आहेत?       

मित्रहो इकिगाई या पुस्तकात दीर्घायुषी, निरोगी होण्याची सूत्रे / रहस्य विस्तारपणे सांगितले आहेत. मी येथे तुम्हाला सारांश रुपात सांगत आहे. जे या पुस्तकाचे प्रतिरूप आहे.

रहस्य न. १ रहस्य न. २
क्रियाशील / Active राहणे आणि कधीही रिटायर होऊ नये दररोज व्यायाम आणि मेडीटेशन करा
आपल्या Passion ला फॉलो करा चांगले मित्र आणि सहकारी जवळ करा
आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदाने जगा निसर्गाच्या कुशीत जीवन जगा 
प्रत्येकाचे आभार माना जेवण ८०% च करा
मनात आणि चेहऱ्यावर Smile असू द्या आपल्या जीवनाला विनाकरण फास्ट करू नका


मित्रहो वरील १० सूत्रे आपल्या दीर्घायुषी जीवनाची गुरुकिल्ली आहेत. खरं तर, तुम्हाला वाचताना ही सूत्रे सहज सोपी वाटतील. परंतु हे सगलं इतकं सोपं नाही आहे. जेव्हा तुम्ही Practicle या गोष्टी करायला जाल. तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही यांचे महत्व आणि मेहनत काय असते हे समजले जाल. आपण एक एक याचा अर्थ जाणून घेऊया. जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाईल.

जपानी लोकांचे दीर्घायुषी जगण्याचे रहस्य 

 
१. क्रियाशील / Active राहणे आणि कधीही रिटायर न होणे 

इकिगाई म्हणते की माणसाने सतत क्रियाशील / Active राहिले पाहिजे. या पेक्षा चांगला व्यायाम दुसरा होवूच शकत नाही. जी माणसं स्वतःला थांबवतात, ती माणसं मनाने आणि शरीराने रोगी असतात. अशी माणसे आयुष्याची दोर तुटण्याआधीच स्वतःला खत्म करतात.

मित्रहो...जी माणस सतत मला आता रिटायर व्हायला हवे आहे.. असे म्हणतात. त्या माणसांना आपला इकिगाई भेटलेलाच नसतो. या माणसांना आयुष्यात नेहमी दु:ख आणि निराशाच मिळत असते.

दुसरी गोष्टी आपल्या निगेटिव विचारामुळे आपल्या मनाला, आपल्या अंतरत्म्याला चुकीचा संदेश जातो, की तुम्ही मनाने एक रोगी माणूस आहात आणि तुमची जगण्याची क्षमता खत्म झाली आहे. या अशा विचारामुळे तुम्ही नेहमी आजारी आणि दुखाच्या छायेखाली असता. मित्रहो.. हे सगलं एकाच चुकीमुळे झालेले असते, ते म्हणजे तुम्ही क्रियाशील न राहिल्यामुळे

२. आपल्या Passion / पॅशनला फॉलो करणे      

मित्रहो.. जीवनात पॅशनला खूप महत्व आहे. तुम्ही या शिवाय कधीच यशस्वी होऊ शकत नाही. जो व्यक्ती आपल्या पॅशनला फॉलो करतो. तो जीवनात आपले धैय कोणत्याही परीस्थित गाठतो, म्हणजे गाठतोच. अशा व्यक्तीं कोणत्याही वयात खूप धैयवादी आणि क्रियाशील असतात. अशी माणसं आपल्या वयाला सहज हरवतात.

३. आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदाने जगणे 

ज्यांना आपला इकिगाई भेटलेला असतो, ती माणस कधीच जीवनात येणाऱ्या संकटाना घाबरत नाही. ती लोकं हसत हसत परिवर्तनाचा स्वीकार करतात. ईश्वराच्या कृपेने भेटलेला प्रत्येक क्षण ते आनंदाने जगतात. अशा माणसांना युनिवर्सल नेहमी साथ देत असते. कारण अशी माणसे सतत सकारात्मक विचार करत असतात. आणि युनिवर्सल अशाच लोकांना साथ देते, जे अंतर्मनाने या युनिवर्सलमधल्या चैतन्य शक्तीचे आव्हान करतात.

मित्रहो.. ईश्वराने दिलेल्या या सुंदर जीवनाचे आभार मानून, प्रत्येक क्षण आनंदने जगा. हाच रस्ता तुम्हाला खऱ्या सुखाकडे घेवून जाईल.

४. निसर्गाच्या कुशीत जीवन जगणे 

मित्रहो.. खरं म्हणजे माणसाचा जन्म हा निसर्गाच्या कुशीतच जगण्यासाठी झाला आहे. परंतु हायपाय लाइफस्टाईलच्या आकर्षणामुळे माणूस निसर्गापासून वेगळाच झाला आहे. आणि याचे परिणाम तुम्ही बघतच आहात. प्रदूषण, रोगराई, तणाव, यामुळे माणसाचे आयुर्मान कमी झाले आहे, त्याबरोबर तो आपला आनंदच विसरला आहे.

मित्रहो.. या निसर्गमातेच्या कुशीतच आपलं जीवन सुखी बनू शकते. कारण येथे माणसाला सुखी करणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु मानवाला या सगळ्या निरर्थक वाटतात. तुम्हीच यावरती विचार करून कमेंट्स द्वारा नक्कीच कळवा.

५. चांगले मित्र आणि सहकारी जवळ करणे 

जीवनात चांगले मित्र आणि सहकारी असणे, म्हणजे जीवन अर्धे काहीही न करता सोपे झाले असे असते. अशी माणसे तुमच्या आयुष्यातील बऱ्याच अडचणी सहजतेने सोडवतात. तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागतं नाही. असे मित्र जवळ असले की, जवळचे वातावरण देखील शांत आणि सकारात्मक असते.

६. दररोज व्यायाम आणि मेडीटेशन करणे 

इकिगाईचा अर्थच दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी आहे. आणि यामध्ये व्यायाम आणि मेडीटेशनला खूप महत्व आहे. ज्यांना इकिगाई भेटलेला असतो, त्यांच्या जीवनात व्यायाम आणि मेडीटेशन दररोजचा अभ्यास असतो. त्या शिवाय ते दिवसाला सुरुवात करत नाही.

मित्रहो जपानी लोक दररोज व्यायाम, मेडीटेशन आणि भरपूर चालतात. त्यामुळे तिथे डायबेटीस, लठ्ठपणा, हार्ट अटॅक, कॅन्सर सारखे रोग लोकांना माहितही नाहीत. आणि याचे मुख्य कारण आहे  त्यांची रोजची हेल्दी दिनचर्या.

७.प्रत्येकाशचे आभार मानणे 

प्रथम आपल्याला ईश्वराचे आभार मानले पाहिजे की, त्याने आपल्याला एवढ सुंदर जीवन दिले. दररोज उठल्यानंतर सर्वप्रथम त्या विध्यात्याचे आभार मानले पाहिजे. त्या नंतर जी जी लोकं तुमच्या आनंदाचा भाग बनतात आणि जी कारण बनतात.. त्यांचेही आभार माना. असे केल्याने तुमच्या मनाला शांती लाभेल. लोकं ही तुमची स्तुती करतील. तुमच्या आयुष्यात कोणीही शत्रू नसेल.

इकिगाई म्हणते की, आपल्या दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनात अनेक लोकांचा सहभाग असतो. त्यांना आपल्याला विसरून चालणार नाही.

८. जेवण ८०% च करा

असे म्हटले जाते की, जे एक वेळा जेवतात, त्यांना योगी म्हणतात. जे दोन वेळा जेवतात, त्यांना भोगी म्हणतात. आणि जे तीन वेळा जेवतात, त्यांना रोगी म्हणतात. या प्रमाणे तुम्ही वाचलं असेल की, पूर्वीचे ऋषी मुनी फक्त एक वेळच जेवायचे, त्यामुळे ते निरोगी आणि दीर्घायुषी जगायचे.

आणि विज्ञान देखील हेच सांगते की, जेवण कधीही ८०% च करावे. त्यामुळे आपल्या पचन संस्थेला आराम मिळतोच, बरोबर खाल्लेलं पचन करण्यास वेळही मिळतो. मित्रहो.. जेवताना आपल्याला कळत नाही की, आपलं पोट भरलं आहे. म्हणून आपण जेवतच जातो आणि पुढे अपचनाचा त्रास होतो.  तसेच अनेक आजार ही होतात. म्हणून जेवण कधीही कमीच करावे. 

९. मनात आणि चेहऱ्यावर स्माईल असू द्या

चेहऱ्यावर सतत हास्य, माणसाचे हेल्दी असण्याचे लायसन्स आहे. माणसाच्या चेहऱ्यावरचे तेज आणि हास्य दुसऱ्या व्यक्तीला ही हास्य करण्यास भाग पाडते. हे हास्य माणसाच्या नरवस सिस्टमला खत्म करून आपल्या अंतर्मनाला सकरात्मक उर्जा प्रदान करते. यामुळे युनिवर्सलमधली चैतन्य शक्ती तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास मदत करते.

मित्रहो.. एवढी प्रचंड उर्जा आपल्या हसण्यात आहे. आपण विनाकारण दु:ख करत बसतो. नको त्या गोष्टींकडे धावत जाऊन आपलेच आयुष्य खराब करतो. मी म्हणतो कशासाठी हे केले पाहिजे? मित्रहो.. खरच अजूनही वेळ गेला  नाही आहे. आताच आपला इकिगाई ओळखा आणि मिळालेल्या या जीवनाला सार्थक करा.

१०. आपल्या जीवनाला विनाकरण फास्ट करू नका

मित्रहो.. आजचं जीवन हे खूपच फास्ट आहे. आणि हे ही तितकच सत्य आहे की, आपल्याला ही त्यांच्याबरोबर चाललं पाहिजे. परंतु कधी कधी माणूस अतीच करतो. जर जीवनात आराम आणि शांतीच नसेल तर त्या जीवनाचा काय फायदा? आयुष्यभर कष्ट करायचं आणि कमावलेलं खायचं कधी...?

मित्रहो मेहनत करावीच. परंतु त्या मेहनतीमध्ये मनाला शांती भेटली तरच ते काम आपल्या कामाला येते. इकिगाईचे हेच म्हणणे आहे की, स्वतःला वेळ द्याच. हे जर तुम्ही केलं नाही तर, पुढे पश्चाताप करायची वेळ येणार, यात काही शंका नाही.

Read Also :-  रिच डॅड पुअर डॅड : श्रीमंत आणि गरीब लोकांचे पैसे मिळवण्याचे विचार | श्रीमंत होण्याच्या बेस्ट सवयी 

वरील दहा रहस्य माणसाला खऱ्या अर्थाने वरदान आहेत. आणि हे सिद्ध झाले आहे. जेव्हा जपानी लोकांच्या दीर्घायुषीवरती खोलवर अभ्यास केला गेला, तेव्हा त्या लोकांनी याचं १० सूत्रांच पालन केलल दिसून आलं. आणि म्हणून आज जगात जपानी लोकच १०० री अधिक पार करतात. आणि तेही निरोगी आणि हेल्दी जीवन जगत.

या इकिगाई पुस्तकात खूप सविस्तरपणे इकिगाईचा अर्थ आणि जीवन कसे दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जगायचे हे सांगितले आहे. मला हे पुस्तक खूपच आवडले आहे. तुम्हा प्रत्येकाकडे हे पुस्कत असायला हवे आहे. हे पुस्तक मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये सर्वत्र उपलब्ध आहे.     

मित्रहो हे पुस्तक Amazon वरती उपलब्ध आहे. तुम्हाला खरेदी करायचे असेल तर, येथून डायरेक्ट सोप्या पद्धतीने खरेदी करू शकता. धन्यवाद...                        

                                  

                                                       
                         

       

                                                        

                                  


   

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!