लहान मुलांना काजळ लावणे आरोग्यासाठी चांगले असते का? जाणून घ्या काय म्हणतात तज्ञ

SD &  Admin
0


भारतामध्ये प्राचीन काळापासून मुलांच्या डोळ्याला काजळचा वापर केला जात आहे. याच्या पाठीमागे कारण असे दिले जाते की,  काजळ लावणे मुलांसाठी शुभ असते आणि त्याच बरोबर मुलांचे वाईट नजरेपासून रक्षण होते.

गाव असो की शहर, लहान मुलांना काजळ लावणे आवश्यक समजले जाते. आणि ही परंपरा आजपर्यंत विना खंडित चालूच आहे. खरं तर.. लहान मुलांना काजळ लावणे शास्त्रच समजले जाते. असो.. प्रत्येकाला काय वाटते, ते त्याने ठरवावे, परंतु लोक कितीही शिक्षित असले तरी, ते काजळमागचे शास्त्रीय कारण जाणून घेण्याचा प्रयत्न कधीच करत नाहीत. 

परंपरा कितीही मोठ्या असल्या तरी, त्या आरोग्य आणि अहिंसेला धोका तर देत नाही आहे ना..? याकडे प्रत्येक व्यक्तीचे लक्ष असणे आवश्यक आहे. कारण या सगळ्या गोष्टी मनुष्य जातीच्या आयुष्याशी निगडीत असतात.    

 

लोकं मुलांना काजळ का लावतात?
   image credit to www.pexels.com 


लोकं मुलांना काजळ का लावतात?

लोकं काजळ प्राचीन काळापासून वापरात आहे. असे काजळ तेल किंवा तूप जाळल्यानंतर जी काळी राख तयार होते, ती काजळ समजून लोक लहान मुलांना लावतात. लोकांचा असा विश्वास आहे की, काजळ लावल्याने मुलांचे इतर लोकांच्या वाईट नजरेपासून संरक्षण होते. काही लोकांचा असा विश्वास आहे की, काजळ लावल्याने डोळे अधिक उजळ, तेजस्वी होतात.

Read More : न्यूजपेपरवर तेलयुक्त खाद्यपदार्थ खाणे शरीरासाठी हानिकारक असते : कसे ते जाणून घ्या?

लहान मुलांना काजळ लावणे आरोग्यासाठी चांगले असते का?

 
लहान मुलांना काजळ लावणे आरोग्यासाठी योग्य आहे का? या प्रश्नांचे उत्तर डॉक्टर सरळ सरळ नाही म्हणून सांगतात. कारण  काजळमध्ये लीड असते, त्यामुळे काजळ लावल्याने डोळ्यांमध्ये जळजळ होते आणि संसर्गाचा धोकाही अधिक असतो. काजळ घरच्या घरी बनवलेले असो किंवा बाजारातून विकत घेतलेले असो, दोन्ही डोळ्यांसाठी चांगले नाहीत. घरी बनवलेली काजळ लावल्यास तेल आणि तूप जाळल्याने कार्बन तयार होतो, असा पदार्थ डोळ्यांना लावल्याने संसर्ग किंवा डोळ्यांना इजा होण्याची शक्यता अधिक असते.

तरीही तुम्हाला काजळ लावायचे असेल तर, मुलांच्या कानामागे काजल लावू शकता. काजळ लावताना हात स्वच्छ धुवा, कारण असे न केल्याने तुमच्या मुलांना संसर्ग होण्याचा धोका अधिक वाढतो.

मला काय वाटतं

मित्रहो काजळ लावणे ही परंपरा गेले कित्येक वर्षापासून होत आलेली आहे. खेडे गावात या परंपरेला खूप महत्व आहे. मुल जन्माला आलं की, काही महिन्यातच त्याला काजळ लावले जाते. आणि असे करणे म्हणजे बाळाला वाईट गोष्टीपासून सुरक्षित करणे आणि कुणाची नजर लागू नये, हा त्या मागचा उद्देश असतो.

तरीही मित्रहो असे असले तरी, आज बाजारात मिळणाऱ्या काजळमध्ये अनेक केमिकल्स वापरले जातात. आणि ते तुमच्या बाळासाठी धोकादायक असते. त्याचे साईड इफेक्ट्स हे पुढे दिसणारच. म्हणून काजळ लावताना पर्याप्त काळजी घेणे तुमच्यासाठी आवश्यक आहे.

मला.. वाटतं जितकं तुम्ही केमिकल्स आणि भेसळ पदार्थांपासून दूर राहता येईल तितकं राहिलं पाहिजे. कारण आज प्रत्येक पदार्थामध्ये प्रमाणापेक्षा भेसळ केलेली असते. आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूपच हानिकारक आहे. आणि जेव्हा जिथे आपल्या मुलांच्या आरोग्याची गोष्ट येते, तेव्हा तर आपल्याला काळजीपूर्वक प्रत्येक गोष्ट हाताळली पाहिजे. आणि यामध्ये कदाचित तुम्ही चुकी करत असाल तर, त्याचे परिणाम देखील पुढील काळात दिसून येतील

येथे महत्वाच्या पोस्ट वाचा

शरीरात पाणी टिकून राहिल्याने कोणत्या समस्या उद्भवतात : Water Retention Bad for Body 

त्वचेला होणारी खाज कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय करून पहा   

जॅकलिन फर्नांडिसच्या सिक्रेट फिटनेस टिप्स : ज्या तुम्हाला निरोगी आणि स्मार्ट बनवू शकतात                     



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!